मित्रांनो आपल्या आसपास खूप सार्या वनस्पती आहेत आणि वनस्पती या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर असतात. तसेच वनस्पतींपासून आपल्याला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देखील मिळतो. तर आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती या असतातच आणि यांचा वापर आपण आरोग्याच्या दृष्टीने जर केला तर यामुळे खूप सार्या आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. परंतु कोणत्या वनस्पतींचा फायदा हा आपल्या कोणत्या आजारावरती होतो हे माहीत नसल्याकारणाने आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण मग या वनस्पतींचा लाभ ही घेत नाहीत.
तर आज मी तुम्हाला अशी एक वनस्पती सांगणार आहे. या वनस्पतीचा वापर जर तुम्ही केला तर यामुळे तुमचे लाखो आजार नक्कीच कमी होतील. तर ही वनस्पती जर तुम्हाला भेटेल तर तुम्ही नक्कीच आपल्या घरी घेऊन या आणि याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा वापर देखील करा. तर ही वनस्पती आहे ती म्हणजे दुधी घास.
मित्रांनो दुधी घास वनस्पती तुम्हाला नजरेस मिळेल तर ही वनस्पती जर तुमच्या शरीरावरती म्हणजेच चेहऱ्यावरती पिंपल्स असतील आणि तुमचा चेहरा हा चमकदार नसेल तर यासाठी ही वनस्पती खूपच फायदेशीर आहे. तर तुम्ही या वनस्पतीचे जी पाने आहेत ही पाने तोडल्यानंतर त्यातून तुम्हाला दूध बाहेर पडल्यासारखे दिसेल आणि हेच दूध तुम्ही आपल्या जर चेहऱ्याला लावला तर यामुळे तुमचा चेहरा हा खूपच सुंदर दिसायला लागेल चमकदार दिसेल.
तसेच तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स असतील ते देखील दूर होतील. तसेच मित्रांनो जर तुम्हाला सर्दीचा त्रास असेल तर तुम्ही दुधी घास या वनस्पतीची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि दोन काळी मिरी घेऊन त्यामध्ये तुळस मिक्स करून तुम्ही सेवन केला तर यामुळे तुमच्या जे काही सर्दीचा त्रास आहे तो नक्कीच कमी होणार आहे.
तसेच मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या पोटामध्ये किडे झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी सांगितलेला असेल तर तुम्ही या दुधी घास ची पावडर तयार करायची आहे आणि ती पावडर तुम्ही पाण्याबरोबर अर्धा अर्धा चमचा अशा पद्धतीने सेवन करायची आहे. यामुळे तुमच्या पोटातील किडे नक्कीच गायब होतील.
तसेच मित्रांनो तुम्ही दुधी घासच्या पानांचा रस आणि कनेरीच्या पानांचा रस दोन्ही मिसळून जर तुम्ही आपल्या केसांना लावला तर तुमची केस गळतीची समस्या नक्कीच कमी होईल आणि नवीन केस उगवण्यास मदत होईल. तसेच मित्रांनो 100 ग्रॅम दुधी घास ची पावडर घेऊन त्यासमानच तुम्ही बारीक केलेली तुरटी मिक्स करून अर्धा चमचा पाण्याबरोबर दररोज सेवन केला तर तुमच्या शरीरामध्ये असणारी कमजोरी अशक्तपणा नक्कीच दूर होणार आहे.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे हे घरगुती उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमचे जे काही आजार आहे ते नक्कीच कमी होतील. तर अशा या दुधी घास या वनस्पतीचा वापर तुम्ही तुमच्या अनेक आजारांवर ती करू शकता आणि त्या आजारांपासून सुटका देखील तुमची होणार आहे.