मित्रांनो, थंडीचे दिवस आता सुरू झाले आहेत आणि लहान मुलांना खोकला वगैरे होत असतो. लहान मुलांना सर्दी, खोकला देखील लागतो. मग हा खोकला कधी कोरडा असतो तर मग कधी छातीमध्ये कप साठतो. अशा खोकलांचा त्रास लहान मुलांना रात्रीच्या वेळी खूप होतो त्यांना याचा त्रास होतो. लहान मुलांना लागणाऱ्या खोकल्यावर तसेच घशामध्ये होणारी खवखव यावर कोणकोणते उपाय करायचे आहेत आणि ते उपाय कशा पद्धतीने केल्याने हा खोकला बरा होईल. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. हे उपाय आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये कसे होतात याची माहिती घेणार आहोत.
मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना सर्दी, खोकला यांसारखे त्रास होतात. तेव्हा त्यांना रात्रभर झोप लागत नाही. त्याचबरोबर मित्रांनो यांची झोप अपुरी झाल्यामुळे ही लहान मुले आपल्याला खूप त्रास देतात. मित्रांनो या सर्दी खोकल्यामुळे जो त्रास त्यांना होतो तो त्रास बघून आपल्यालाही कसंतरी होतं.
म्हणूनच मित्रांनो आपण ज्यावेळी ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला महागडे औषधे, गोळ्या, इंजेक्शन देतात. परंतु इतके महागडे औषधे घेऊनदेखील अनेकदा याचा चांगला परिणाम त्या मुलांच्या आरोग्यावर होत नाही. म्हणूनच मित्रांनो आपल्याला त्यावेळी आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या काही उपायांची मदत नक्कीच घेतली पाहिजे.
तर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे जे उपाय असतात हे अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असतात. त्याचबरोबर मित्रांनो हे उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो. त्याचबरोबर या उपायांचे काही साईड इफेक्ट आपल्यावर होत नाही.
म्हणूनच मित्रांनो हे उपाय आपण आपल्या घरामध्ये नक्की करून बघितले पाहिजे. कमीत कमी तीन दिवस करायचा आहे. मित्रांनो यामुळे जो तुमच्या लहान मुलांना झालेला सर्दी, खोकल्याचा त्रास आहे तर या सर्व समस्या छोट्याशा उपायामुळे दूर होतील. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पदार्थ लागणार आहेत ते पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये अगदी सहजरित्या आपल्या उपलब्ध होतील.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार काळी मिरी लागणार आहे आणि त्याचबरोबर चार लवंग सुद्धा लागणार आहेत. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये नक्की असतात. मित्रांनो जर नसतील तर तुम्हाला तुमच्या दुकानांमध्ये हे दोन पदार्थ पाच ते दहा रुपयांमध्ये उपलब्ध होतील.
हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला तव्यावर हे चार काळी मिरी आणि चार लवंग भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर याची बारीक पावडर आपल्याला मिक्सरच्या साह्याने किंवा खलबत्याच्या साह्याने चांगले बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजेच तुम्हाला याची बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी पावडर तयार होईल ती थोडीशी पावडर तुम्हाला मधासोबत तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना खाण्यासाठी द्यायचे आहे.
तर मित्रांनो आता आपण जो उपाय बघितला हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांसाठी करायचा आहे. परंतु मित्रांनो ज्या मुलांचे वय एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा मुलांसाठीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये सहा महिने ते बारा महिने या कालावधीतील मुले असतील तर त्यांना सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता.
परंतु तुम्हाला उपाय करत असताना गुळ घ्यायचा आहे. म्हणजेच गुळ आणि जे आपण तयार केलेले पावडर या दोन्हीचे सेवन त्या मुलांना आपल्याला भरवायचे आहे. मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये असणारे बाळ हे सहा महिन्यांच्या आतील असेल तर अशावेळी तुम्ही डॉक्टरांची मदत म्हणजे डॉक्टरांचे उपचार तुम्हाला घ्यायचे आहेत.
तर मित्रांनो जी मुले एक वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असणारे लहान मुल हे एक वर्षापेक्षा लहान आणि सहा महिन्यापेक्षा मोठे असेल तर अशावेळी मित्रांनो उपाय सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने दोन वेळा आपल्याला करायचा आहे.
डॉक्टरांचे उपचार घेत असाल आणि डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध घेत असाल तर मित्रांनो तुम्ही त्या औषधांबरोबरही हा उपाय करू शकता. मित्रांनो हा उपाय आणि डॉक्टरांच्या औषध यामुळे दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांचे सर्दी, खोकला, छातीतील कफ यासारख्या समस्या दूर होतील. तर मित्रांनो असा हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.