मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींचा अनेक आजारांवर या वनस्पती फायदेशीर ठरतात. आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती पैकी पेरूचे झाड सगळ्यांनी पाहिले असेलच. पेरूच्या पानाचे आयुर्वेदात खूपच फायदेशीर उपाय सांगितलेले आहेत. अनेक आजारावर हे पेरूचे पान आपल्याला उपयोगी ठरते. पेरूच्या पानांचे असेच आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत. पेरूच्या पानापासून होणारे 15 फायदे जाणून घेणार आहोत. पेरूचे झाड आपण सर्वांनी नक्की पाहिलेच असेल. खूप वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. याला जाम किंवा अमृत या नावानेदेखील ओळखले जाते.
आवळ्याच्या खालोखाल विटामिन सी जीवनसत्व असणारे हे फळ आहे. पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसात व्हायरस पासून संरक्षण देणारे याचे फळ असते. मित्रांनो पेरूचे फळ जसे उपयुक्त आहे तसेच याची पाने देखील अनेक औषधी गुणधर्मयुक्त आहेत.
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी पेरूची पाने अत्यंत उपयुक्त ठरतात. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी या पेरूच्या पानांचा काढा नियमित सेवन करायला हवा. पचनक्रिया सुरळीत करणे पेरूच्या पानाने मध्ये अंतीबॅक्टरियल प्रॉपर्टीज असतात. ज्याने पोटातील मायक्रोबियल बॅक्टेरियाची वाढ होत नाही आणि म्हणून तुम्हाला जर जुलाब व अतिसाराचा त्रास होत असेल तर पेरूच्या पानांचा काढा पिल्याने अतिसार थांबतात. शिवाय या पानांमधील पोटॅशियम, लायकोपेन, विटामिन ए आणि सी यांच्यामुळे अति शरीरांमधील येणारा थकवा देखील कमी होतो.
रक्तातील साखर कमी करणे या पानांचा काढा दररोज जेवणानंतर पिल्याने पोटातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते व साखरेचे रक्तात होणारे शोषण नियंत्रित राहते. जपानमधील एका रॅट स्टडी मध्ये देखील सिद्ध झाले आहे. हे या पानांच्या रसाचा वापरणे रक्तातील इन्सुलिन व कोलेस्टेरॉल यांचे प्रमाण नियंत्रित राहते. वजन कमी करण्यासाठी देखील या पानांचा रस उपयुक्त असतो पेरूच्या पानांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात जे रक्ताचे असलेल्या कार्बोहायड्रेटचे साखरेत रूपांतर होऊ देत नाहीत. ज्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास फार मदत होते.
कॅन्सरशी मुकाबला करण्यासाठी देखील या पेरूची पाने फार उपयुक्त ठरतात. यामध्ये मुबलक प्रमाणात असणारे एंटीऑक्सीडेंट आणि लायकोपेन ब्रेस्ट प्रोस्टेट आणि ओरल कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
ॲड्रोजन हार्मोनचे प्रोस्टेट कॅन्सर च्या वाढीला कारणीभूत असते. त्यावर नियंत्रण करण्याचे कार्यही पेरूची पाने करतात.
एलर्जी कमी करण्यासाठी एलर्जी कमी करण्यासाठी पेरूची पाने व त्यांची पेस्ट उपयुक्त आहे. किडे, मुंग्या चावल्याने शरीरावरचे इन्फेक्शन होते ते कमी करण्यास पेरूच्या पानांची पेस्ट लावल्यास इन्फेक्शन कमी होते. हिरड्यातून रक्त येत असेल किंवा तोंडाचा वास येत असेल तर अशा वेळी दोन-तीन पेरूची पाने चावून खाल्ल्यास या समस्या देखील दूर होतात.
पिंपल्सची समस्या असल्यास पेरूच्या पानांची कुटून बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी शिवाय 1-2 पाने सकाळच्या चहातदेखील वापरल्याने यावर फायदे होतात.
अकाली वृद्धाप काळाच्या समस्या म्हणजे अकाली केस पांढरे होणे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागणे किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसणे असे आढळल्यास या पानांची पेस्ट चेहऱ्यावर नियमित लावावे. केस गळती थांबवण्यासाठी देखील या पानांची पेस्ट केसांच्या मुळाशी लावावी केस गळती थांबते.
खोकला झाला असेल तर या पानांचा काढा नियमित प्यावा यामध्ये विटामिन सी व आयर्न मोठ्या प्रमाणावर असल्याने खोकला लवकर बरा होतो. बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी देखील पेरूची पाने फायदेशीर असतात. यातील व्हिटॅमिन बी आणि विटामिन बी सिक्स मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात ज्यांनी मेंदू तल्लख राहतो. पेरूच्या पानांमध्ये आयर्न मोठ्या प्रमाणावर असल्याने थायरॉइड नियंत्रणात राहते. शिवाय या पानांच्या रसामुळे शरीरात हार्मोन्स बॅलन्स राहतात.
पोट दुखी होत असेल तर पेरूच्या पानांचा रस अवश्य प्यावा. यातील हाय फायबर मुळे पोट दुखी कमी होते. बुद्धी तल्लख करण्यासाठी पेरूची 1-2 पाने नियमित खावीत यातील विटामिन सी डोळ्यांचे आरोग्य देखील उत्तम ठेवण्यास फार उपयुक्त ठरते. डेंगू झाला असल्यास पेरूची दोन-तीन पाने दररोज सकाळी खाल्ल्याने डेंग्यूमुळे कमी झालेले सेल्स तर वाढायला मदत होते.
तर मित्रांनो हे होते पेरूच्या पानांचे पंधरा फायदे
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.