मित्रांनो, आपल्याला अनेकदा पती-पत्नी संबंधांतील तणावा संदर्भातील बातम्या ऐकायला, वाचायला मिळतात. यात अनेक गुन्हे विषयक बातम्याही असतात. नवऱ्याने पत्नीचा खून किंवा अशा प्रकारच्या या बातम्या कायम बघायला मिळतात. पण अनेकदा या बातम्यांमध्ये आपण जर कारण पाहिले तर यामागे अनैतिक संबंधाच्या रागातून हत्या झाल्याचे दिसून येते. यावेळी विवाहा नंतरही महिला अशा प्रकारचे अनैतिक संबंध का ठेवतात, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. त्यामागे अनेक वेगवगळ्या प्रकारची कारणे आहेत. महिला परपुरुषांकडे का आकर्षित होतात, यामागील काही कारणे शोधण्याचा अभ्यासकांनी प्रयत्न केलाय. याबद्दलचीच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आर्य चाणक्यांनी महिलांबाबत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. लग्न झालेल्या महिला परपुरुषांकडे आकर्षित होतात. त्याचा उल्लेखही चाणक्य नीतीत आहे. त्यावर भाष्यही करण्यात आलं आहे. तसेच आयुष्यात लग्नाचं महत्त्व किती आहे, याची माहितीही आर्य चाणक्य देतात. जेव्हा पत्नी नवऱ्यापासून संतुष्ट असते तेव्हा ती फार कमी बोलते. याचा अर्थ हा नाही की तिला बोलायला आवडत नाही. ती नवऱ्यापासून खूश असल्याचे संकेत देते हा त्याचा अर्थ होतो, असं चाणक्य म्हणतात.
या उलट पुरुषांच्या बाबतीत होतं. जेव्हा पुरुष अबोल राहतो, तेव्हा पत्नी अस्वस्थ होते. नवरा जेव्हा तिला टाळू लागतो, तेव्हा तिचा मोहभंग होतो आणि त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. अशावेळी त्यांना पत्नीची प्रत्येक गोष्ट मानणारा परपुरुष खूप चांगला असल्याचं वाटू लागतं. त्यामुळेच दाम्पत्याने अशा प्रसंगी आपल्यातील गोष्टी उघड करून त्या दोघांनी मिळून सोडवल्या पाहिजे, असं चाणक्य नीती सांगते.
चाणक्यांच्या मते, कधी कधी पती-पत्नीत वाद होणं हे स्वाभाविक आहे. पण हे वाद वारंवार होत असतील तर चिंतेचा विषय आहे. जेव्हा पत्नी प्रत्येक छोट्या गोष्टींमुळे संतापत असेल तर तिच्या मनात असंतोष खदखदत आहे, हे समजून जा. अशावेळी पतीने पत्नीचा स्वभाव समजून घेतला पाहिजे. तसेच संवेदनशीलतेने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे.
चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही दाम्पत्य जीवनात जबाबदाऱ्यांचं मोठं योगदान असतं. जेव्हा दोन्ही पार्टनर एकत्रितपणे घराचे निर्णय घेत असेल आणि मुलांचं संगोपण करत असेल तर त्यांच्यातील सामंजस्य मजबूत असलं पाहिजे. अशा प्रकारे चाणक्य नीतीत समग्र विकासासाठी पारंपारिक सहयोगाला महत्त्व दिलं आहे.
अशाप्रकारे विवाहित महिला पर पुरुषाकडे आकर्षित का होता त्याबद्दलचे कारण आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेले आहेत.