मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी मग आपण अनेक क्रीम चा वापर देखील करीत असतो. परंतु बऱ्याच वेळा आपण अतिरिक्त क्रीम्सचा वापर केल्यामुळे आपल्या सुंदरपणामध्ये बाधा देखील येऊ शकते. तर सुंदर दिसण्यामध्ये ओठ देखील खूपच महत्त्वाचे असतात. अनेक जणांचे ओठ हे काळे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकालाच सुंदर गुलाबी ओठ असावे असे वाटत असते. परंतु काही कारणांनी आपले ओठ हे खूपच काळे पडलेले असतात. त्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये अडचण निर्माण होते.
तर तुमचे देखील ओठ काळे पडले असतील तर आज मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे ओठ हे गुलाबी आणि सुंदर दिसणार आहेत. तर हा घरगुती उपाय कसा करायचा याविषयी जाणून घेऊयात.
तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा अर्धा चमचा साखर घ्यायची आहे आणि साखर ही बारीक करून घ्यायची आहे. एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडसर पण नाही मध्यम स्वरूपामध्ये तुम्हाला ही साखर बारीक करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला व्हाईट टूथपेस्ट अर्धा चमचा घालायची आहे.
आपल्या घरामध्ये इतर कोणत्याही कंपनीची असेल टूथपेस्ट चालेल. परंतु व्हाईट रंगाचीच आपल्याला टूथपेस्ट घ्यायची आहे आणि अर्धा चमचा ती टूथपेस्ट आपल्याला त्या बारीक केलेल्या साखरेमध्ये घालायचे आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवायचे आहे.
नंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये बीट हे माहीतच असेल आणि तुम्हाला बीटचा रस अर्धा चमचा काढून घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्ही किसणीच्या साह्याने किसून आणि गाळणीने गाळून तुम्ही अर्धा चमचा बीटचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा आपल्या घरातील नारियल तेल म्हणजेच खोबरेल तेल घालायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.
आता आपण पाहूयात हे मिश्रण आपण कसे लावायचे. तर पहिल्यांदा तुम्हाला आपले ओठ हे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि ओठांवरती तुम्हाला जे आपण साखर आणि टूथपेस्ट मिक्स केलेले मिश्रण केलेले होते ते मिश्रण तुम्हाला ब्रशच्या साह्याने घेऊन आपल्या ओठांना लावायचे आहे. म्हणजेच तुम्ही बोटांनी देखील लावू शकता. परंतु ब्रशने देखील लावले तरीही चालेल आणि तुम्ही ते चार ते पाच मिनिटं ते साखर आणि टूथपेस्ट वापरलेले मिश्रण व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे.
नंतर तुम्हाला जे आपण बीटचे रस आणि नारियल तेल मिक्स करून ठेवलेले मिश्रण आहे हे मिश्रण तुम्ही आपल्या ओठांना लावायचे आहे. म्हणजेच पहिल्यांदा साखर आणि टूथपेस्ट लावलेले मिश्रण तुम्ही धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला बीट आणि नारियल तेलाचे मिश्रण लावायचे आहे आणि हे देखील तुम्हाला पाच मिनिटे ठेवायचे आहे.
मित्रांनो तुम्ही एखाद्या बीटची चक्ती काढून त्या चकतीने तुम्ही आपल्या ओठांना मालिश केले तरीही चालेल किंवा बीटचा रस काढून त्यामध्ये नारियल तेल अर्धा चमचा घालून तुम्ही ते मिश्रण देखील आपल्या ओठांना लावू शकता. नंतर पाच मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे.
मित्रांनो तुम्ही दररोज हा जर उपाय केला तर यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि सुंदर नक्कीच होतील आणि तुम्ही आकर्षक दिसण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही देखील अवश्य करा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि सुंदर नक्कीच दिसतील.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.