मन फ्रेश करणारे 2024 चे सुंदर सुविचार… प्रेरणादायी मराठी सुविचार…

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये कोणकोणते ज्येष्ठ नागरिक असतील आणि काही कालांतरानंतर त्यांच्या बोलण्या वागण्याचा आपल्याला तिरस्कार होऊ लागतो आणि त्यामुळे आपण त्यांचा तिरस्कार करू लागतो. परंतु असे करणे अत्यंत चुकीचे आहे. एखादे झाडाला पान पिकलेले असल्यास तर ते तोडने खूप चुकीचे आहे. ते कालांतराने आपोआप गळून जातो.

 

त्याचप्रमाणे हे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या वेळेनुसार या जगातून दूर निघून जातात आणि त्या वेळेला आपल्याला त्यांची खूप आठवण येते. परंतु इतकी आठवण येऊन देखील ते पुन्हा आपला घरी कधीही परत येत नाहीत. म्हणून त्यांचा कधीही तिरस्कार करू नये. असेच काही सुंदर सुविचार आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आपण ज्या परिस्थितीत असतो ती परिस्थिती भगवंताने आपल्यावर लादलेली नसते तर ती परिस्थिती आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली असते.

पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा माणसाला गर्व असावा…

जीवन एक दिवसाचं असो किंवा चार दिवसांचं.! आयुष्य असं जगा, जसं जीवन तुम्हाला नाही तर जीवनाला तुम्ही भेटला आहात.

जास्त विचार करू नका कारण एवढं पण कॉम्प्लिकेटेड नाही आहे आयुष्य जेवढं तुम्हाला वाटतंय..! मार्ग भेटेल प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्या गोष्टी तेव्हाच होतात आपण कितीही काहीही केलं तरी.!

भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गुपचूप मनाच्या गाठोड्यात बांधून ठेवायचं शब्दात मांडत बसला, की पायाखाली तुडवलं जात असतं !

दुसऱ्याला जीव लावण्याच्या नादात ते गमावू नका, ज्यांनी तुम्हाला या जगात आणलंय.! सांभाळलंय आणि मोठं केलंय आणि तुम्हाला आयुष्यात आनंद दिलाय.!

एका स्त्रीला तिच्या सौंदर्यानुसार आदर दिला जातो आणि पुरुषाला त्याच्या खिशातल्या पैशानुसार.!

स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडायला लागतात, मग ते काळे असो किंवा गोरे असो.!

माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल, तर कारणं सापडतात…

विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत.!

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच परत मिळणार नाहीत.

जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजावून सुद्धा सांगते, ती व्यक्ती योगायोगाने नाही तर नशिबाने भेटत असते.

आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख हे तेव्हा होतं जेव्हा आपली काही चुक नसताना लोकं आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात..

चांगलं कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते, तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला, तरी ती तरुण जाते.!

एटीट्यूड दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही पण स्माईल देऊन बघा, आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही..

हसल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं आपल्या हसण्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून येतं. हस्यामुळे नात्यात आपलेपणा निर्माण होतो, म्हणून नेहमी हसत रहा निरोगी रहा आणि आपल्याबरोबर इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा.

कुटुंबाचा हात हा घरून चला तरच लोकांचे पाय धरण्याची गरज भासणार नाही.

जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नसतं, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्त्वाचं असतं..

स्मितहास्य अशी वक्ररेषा आहे की जी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते म्हणून नेहमी हसत रहा, आनंदी राहा आणि निरोगी रहा.

आधार देणारा हात हा रिकामा असला तरी चालेल पण मन मात्र निर्मळ असायला हवं!

जोपर्यंत माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय अपेक्षा ठेवतोय, नको ती बड़बड़ करतोय, तोपर्यंत माणूस आपला असतो.. ज्या दिवशी त्यांनी या सगळ्या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं माणसाला तुम्ही गमावलं आहे..

स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचं सर्वात महत्त्वाचं स्वरूप असतं.

परिस्थिती कशीही असो समजून घ्यावं स्वतःला.! सावरून घ्यावं स्वतःला तुमच्यासाठी तुम्हीच खंबीर व्हावं.!

इच्छेला म्हातारपण नसतं.

वेळेला वापरून घेणारी लोकं कधीच आपली नसतात.

सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये फरक एवढाच असतो की सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका पाहून रंग बदलतो.

कोणाची लायकी काढण्या अगोदर एवढा जरूर विचार करा, की आपली तेवढी लायकी आहे का..?

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *