जांघेत येणारी खाज, खुजली, गजकर्ण, खरुज, नायटा फक्त एका दिवसात मुळापासून गायब करणारा १००% प्रभावी घरगुती उपाय ! डॉ; स्वागत तोडकर टिप्स

आरोग्य टिप्स

मित्रांनो, त्वचेसंबंधित अनेक समस्या प्रत्येकाला जानवताना पाहायला मिळते. यामुळे आपल्या सौंदर्यात कमीपणा येतो. जांघेमध्ये होणारी खाज आणि या खाजेमुळे होणारे त्वचेचे रोग, हे अनेक प्रकारचे आहेत. परंतु ह्याचे मूळ हे एकच असते. या मुळाचा नायनाट करण्यासाठी अतिशय सोपे साधी असे घरगुती उपाय यांची माहिती आज आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, अनेकवेळा आपण लाजे पोटी हा आजार लपवत असतो. दवाखान्यात जाण्याचे टाळतो. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी जर आपणास खाज झाली तर ती आपल्याला खाजवता येत नाही. तसेच जास्त खाजवायला मुळे त्वचा ही आपली लाल पडते. त्याच्यामुळे अनेक इन्फेक्शन होतात. त्यामध्ये फंगलइन्फेक्शन, इस्ट इन्फेक्शन या सगळ्या इन्फेक्शन यांचा समावेश होतो.

मित्रांनो आज आपण त्वचारोग यावर उपाय पाहणार आहे. विशेष करून जांघेमध्ये येणारी खाज आणि या खाजेमुळे होणारे त्वचारोग अनेक प्रकारचे आहेत. परंतु याच जे मुळ आहे ते एकच असते आणि या मुळाचा नायनाट करण्यासाठी अतिशय सोपा घरगुती उपाय पाहणार आहे. बघा बऱ्याचवेळा आपण डॉक्टरकडे जाणे टाळतो. अनेकवेळा लाजेपोटी आपण हा आजार लपवतो.

त्याच्यामुळे यामध्ये अनेक इन्फेक्शनस होतात. फंगल इन्फेक्शन असेल, इस्ट इन्फेक्शन असेल अनेक प्रकारची इन्फेक्शनस होतात. सगळ्यावर अतिशय प्रभावी आहे. आणि एकदाच जरी मलम लावला तर फरक पडायला सुरुवात होणार आहे. हा मलम तुम्ही सहज घरी बनवू शकता. यामध्ये पहिला घटक वापरणार आहे तो म्हणजे कापूर. यामध्ये अँटीइन्फलामेंटरी, अँटीफंगल गुण यामध्ये आहेत. फंगल इन्फेक्शन असेल तर कापरामुळे लगेच बरे होते. त्यानंतर आपण वापरणार आहे नारळाचे तेल. नारळ तेल आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते आणि डोक्याला नारळ तेल लावत असतो.

मित्रांनो आपल्या त्वचेला मुलायम करण्यासाठी तसेच अनेक प्रकारचे त्वचारोग घालवण्यासाठी नारळ तेलाचा वापर केला जातो. त्याचबरोबर शेवटचा घटक लागणार आहे तो म्हणजे बोरीक पावडर. बोरिक पावडर सर्वांना माहीत असेल. मित्रांनो धान्यांना कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर वापरली जाते किंवा कॅरमच्या खेळात सोंगट्या चांगल्या पळण्यासाठी नक्कीच बोरिक पावडरचा वापर केला जातो.अशी ही बोरिक पावडर आपण यात वापरणार आहे. कृती अशी करायची आहे. एक कापूर हाताने बारीक करून घ्यायचा आहे. यानंतर बोरिक पावडर एक चमचा यामध्ये घ्यायची आहे. बोरिक पावडर ही मेडिकल मध्ये सहज उपलब्ध होते.

मित्रांनो साधारण एक चमचा आपण बोरिक पावडर यामध्ये घ्यायची आहे. यानंतर शेवटचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल तसही त्वचेला लावलं तर त्वचा मुलायम होते. मित्रांनो फंगल इन्फेक्शन असेल तर नुसत्या खोबऱ्याच्या तेलाने सुद्धा फरक पडतो. अशा प्रकारे हे जे खोबऱ्याचे तेल आहे ते दोन चमचे टाकणार आहे. यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. बोरिक पावडर, कापूर आणि नारळाचे तेल एकजीव व्हायला काही वेळ लागणार नाही. सहज ते एकजीव होत असते.

असे हे मिश्रण जांघेमध्ये किंवा जिथे खाज येते किंवा कुठेही त्वचारोग झाला असेल त्या ठिकाणी लावायचे आहे. शक्यतो रात्री झोपण्याच्या वेळेस लावले आणि रात्रभर ठेवले तर सकाळी अंघोळ करताना धुवून जाणार आहे. चांगल्याप्रकारे फरक पडणार आहे. पहिल्या दिवसापासून तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *