मित्रांनो, आपला प्रत्येकांना वाटत असते की आपण नेहमी खुश रहावे. आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला शंभर टक्के आनंदी राहता येईल. त्या गोष्टी कोणत्या? याच्यात माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
1. रिकाम मन सैतानाच घर असतं, त्याकरता स्वतःला आवडता छंदामध्ये गुंतवा, सतत काहीतरी करत रहा.
2. रोजचं काम करताना आवडीचं गाणं बॅकग्राऊंडला चालू असू द्या. आवडतं गाणं पुन्हा-पुन्हा ऐका आणि गुणगुणत रहा.
3. चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना द्या.
4. दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका आणि दुसऱ्यांच्या यशावर जळू देखील नका.
5. तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे मदत न करणाऱ्यांकूङ्गे पुर्णतः दुर्लक्ष करा.
6. कोणत्याही विषयावर अति विचार करणं थांबवा.
7. महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.
8. आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे, ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा. म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागल.
9. समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. म्हणजे तो आनंदी झाला की भरपूर आपणही आनंदी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला.
10. चांगले विचारांचं एखादं छोटसं पुस्तक स्वतः जवळ बाळगा आणि त्यातला एखादा विचार घेऊन त्याच्यावर चिंतन करा.
11. चालण्याची गती थोडी वाढवा, ताठ मानेने स्मित हास्य व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजामध्ये वावरा.
12. लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा.
13. जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या आणि त्यासाठीच दीर्घ श्वसन करा.
14. स्वतःच्या चांगल्या पेहरावतील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल सतत नजरेला पडेल असा ठेवा.
15. एखादी बाग, देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा-पंधरा मिनिटे घालवा.
16. नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून उत्साह पूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा.
17. विनोदी सिरीयल पाहताना खळखळून हसा आणि आपल्या शरीराची हालचाल होऊ द्या.
18. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा.
19. दुसऱ्यांसोबत तुमची स्वतःची तुलना करणे थांबवा. तुम्ही जसे आहात तसच स्वीकारा.
20. भविष्याचा अतिविचार करण थांबवा.
21. पुरेशी शांत झोप घ्या. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.
22. दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणं म्हणजे आर्थिक बचत करणं आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवण आहे.
23. ज्या गोष्टी तुम्हीला पटत नाही त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात कुढ नका.
24. दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा.
25. नेहमी सकारात्मक, पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसापासून स्वतःला दूर ठेवा.
26. आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करा.
27. तणावांपासून दूर राहा.
28. दररोज वीस ते पंचवीस मिनिटे उन्हामध्ये फिरा. यामुळे शरीराला विटामिन डी मिळते. काही वेळेला विटामिनच्या कमतरतेमुळेही तणाव वाढतो.
29. घरामध्ये कुत्रा किंवा मांजर पाळल्यामुळे आपला आनंद निश्चितच वाढतो.
30. समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका. यामुळे आपल्यालात्रास होत नाही. क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर विश्वास ठेवा.
31. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा किंवा मनापासून काम करा.
32. कधीही रिकामे राहू नका, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
33. दुसरा कोणी आपले लाड करेल याची वाट पाहत बसू नका, स्वतःचे लाड करा.
34. इतरांशी स्वतःची तुलना कधीही करू नका.
35. वर्तमानात जगा भूतकाळ आठवण पश्चाताप करणे आणि भविष्यकाळाचा विचार करण थांबवा.
36. ध्येय निश्चित करा आणि त्याच दिशेने कार्य करा.
37. मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देऊ नका.
अशाप्रकारे यात आहे गोष्ट आहे की ज्याचा आपण अवलंब केला तर आपण कधीही दुखी होऊ शकणार नाही. नेहमी आनंदी राहू..