किडनी स्टोन साठी औषधें घेऊन थकला असाल तर, शेवटचा हा असा आहार घ्या मुतखडा १००% तुकडे होऊन पडणार ? डॉ ; रावराणे …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागत आहे आणि या रोगावर आपल्याला खूप सारा पैसा देखील खर्च करावा लागतो. तर बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास खूपच होतो. मुतखड्याच्या वेदनामुळे कोणालाही आपल्या कामांमध्ये लक्ष देखील लागत नाही. आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. तरी देखील आपला मुतखड्याचा त्रास काही केल्याने कमी होत नाही. तर आज मी तुम्हाला असा आहार सांगणार आहे म्हणजेच असा आहार जर तुम्ही घेतला तर यामुळे तुमचा मुतखडा नक्कीच विरघळणार आहे आणि जो काही त्रास तुम्हाला सहन करावा लागत होता तो खूप अंशी कमी होणार आहे.

 

तर आपण मुतखडा झाल्यानंतर काय खावे तसेच काय खाणे टाळले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला जर मुतखडा असेल तर आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त पाणी जाणे खूपच गरजेचे आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूपच गरजेचे आहे. म्हणजेच मग आपल्या लघवीद्वारे जे काही अपायकारक घटक असतील ते निघून जाण्यास मदत होते.

 

त्यामुळे तुम्ही शक्यतो शहाळ्याचे पाणी, उसाचा रस पिणे खूपच गरजेचे आहे. तसेच तुम्ही कुळीथ हे आपल्या आहारामध्ये वापरू शकता. परंतु ज्यांना पित्त, उष्णता याचा त्रास आहे त्यांनी कुळीथाचा वापर कमी प्रमाणात करायचा आहे. तसेच बार्ली देखील मुतखड्यावर खूपच फायदेशीर ठरते. कोकणामध्ये बार्लीचे सांडगे देखील घातले जातात. तर तुम्ही बार्लीचे पिठले करून खाऊ शकता. यामुळे तुमचा जो काही मुतखड्याचा खडा असेल तो विरघळण्यास मदत होते.

 

तसेच तुम्ही आपल्या आहारामध्ये शेंगदाणे तसेच काजू बदाम हे देखील कमी प्रमाणात घेणे खूपच गरजेचे आहे. तसेच तुम्ही मूग, मसूर खाऊ शकता म्हणजे तुम्ही या डाळी खाऊ शकता. परंतु याचे देखील प्रमाण तुम्ही कमी प्रमाणात आपल्या आहारामध्ये ठेवायचे आहे. ज्यांना रताळी आवडतात त्यांनी जर रताळ्याचा कमी वापर आपल्या आहारामध्ये केला तर त्यांचा मुतखड्याचा त्रास कमी होऊ शकतो.

 

तसेच तुम्ही आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या म्हणजेच शेवग्याच्या शेंगा, कारले, मुळा, गाजर या भाज्यांचा समावेश करायचा आहे. हे आपल्या मुतखड्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तसेच तुम्ही केळी, द्राक्षे, टरबूज, कलिंगड आपल्या आहारामध्ये घ्यायचे आहे. कारण या फळांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे मुतखड्यावर ते खूपच फायदेशीर ठरते.

 

तसेच मित्रांनो कोहळा देखील खूपच फायदेशीर ठरतो. तर तुम्ही पिकलेला कोहळा घेऊन त्याचा अर्धा कप रस काढायचा आहे आणि त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालून तुम्ही हा रस सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही दोन महिने केला तर यामुळे तुमचा मुतखड्याचा खडा विरघळण्यास नक्कीच मदत होते.

 

तसेच तुम्ही केळीच्या खांबांचा वापर हा सत्यनारायणाच्या पूजेमध्ये करता. तर केळीच्या खांबाचा पाच-सहा इंच लांबीचा आणि तीन ते चार रुंदीचा तुकडा घेऊन रस काढायचा आहे आणि हा एक चमचा रस तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चिमूटभर धने तसेच जिरे पावडर घालून सकाळी उपाशीपोटी घ्यायच आहे. यामुळे देखील तुमच्या मुतखड्यावरती खूपच फायदा होतो.

 

तसेच दूध तसेच दुधापासून बनवलेले पनीर, चीज याचा आपल्या आहारामध्ये खूपच कमी प्रमाणात वापर करायचा आहे. तसेच मटन, चिकन याचा देखील आपल्या आहारामध्ये जास्त वापर करायचा नाही. तसेच अनेकाना मासे खूप आवडतात. ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस मासे खाऊ शकता. असा जर तुम्ही आहार घेतला तर यामुळे नक्कीच तुमच्या मुतखड्यापासून सुटका होण्यास मदत होईल.

 

तसेच तुम्ही आपल्या आहारामध्ये बटाटा, बीट, चहा तसेच सुखामेवा याचा अधिक प्रमाणात वापर करायचा नाही. म्हणजेच हे पदार्थ खाणे टाळावेत. यामुळे मुतखड्याचा त्रास नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर आपला आहार अशा पद्धतीने घेतला तर यामुळे तुमचा मुतखड्याचा त्रास नक्कीच कमी होणार आहे आणि जो काही त्रास सहन करावा लागत आहे तो देखील कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *