मित्रांनो गरुड पुराणामध्ये विष्णू देव आणि त्यांचे अतिप्रिय असलेले वाहन गरुड यांच्यातील संवाद सांगितलेला आहे. या पुराणांमध्ये आत्महत्या नंतर आत्म्याचे काय होते हे सांगितले आहे. हिंदू शास्त्रानुसार मृत्यूच्या नंतर आत्म्याच्या तीन हालचाली सांगितलेले आहेत. पहिली ऊद्वगामी हालचाल, दुसरी स्थिर हालचाल, तिसरी अधोगती हालचाल या तीन हालचालींमध्ये आत्म्याचे रूपांतर होते. सर्वप्रथम आत्महत्या हा शब्द चुकीचा आहे. कारण आत्मा कधीही मरत नाही आत्मा अमर असतो हत्या होते. ती देहाची याला आपण देह हत्या असे म्हणू शकतो. ज्यावेळी दुसऱ्याची हत्या केली जाते त्यावेळी ब्रह्मदोष निर्माण होतो. आणि स्वतः आत्महत्या करणे हा देखील खूप मोठा दोष आहे. कारण या जगामध्ये राहण्यासाठी आपल्याला एका देहाची म्हणजे शरीराची गरज असते. ज्यावेळी आपल्याला देह प्राप्त होतो त्यावेळेस आपला जन्म होतो. आणि जगामध्ये राहण्याची आपल्याला परवानगी मिळते.
ज्या शरीराने आपल्याला या जगामध्ये राहण्याची परवानगी दिली, या जगाला पाण्याची क्षमता दिली, आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा या देहानेच आपल्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे या देहाची हत्या करणे म्हणजेच आत्महत्या करणे खूप चुकीचे आहे. आणि सर्वात मोठे पाप देखील आहे. जरा विचार केला तर या जगामध्ये सर्वात जवळची गोष्ट आपल्याला काय आहे ते आपल्याला कळेल या जगात आपल्याला सर्वात जवळची गोष्ट म्हणजे आपला देह आहे. वैदिक शास्त्रामध्ये आत्मघात की आणि वाईट व्यक्तींबद्दल सांगितलेले आहे. आत्महत्या केलेले लोक यांना अंधारापेक्षाही हीन असलेल्या ठिकाणी ठेवले जाते. जीवन आणि मृत्यूच्या प्रत्येक प्रकाराचे वर्णन गरुड पुराणांमध्ये केलेले आहे. आत्महत्या करणे खूप वाईट समजले जाते कारण माणसाला कितीतरी जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो.
आणि मिळालेला हा मनुष्य देह त्याची आत्महत्या करणे म्हणजे खूप मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्याला आपल्या वाट वडिलांनी देखील सांगितले आहे. तसेच आपल्या गरुड पुराणांमध्ये देखील हे सांगितले आहे की, ज्या व्यक्ती आत्महत्या करतात त्यांचा आत्मा कधीही पर लोकात जात नाही. तो आपल्यातच फिरत असतो. त्या आत्म्याला शांती कधीही मिळत नाही. आणि त्यांना देह देखील प्राप्त होत नाही अशा आत्म्यांचा कालचक्र पूर्ण झाल्याशिवाय त्या आत्म्यांना शांती मिळत नाही. तो आत्मा भटकत राहतो त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आत्म्याला कोठेही निवास मिळत नाही. आणि यांचे जीवन खूप वेदनादायक असते त्यामुळे जीवनाचे चक्र समजून घेणे खूप गरजेचे आहे. ज्याप्रमाणे पिकलेले फळ खाण्यास योग्य असते झाडाला लागलेले फळ पिकल्या शिवाय झाड त्याला गळून पडू देत नाही. त्याचप्रमाणे सर्व आयुष्य जगून मरतो तो चांगल्या आयुष्यासाठी निघून जातो.
असे मानले जाते की, मानवी आयुष्याचे सात टप्पे आहेत. पहिला पूर्ण झाल्याशिवाय दुसरा टप्पा कधीही सुरू होत नाही .या टप्प्यांचे देखील काही नियम आहेत. जर आखाली मृत्यू झाला किंवा आत्महत्या केली तर यामध्ये गोंधळ उडतो नैसर्गिक रित्या मृत्युमुखी पडलेले आत्मे कधीही इतरत्र भटकत नाहीत. त्या आत्म्यांना शांती मिळून ते पर लोकात जातात. त्यांचे सातही टप्पे पूर्ण झाल्यामुळे त्या आत्म्यांना तृप्ती मिळते. आणि ज्यांचे सातही टप्पे पूर्ण झालेले नाहीत त्यांना इतरत्र भटकत राहावे लागते. आपल्याला जर वाटत असेल मृत्यूनंतर आपल्याला लगेच मनुष्य जन्म मिळत असेल तर ते चुकीचे आहे. मृत्यूनंतर देह मिळतो तो देह मनुष्याचा असेल किंवा इतर कोणत्याही प्राण्याचा असेल. शास्त्रानुसार मृत्यूनंतर तीन दिवसांनी आत्मा दुसरे शरीर ग्रहण करते त्यामुळे मृत्यूनंतर तीनवी साजरी केली जाते.
ज्या पद्धतीने तिने मी साजरी केली जाते त्याच पद्धतीने दहावी आणि बारावी देखील साजरी केली जाते. कारण कोणते कोणते आत्मे दहाव्या दिवशी किंवा बाराव्या दिवशी देह परिणाम करतात. सव्वा महिने, सहा महिने दिवस झालेल्या आत्म्यांना शरीर मिळत नाही. त्या लोकांच्या मृत्यू आत्महत्या किंवा अपघात यामुळे झालेले असतात. अशा लोकांना शरीर मिळत नाही. त्यामुळे त्यांचा आत्मा इतरत्र भटकत राहतो. त्यामुळे आत्महत्या करून मृत्य ओढवून घेणे चुकीचे आहे. ज्याचा वर्तमान काळ नसतो जो भूतकाळात जगत असतो. त्याला भूत असे म्हणतात वर्तमानामध्ये अडकलेला आत्मा भूत बनतो. ज्या व्यक्ती भूतकाळ भविष्यकाळामध्ये आपले जीवन जगतो. तो भूत तयार होतो जो वर्तमान मध्ये जगतो त्यालाच मुक्ती मिळते. त्याची पुढची वाटचाल चांगली होते आत्म्याचे तीन स्वरूप मानले आहेत एक जीवात्मा प्रेतात्मा स्वरूतात्मा असे तीन स्वरूप मानले आहेत.
अकाली मृत्यू म्हणजे काय आकाल म्हणजेच अकाली मृत्यू होय. प्रत्येक व्यक्तीला देवाकडून तो निसर्गाकडून एक विशिष्ट वय मिळालेले आहे. एखाद्या व्यक्तीचा खून अपघात किंवा आजारपणाने मृत्यू झाला तर त्याला अकाली मृत्यू असे म्हणतात. वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे आत्महत्या करणे खूप मोठे पाप आहे. शास्त्रामध्ये आत्महत्या करणाऱ्याला खूप मोठी शिक्षा होते, असे सांगितले आहे. आत्महत्या करणे म्हणजे देवाचा अपमान करणे आहे. ज्या व्यक्ती अपमान करतात त्या भुतांमध्ये रूपांतर होतात आणि विशिष्ट वेळा पर्यंत त्यांना त्या आत्म्यामध्ये राहावे लागते. ज्यावेळी आत्मा भुतांमध्ये रूपांतर होतो. त्यावेळी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो भुतांची अस्वस्थता त्यांच्या जवळच्या लोकांना अस्वस्थ करून सोडतात ज्या व्यक्ती आजारपणाला कंटाळून किंवा अन्य कोणत्याही समस्याला कंटाळून जर आत्महत्या करत असेल तर त्याला मुक्ती सहजासहजी मिळत नाही. हिंदू शास्त्रानुसार एखाद्या लगेचच मनुष्यजन्म मिळू शकतो. मात्र त्या व्यक्तीची समाजातील वागणूक चांगली असायला पाहिजे आणि ती व्यक्ती मरत असताना त्याच्या कोणत्याही इच्छा नसायला पाहिजे तरच त्या व्यक्तीला मनुष्य जन्म लगेच मिळतो.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या लेखांची माहिती घेण्यासाठी आताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.