मित्रांनो, सगळीकडेच आता नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. नवरात्रीमध्ये सगळीकडेच आनंदाचे वातावरण आपणास पाहायला मिळते. या नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करीत असतात. आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा अर्चना करीत असतात आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील आणि तसेच आपले घर सुख समृद्धीने नांदावे अशी मातेकडे प्रार्थना देखील करीत असतात. मित्रांनो नवरात्रीचे हे नऊ दिवस खूपच शुभ मानले जातात.
मित्रांनो या नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर देवीची दररोज पूजा, सेवा मंत्र जप करत असतो. या नवरात्रीच्या नऊ दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील घेतले जातात. देवीचा जागर केला जातो. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येक जण हा काही ना काही उपाय हा करीतच असतो. मित्रांनो प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी, आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही समस्या भेडसावू नये तसेच पैशाची चनचन राहू नये मातेचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर असावा असे मनोमन वाटतच असते.
तर मित्रांनो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला मातेला नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवल्याने माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. असे म्हणतात की या नवरात्रीमध्ये माता पृथ्वीचे भ्रमण करीत असते. आणि ज्या घरामध्ये सुख शांती असेल, स्वच्छता असेल अशा घरांमध्ये माता प्रवेश करीत असते. म्हणजेच मित्रांनो या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये कोणत्याच प्रकारच्या कटकटी तसेच भांडण असू नये किंवा करू नये. तसेच आपल्या घरामध्ये अस्वच्छता देखील ठेवू नका. त्यामुळे माता तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे आपले घर हे स्वच्छ, नीटनेटके तसेच शांततेचे असावे.
नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये माता विराजमान झालेली असते. ती घटाच्या स्वरूपात असू दे किंवा अखंड दिव्याच्या स्वरूपात असू दे. तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला असू दे किंवा घटाची स्थापना केलेली असू दे तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांच्या घरांमध्ये घटस्थापना देखील केलेली नाही किंवा अखंड दिवाही लावलेला नाही त्यांनी देखील आपल्या देवघरांमध्ये हा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. कारण आपल्या देवघरांमध्ये कोणत्या ना कोणत्या देवीची मूर्ती ही असते किंवा आपल्या कुलदेवतेची तर मूर्ती असते. त्यामुळे तुम्हाला हा नैवेद्य आपल्या देवघरात देखील दाखवला तरीही चालतो.
तर मित्रांनो सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे आटोपल्यानंतर तुम्हाला देवघरात जाऊन देवपूजा करायचे आहे. देवपूजा व्यवस्थित केल्यानंतर दिवा, अगरबत्ती, धूप लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य आहे दूध साखरेचा. तर मित्रांनो तुम्हाला एका वाटीमध्ये दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चिमूटभर साखर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून त्या दुधामध्ये तुम्हाला एक तुळशीचे पान टाकायचे आहे.
हा नैवेद्य तुम्हाला आपल्या घट असेल तर घटासमोर, अखंड दिवा असेल तरीही त्या दिव्या पाशी किंवा तुम्ही देवघरात देखील हा दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता. त्याच्यासोबतच तुम्हाला एक ग्लास पाणी देखील ठेवायचे आहे. तर तुम्हाला दररोज नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. मित्रांनो देवीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा दूध साखरेचा नैवेद्य नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज दाखवायचा आहे.
यामुळे माता आपणावर प्रसन्न होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम ठेवते. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या देखील येणार नाहीत. आपल्या सर्व अडचणी माता नक्की दूर करेल. तर मित्रांनो हा साधा सोपा नैवेद्य तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दाखवायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.