मित्रांनो, प्रत्येकालाच जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदे, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला हाइपरहाइड्रोसिस हा विकार असु शकतो. बऱ्याचदा जर हाता-पायाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात. काही लोकांमध्ये मुळातच घाम यायचे प्रमाण खूप जास्त असते.
कधीतरी हवेतील उष्णतेमुळे, ताप, काही इन्फेक्शन, गरम व उबदार कपडे यामुळे सुद्धा हाताला आणि पायाला जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. तुम्ही नर्व्हस असाल, कसली भीती किंवा दडपण असेल तरीही तळ हाताला जास्त प्रमाणात घाम येतो. तर मित्रांनो या सर्व समस्या आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या उष्णतेमुळे होत असतात.
मित्रांनो ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते तेव्हा आपल्याला यासारख्या सर्व समस्या उद्भवू लागतात. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते तेव्हा आपल्याला पिंपल्स, अंगावर पांढरे डाग उठणे यांसारखेही अनेक समस्या येऊ लागतात.
तर मित्रांनो वारंवार जास्त प्रमाणात मसाल्याचे पदार्थांचे सेवन जर आपण केले आणि त्याचबरोबर चहाच्या ही अति सेवनामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते. आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी उष्णता तयार होते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या समस्या होतात. मित्रांनो आपण जर अशावेळी सोपे उपाय आपल्या घरामध्ये केले आणि आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर मित्रांनो यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये असणारी उष्णता नक्की कमी करू शकतो.
तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही अतिरिक्त उष्णता आहे किंवा उष्णतेमुळे जर आपल्या हाता पायांना घाम येत असेल, मुंग्या येत असतील तर या सर्व समस्या आपल्या एका छोट्याशा उपायामुळे नक्की दूर होतील.
तर मित्रांनो आपल्या घराच्या आसपास आढळणाऱ्या एका झाडाच्या पाल्यापासून आपण आजचा हा उपाय करणार आहोत. मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी घरातल्या घरात कमी खर्चामध्ये हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर कोणत्या वनस्पतीचा वापर करून आजचा हा प्रभावी उपाय करून आपण आपल्या शरीरामध्ये असणारी अतिरिक्त उष्णता बाहेर काढू शकतो.
तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला जी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे जास्वंद. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांच्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला जास्वंदाच झाड असत आणि मित्रांनो याच जास्वंदाच्या झाडांचा पानांचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे.
मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला चांगली जास्वंदाची पाच ते सहा पाने तोडून आणायचे आहेत. ती पाने सर्वात आधी आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर खलबत्याच्या सहाय्याने आपल्याला ही पाने वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो जी पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट तुम्ही तयार केल्यानंतर याचा लेप आपल्या तळपायाला आणि तळहाताला लावायचा आहे. मित्रांनो अर्धा ते एक तासापर्यंत तुम्हाला हा लेप आपल्या हातांवर आणि तळपायाला लावून तसाच ठेवायचा आहे. मित्रांनो जर तुम्ही रात्रभर हा उपाय करणार असाल तर ही करू शकता.
तर मित्रांनो तुमच्या हाता पायाला मुंग्या येत असतील तर संपूर्ण हाताला आणि संपूर्ण पायाला तुम्ही हा लेप लावायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता झाली असेल तर अशा वेळी तुम्ही या पेस्टचा लेप तुमच्या तळ पायांवर लावायचा आहे. मित्रांनो यामुळे तुमची शरीरामध्ये असणारी सर्व उष्णता निघून जाईल.
तर मित्रांनो अशा पद्धतीने या जास्वंदाच्या वनस्पतीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये असणारी अतिरिक्त उष्णता नक्की दूर करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या हाता पायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा घाम येत असेल तर अशावेळी तुम्ही एक छोटासा उपाय करून तुमच्या या सर्व समस्या दूर करू शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.