हे पाच व्यायाम आणि कसलीही आणि कितीही जुनाट कंबर दुखी मोजून फक्त 10 दिवसात 100 % गायब, कंबरदुखी पाठदुखी साठी व्यायाम …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सध्याची परिस्थिती बदललेली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण घरी बसून काम करत आहे. तासन्तास एका जागेवर बसून अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ लागले आहेत त्यापैकी कंबरदुखी, पाटदुखी, मानदुखी, गुडघे दुखी या सगळ्या समस्या आता जोर धरू लागले आहेत आणि जर आपण या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते पण जर तुम्ही या समस्येला दुर्लक्ष केले तर भविष्यात या समस्या मोठ्या आजाराचे कारण ठरू शकतील म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

तर मित्रांनो ऑफीसमध्ये नोकरी करणारे बहुतांश जण दिवसाचे 7 ते 8 तास एका जागी बसून असतात. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना चांगली खुर्ची घेतली, टेबल चांगले असले तरी आपली बसण्याची पद्धत योग्य नसल्याने काही वेळाने आपली पाठ दुखायला लागते. कधी आपण खूप पुढे वाकून बसतो तर कधी बराच काळ पाठीत वाकलेले राहतो. सुरुवातीला आपल्याला हे लक्षात येत नाही, पण जसजसे दिवस जातात तशी आपल्याला आपल्या शरीराची ठेवण चुकल्याची आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याची जाणीव व्हायला लागते. मग कमी वयातच पाठीचं दुखणं मागे लागतं आणि मान- पाठ, खांदे आखडून जातात. एकदा पाठ आणि कंबरदुखी मागे लागली की आपल्याला काहीच सुधरत नाही.

कधी कधी कंबरदुखी इतकी सतावते की काहीच सुधरत नाही. अशावेळी नेमकं काय करावं आपल्याला कळत नाही. रोजच्या धावपळीत व्यायामाला वेळ मिळत नाही ही अनेकांची तक्रार असते. अशावेळी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण बैठ्या जीवनशैलीमुळे उद्भवलेली ही समस्या दूर करण्यासाठी औषध-गोळ्या घेण्यापेक्षा जाता येता काही सोपे व्यायाम करणे हा केव्हाही उत्तम उपाय असतो. पाठ, कंबर, मणका हे आपल्या संपूर्ण शरीराला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आपण कितीही धावपळीत असू तरी थोडा वेळ काढून आपल्या कंबरेच्या, पाठीच्या दुखण्यावर उपयुक्त असे व्यायामप्रकार आवर्जून करायला हवेत जे नियमित केल्याने पाठीला आराम मिळू शकतो.

तर मित्रांनो यातील सर्वात पहिला जो व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे हॅमस्ट्रींग स्ट्रेच पाठीवर झोपून डावा पाय गुडघ्यात वाकवा. उजवा पाय सरळ उचलून दोन्ही हाताने या पायाला गुडघ्यापाशी आधार द्या. हे करताना डोकं, पाठ, खांदे जमिनीला नीट टेकलेले राहतील याची काळजी घ्या. वर घेतलेला पाय जास्तीत जास्त आपल्या बाजुने खेचला तर पाठीला चांगला ताण पडतो. हा व्यायाम 10 ते 20 सेकंदांसाठी करा. आणि त्याचबरोबर आणखीन एक व्याज आपण करू शकतो तो म्हणजे पवनमुक्तासन, पाठीच्या कण्याला ताण पडावा यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. पाठीवर झोपून दोन्ही पाय काटकोनात सरळ करावेत. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून गुडघे जास्तीत जास्त पोटाकडे ओढून घ्यावेत. यामुळे पोटाला तर ताण पडतोच पण मणक्यालाही ताण पडतो.

आणि त्यानंतर पुढचा जो व्यायाम आहे त्याचे नाव आहे स्पायनल स्ट्रेच, पाठीचा कणा हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग असून त्याला ताण आला की आपल्या पूर्ण हालचालींवर बंधने येतात. कोणत्याही अवयवासाठी स्ट्रेचिंग हा उत्तम व्यायामप्रकार असून त्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपताना ऑफीसमधून घरी आल्यावर काही किमान स्ट्रेचिंग केल्यास शरीराला आलेला ताण कमी होण्यास मदत होते. वज्रासनात बसून डोके खाली टेकवायचे आणि दोन्ही हात समोरच्या बाजुने ताणायचे. यामुळे कण्याला आणि पाठीच्या इतर स्नायूंनाही चांगलाच ताण पडतो आणि आराम मिळण्यास मदत होते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *