लाख मोलाचे विड्याचे हे एक पान एक वेळेस या पद्धतीने खा आणि चमत्कार पहा 32 प्रकारचे आजार मुळापासून कायमचे बरे करते हे पान ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, विड्याचे पान तुम्हाला प्रत्येक गल्लीच्या नाक्यावर मिळतील. तसे तर ही पाने लोक मुखशुद्धीसाठी खातात. उत्तर भारतामध्ये जेवल्यावर ह्या पानांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. पूजेसाठी या पानांचा उपयोग केला जातो. तुम्हाला माहीत आहे का, या हृदयाच्या आकाराच्या पानांमध्ये खूप आजारांचे उपाय लपलेले आहेत. या पानांमध्ये बरेचसे औषधी गुणधर्म आहेत. ती तुमची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते आणि अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते. मित्रांनो याचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो फायदा आपल्याला होतो तो म्हणजे तोंडाच्या दुर्गंधी पासून मुक्तता. तर मित्रांनो या संबंधित या पानाचा उपयोग करत असताना आपल्याला दररोज सकाळी या विड्याचे एक पान चावून चावून खायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही रोज एक विड्याचे पान चावून खायला सुरुवात केली तर तुमच्या तोंडाची दुर्गंधी लवकरच दूर होईल.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर अशावेळी मित्रांनो एका पानावर खूप किंवा मोहरीचे तेल आपल्याला लावायचे आहे आणि हे पान गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे गुडघेदुखी किंवा सांधेदुखी आहे त्या ठिकाणी आपल्याला हे पान रात्रभर बांधून ठेवायच आहे. मित्रांनो हा उपाय जरी आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे केला तरी आपले असणारे गुडघेदुखी, सांधेदुखी लगेच दूर होईल.

त्याचबरोबर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल किंवा छातीमध्ये कफ निर्माण होत असेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही एक पान आणि एक लवंग चावून चावून खायचे आहे. अशा पद्धतीने पानाचा वापर जर तुम्ही केला तर तुमची सर्दी पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर जर जास्त प्रमाणात खोकल्याचा त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही या पानांमध्ये थोडासा ओवा टाकून त्याचे सेवन तुम्हाला करायचे आहे. यामुळे तुमचा खोकला लगेचच दूर होईल.

मित्रांनो विड्याच्या पानामध्ये जीवाणू विरोधी गुणधर्म आहेत. विड्याची पाने चघळल्याने तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे जीवाणूमुळे तोंडावाटे होणारे संक्रमणास प्रतिबंध घातला जातो. ज्यामुळे तोंडात होणा-या अल्सरपासून मुक्त होण्यासाठी मदत होते. तसेच वारंवार तोंड येत असल्यास विड्याच्या पानावर तूप लावून खावे. तोंडातील अल्सर व तोंड येणे बंद होऊन आराम मिळण्यास मदत होते.

त्याचबरोबर यामुळे वजन नियंत्रनात खूपच फायदेशीर ठरते. विड्याचे पान वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. विड्याच्या पानाच्या सेवनाचे चयापचय क्रिया चांगली होते. ज्यामुळे आपल्या शरीरात जास्तीची चरबी जमा होत नाही. आयुर्वेदानुसार विड्याचे पान खाल्यामुळे शरीरातील मेद धातू काढून टाकण्याचे कार्य होते.

तसेच या पानाच्या अर्कामुळे शरीरातील भुकेवर परिणाम न होता वजन संतुलीत ठेवता येते आणि त्याचबरोबर मित्रांनो या विड्याच्या पानामध्ये मधुमेह विरोधी घटक आहेत. ज्यामुळे आपल्या शरीरामधील रक्तातील साखर कमी करण्यास मदत विड्याच्या पानात असे गुणधर्म असतात की, जे रक्तातील ग्लुकोज पातळी संतुलीत ठेवण्याची महत्वाची भूमिका निभावतात.

एका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे विड्याच्या पानाचे सेवन करतात त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो आणि मधुमेहात डॉक्टरच्या सल्याने या पानाचे सेवन करता येते.

मित्रांनो विड्याच्या पानाचा उपयोग जखमा लवकर भरून येण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो आहे. कारण त्यात जखम भरून येण्याचे घटक आहेत. त्यासाठी विड्याच्या पानाचा रस जखमेवर लावावा आणि त्यावर विड्याचे पान ठेवून पट्टी बांधावी. यामुळे जखम लवकर भरण्यास फायदा होतो. एका संशोधनानुसार मधुमेहामुळे झालेल्या जखमा लवकर भरण्यासाठी विड्याच्या पानाचा अर्क फायदेशिर आहे. तसेच या अर्कामुळे सुक्ष्मजंतूच्या वाढीस प्रतिबंध होतो.

त्याचबरोबर चेह-यावर असलेले डाग, पुरळ, मुरूम कमी करण्यासाठी विड्याच्या पानाचा उपयोग होतो. कारण या पानामध्ये जीवाणू विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेला संसर्ग होत नाही व त्वचेचे सौंदर्य अबाधित राहते. त्यासाठी विडयाची पाने बारीक वाटून त्याचा रस तयार करावा व त्यामध्ये हळद मिसळून चेह-यावर लावावा व नंतर 20 ते 25 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यामुळे मुरूम कमी होऊन चेहऱ्यावर असणारे डाग कमी होतात.

तर असा हा पानांचा फायदा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूपच होतो. याचा पुरेपूर लाभ आपण करून घ्यायला हवा. तर मित्रांनो वरीलपैकी कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला त्रास झाला तर हा घरगुती आयुर्वेदिक उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *