मित्रांनो जगात जवळजवळ 70 ते 80 टक्के लोक नियमित मांसाहार करतात. जगात प्रत्येक धर्मात पूजेचे महत्व आहे अशावेळी मग प्रश्न पडतो जगात मांसाहार करणाऱ्या व्यक्ती जेव्हा देवपूजा करतात तेव्हा देव त्यांचे पूजा स्वीकारतात का चला तर शोध घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
मित्रांनो भगवत गीतेत भगवान श्री कृष्णांनी आहाराचे तीन वर्ग पाडलेले आहेत. सात्विक आहार राजसिक आहार व तामसिक आहार. सात्विक आहार : ताजी फळे भाज्या सलाड इ. मूग नाचण सत्तु भाज्यांची सूप्स ज्यूस दुग्धजन्य पदार्थ सुकामेवा वगैरे. राजसिक आहार : खूप तळलेले/ तिखट/ चमचमीत/ तेलकट पदार्थ चमचमीत -तुपकट पदार्थ. तामसिक आहार : मांसाहारी पदार्थ शिळे/ दुर्गंधीयुक्त पदार्थ बर्याच वेळा गरम केलेले पदार्थ लोणची कांदा लसूण मिरची अंडी वगैरे. मित्रांनो सात्विक अन्न आयुष्य वाढवणारे मनाला शुद्ध करणारे तसेच बुद्धी आरोग्य व तृप्तता मिळवून देणारे असते.
हिंदू धर्मात मांसाहार करणे योग्य आहे कि अयोग्य या विषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. या मागे कारण असे कि आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे काही सांगितले आहे ते सर्वाना माहीतच नाही. वेदांमद्ये स्पष्ट उल्लेख केला आहे कि पशु हत्या, पशु बळी हे पापाच्या श्रेणीत येते.
यजुर्वेदात असा उल्लेख येतो कि मनुष्याने सृष्टी भगवंतांनी निर्माण केली मनुष्याने तिचे जतन संवर्धन के ले पाहिजे. म्हणजे जसे आपण स्वतःचे हित पाहतो तसेच इतरांचे देखील हित पाहावे.
अथर्ववेदात म्हटले आहे कि मनुष्याने तांदूळ, डाळ, फळे इत्यादी वस्तूंचा खाद्यपदार्थ म्हणून वापर करावा. हाच आहार मनुष्यासाठी सर्वात उत्तम आहार आहे. मनुष्याने कोणत्याही नर किंवा मादीची हिंसा करू नये. म्हणजेच मांसाहार करू नये. तसेही मांसाहाराला वैज्ञानिक दृष्टिकोनातून चुकीचे मानले गेले आहे. मांसाहारामुळे कितीतरी रोग होतात त्यामुळेच शरीराला हानी पोहोचते.
तर ऋग्वेदात गाय हि जगताची माता आहे म्हटले आहे. श्रीकृष्णाला देखील गाय प्रिय होती. गाईचे रक्षण करणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. मनुष्याने आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांचे रक्षण केले पाहिजे. मित्रांनो गरुडपुराणात सांगितले आहे की नेहमी शाकाहारी भोजन करावे म्हणजे मृत्यूनंतर देखील आपल्याला भगवंताची साथ प्राप्त होते.
मित्रांनो भगवंत म्हणतात कि ज्या व्यक्ती आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या जीवाची हत्या करतात त्यांना पुढील जन्म त्या प्राण्याचाच मिळतो. आणि कितीतरी जन्म त्या प्राण्याच्याच रूपात जन्म घ्यावा लागतो. व ते देखील तसेच मारले जातात.
म्हणून मित्रांनो भगवंत आणि भगवंतांच्या भक्ती असेल श्रद्धा असेल तर मांसाहार बंद करा. आता तुम्हाला लक्षात आलेच असेल कि मांसाहार करणे योग्य आहे कि अयोग्य आणि मांसाहार करणाऱ्या व्यक्तींचे भगवंत पूजन स्वीकारतील का ?
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.