जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपल्याला भाव देत नाही इग्नोर करते तेव्हा फक्त हे काम करा?

Uncategorized

मित्रांनो, आपण ज्या व्यक्तींवर जास्त जीव लावतो. त्या व्यक्तीसाठी सदैव उपस्थित असतो. कोणताही प्रकारची कारणे देत नसतो. त्या व्यक्तीने जे काही सांगितलेल्या आहेत ते करत असतो. परंतु तीच व्यक्ती आपल्याला इग्नोर करते असते. आपल्याला जेव्हा जाणवते तेव्हा नक्की हे काम करावे. जेणेकरून त्या व्यक्तीला देखील आपली किंमत कळेल. हे कोणते काम आहे जे आपण त्या व्यक्तीसोबत करावे? याचीच माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

तर पर्याय एकदम सोपा आहे त्या व्यक्ती सोबत त्याच्या सारखाच वागायचं. म्हणजे कसं? जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते आणि तरीही तुम्ही तिला भाव देत आहात, तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले? बोलत का नाहीयेस? माझं काय चुकलं ? जर असं पुन्हा पुन्हा विचारलात तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माझ्या शिवाय ह्याच्या आयुष्यात काहीच नाही मी कसाही वागलो तरी हा माझ्याच कडे येणार असे वाटते. त्यामुळे त्या व्यक्तीला भाव देणं सर्वप्रथम सोडलं पाहिजे. स्वतःमध्ये खुश राहायला शिकले पाहिजे. जरी फरक पडत असला तरी त्याला दाखवून द्यायचं नाही .

 

अचानक तुम्ही बिझी झालात स्वतःमध्ये गुंतून राहायला लागलात तर ती व्यक्ती आपोआप आपला विचार करायला लागेल. हा आपल्याला काही विचारत का नाहीये आपल्याला विसरून गेला का ? म्हणजे थोडक्यात काय परिस्थिती एकदम रिव्हर्स होईल आणि तीच व्यक्ती तुम्हाला भाव द्यावा लागेल.आपल्याला प्रयत्न करावेच लागेल. जर त्या व्यक्तीला तुमची किंमत नसेल तुम्हाला ती वेळ देत नसेल तर बदल आपल्यालाच करावा लागेल. कारण आपली किंमत आपल्यालाच वाढवायची आहे. त्या व्यक्तीला तुमचा फायदा घेऊ द्यायचा नाही.

 

त्याला दाखवून द्यायचे आहे की मी रिकामटेकडा नाही मलाही काम असतात. हे सगळे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला बिझी ठेवू शकाल. आपण एखाद्या व्यक्तीमध्ये इतके गुंतून गेलेला असतो की त्या व्यक्ती शिवाय आपल्याला आपले जगणे कठीण वाटून जाते. परंतु ती व्यक्तीच्या आयुष्यात एखादी दुसरी व्यक्ती आली की ती आपल्याला भाव देत नाही. आपल्याला इग्नोर करू लागतील.ती दुसरी व्यक्ती त्याला तितके महत्त्व देत नसते जितके आपण देत असतो परंतु त्या व्यक्तीला ती दुसरी आलेलीच व्यक्ती खूप आवडू लागते. आणि त्यामुळे ते आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात.

 

म्हणूनच आपण त्या व्यक्तीला इतका भाव देऊ नये की आपण त्यामध्ये गुंतून जाऊ.कधीकधी आपण एखाद्याला जास्त अटेंशन देतो. एखाद्याबद्दल जास्त पजेसिव असतो. बारीक-सारीक गोष्टीत त्याची काळजी करतो पण या सगळ्या गोष्टी करण्याआधी ती व्यक्ती त्या लायकीची आहे का? हे आधी जाणून घ्या. प्रमाणापेक्षा बाहेर नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे असं दाखवून देण्याची काही गरज नाही त्यामुळे थोडेफार इग्नोर करायला शिकलचं पाहिजे. कधीही अव्हेलेबल राहू नका.

 

उटसूट सारखं जेवलास का? कुठे आहेस? काय करत आहेस? मला हे सांगितलं का नाही? तू हेच का केलं? तू तेच का केलं? अशाने समोरचा सुद्धा वैतागतो आणि तो इग्नोर करायला लागतो. जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर मुद्दाम करण्याची काही गरज नाही. प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे नाहीतर आपली किंमत आपोआप कमी होईल.सगळ्यात महत्त्वाचं, सर्वात जास्त प्रेम हे स्वतःवर केलं पाहिजे. आज कितीही दुःख असले तरी त्या व्यक्तीसमोर नेहमी आनंदी एकदम एटीट्यूड मध्ये स्वतःची रिस्पेक्ट राखून त्याच्यासमोर प्रेझेंट झालं पाहिजे. त्याच्या दुर्लक्षित करण्याने आपल्याला घंटा फरक पडत नाही हे त्याला आपल्या वागण्यातून दिसले पाहिजे. प्रत्येक वेळेला तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही.

 

तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असल्या गोष्टी बोलून दाखवणे टाळले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही तोपर्यंत तुम्हाला समोरचा महत्त्व देणार नाही.विचार करा आपल्यात काय कमी आहे, आपण कुठे चुकतोय, चूक दुरुस्त करण्यासाठी काय करायला हवं. आणि त्या दिशेने गेले पाहिजे. आहे त्या पेक्षा जास्त चांगलं कसं करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत त्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्या. त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आनंद देतात.

 

स्वतः कडे लक्ष दिले पाहिजे स्वतःच्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजे. आपण कसे छान दिसू, कसे छान पणे समोरच्या समोर प्रेझेंट होऊ यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. असं जगा की समोरच्याला आपल्याकडे बघून जगण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याला तुमचा हेवा वाटला पाहिजे. त्याच वेळेला तुम्ही आतून खुश व्हाल. आणि मग त्याच वेळेला तुम्हाला कुणाचीही गरज लागणार नाही.

 

अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे आपल्याला आपला सेल्फ रिस्पेक्ट कमावा लागत नाही आणि व्यक्ती आपल्याला देखील महत्त्व देऊ लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *