मित्रांनो आपल्या घरामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, मका या वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आपण ठेवत असतो .जे शेतकरी लोक आहेत ते त्यांचे शेतातून धान्य काढून त्यांचे साठा करत असतात. व त्यांना ते वर्षभर कसे वापरता येईल याची ते काळजी घेत असतात. आपण सुद्धा सर्वसामान्य लोक वर्षभर पुरेल इतकी गहू ज्वारी, तांदूळ, बाजरी घेऊन ठेवतो. व त्याची काळजी आपण किड्यापासून किंवा टोकी पासून ठेवत असतो.
तर आपण ते किडे होऊ नये म्हणून काही उपाय करतो. ते म्हणजे दुकानामधून किंवा मेडिकल स्टोर मधून आपण धान्याची पावडर आणतो. ते धान्याची पावडर टाकल्यामुळे किटाणू थोडेफार नाहीसे होतात .पण त्याच्यामुळे आपण ज्वारीमध्ये किंवा तांदळामध्ये ती पावडर टाकल्यामुळे त्याचा वास हा त्याच्यामध्ये राहतो.
मित्रांनो मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही एक वेल टाकल्यानंतर त्यामध्ये असलेले किडे नाहीसे होणार आहेत व पळून सुद्धा जाणार आहेत.आणि ते कायमस्वरूपी जितकं तुम्हाला ते साठवून ठेवायचे आहे तितके दिवस ते साठवून ठेवू शकता.
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मुख्य कारण म्हणजे चांगले असणारे आहार. तेच जर आपल्याला चांगले नाही मिळाले तर आपले आरोग्य बिघडू शकते. त्याच्यामुळे आपण आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. व जे चांगले आहे तेच आपण खाल्ले पाहिजे.
जर खराब अन्न खाल्लं तर त्याचा परिणाम आपल्याला आपल्या तब्येतीवर होऊ शकतो. व आपल्याला वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात .जर आपल्या शेतामध्ये तांदूळ किंवा गहू खराब निघाले तर त्याचा मार्केटमध्ये कवडीमोल सुद्धा भाव होत नाही. तर त्याला जे मार्केटमध्ये घेणारे व्यक्ती असतात ते त्याची किंमत फारच कमी करून घेतात.
त्याच्यामुळे आपल्याला त्याचे खूप नुकसान होते . शेतकरी किंवा सर्वसामान्य जे घरात धान्य आणून ठेवतात .त्या सर्व व्यक्तींना माहीत पाहिजे की धान्यांमध्ये किडे आळ्या कशामुळे होतात. व ते नाहीसे होण्यासाठी आपण कोणता उपाय केला पाहिजे.
आपण वर्षभर पुरेल इतके म्हणजेच की बारा महिने आपल्याला जाईल इतके आपण धान्य साठवून ठेवत असतो. व त्या साठवलेल्या धान्यामध्ये 12 प्रकारचे किडे होतात. त्या किड्यांचे नाव व त्या किड्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत चला तर आता आपण जाणून घेऊया .
यातला पहिला किडा म्हणजे सोंड ,अळी, खापरखेडा, व तांदळातील पतंग ,अशा अनेक प्रकारचे किडे होतात.ते किडे जास्त करून पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पावसामध्ये असलेले त्यांचे वातावरण किंवा आद्रता यामुळे पावसामध्ये जास्त धान्य खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जास्त धान्यांवर लक्ष दिले पाहिजे.
कीटकनाशक हे जास्त दिवस नसतात पण ते एक ते पंधरा दिवस हे असतात. त्यांची प्रजनन क्षमता जास्त असल्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढत असते .तर जे मी तुम्हाला वरती किड्यांचे प्रकार सांगितले ते किडे शेतामध्येच जेव्हा आपण धान्य पेरलेले असते. त्याच्याबरोबर असते किड्यांचा समावेश तिथूनच होऊन जातो.
आपण धान्य गोणी मध्ये किंवा पोत्यामध्ये साठवून ठेवत असतो. त्यामध्येच किडे आत जाण्यासाठी त्यांना जागा बघत असतात.त्यामुळे आपण जे पोत्यामध्ये किंवा गोणीमध्ये जे आपण धान्य ठेवलेल आहे. ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधून घ्यायचे आहे. किंवा चांगल्या पोत्यामध्ये ते धान्य ठेवायचे आहे. आपल्याला त्याची जास्त दक्षता घेतली पाहिजे व खबरदारीने आपल्याला सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत.
पहिली गोष्ट म्हणजे की धान्य चांगले वाळवावे. जोपर्यंत धान्य वाळत नाही तोपर्यंत ते पोत्यामध्ये किंवा आणखी कशामध्ये तुम्हाला ठेवता येणार नाही.आणि ते चांगले वाळल्या शिवाय पोत्या मध्ये भरू नये .आपण ज्याच्या मध्ये धान्य ठेवणार आहे ते कायम स्वच्छ व चांगले असले पाहिजे.
जुने पोती जर आपल्याला वापरायचे असेल तर ते पहिला स्वच्छ धुऊन वाळवून घ्यायची आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये धान्य भरायचे आहे. आणि मुख्य म्हणजे धान्य ठेवायची जागा ही स्वच्छ व कोरडे असली पाहिजे. जेणेकरून तिथे पाणी पडणार नाही किंवा पाण्याचे काही संबंध देखील येणार नाही. अशा जागी ही पोती ठेवायची आहेत.
आपण जर पोत्यामध्ये धान्य साठवणार असेल तर त्या पोत्यांच्या खाली बांबू किंवा ताडपत्री अशा वस्तु 1 खाली अंतरायचे आहे.असं केल्याने जो जमिनीमध्ये ओलावा आहे तो होताना लागणार नाही. व आत मध्ये काही आपले धान्य असेल ते खराब होणार नाहीत. अश्या प्रकारे आपल्याला धन्यांची काळजी घ्यायची आहे. व ते धान्याची काळजी घेऊन झाल्यानंतर आपल्याला जे आपले धान्य आहे ते वर्षभर टिकवायचे आहे तर ते वर्षभर टिकवण्यासाठी नक्की कोणता उपाय करावा. चला तर आता मग आपण जाणून घेऊया.
मित्रांनो मी तुम्हाला एक वनस्पती सांगणार आहे तर त्या वनस्पतीचा वापर तुम्ही तुमचे धान्य साठवून ठेवलेले आहे ते खराब होऊ नये यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर आपल्याला त्याच्यासाठी दोन वनस्पती लागणार आहेत. तर ती कोणती वनस्पती आहे ते आता आपण बघूया.
पहिली वनस्पती जी आहे ती म्हणजे गुळवेल गुळवेलचा वापर याच्यासाठी केला जातो की त्याच्यामुळे किडे मुंग्या होत नाहीत. किडे मुंग्यां न होण्यासाठी हा गुळवेल फायदेशीर ठरतो. गुळवेल चा वापर करताना गुळवेल चा बारीक बारीक तुकडे करावे आणि जशास तसे आपण त्याच्यामध्ये वेल ठेवली तर त्याचा जास्त करून आपल्याला फायदा होतो.
आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी एक वस्तू लागणार आहे.ती म्हणजे कडुलिंब आपण त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला किंवा कडुलिंबाच्या काड्या जरी घेतल्या तरी चालतील. जर तुम्ही पोत्यामध्ये टाकणार असाल तर त्याचे दोन-तीन गुळवेलच्या कांड्या आणि कडुलिंबाची पाने पहिल्यांदा खाली टाकून घ्यायचे आहेत.व त्याच्यानंतर वरती एक बाजूला टाकायचे आहेत. जर जास्त करून ज्यांच्या घरामध्ये मुंग्या किडे होत असेल तर त्यांनी याच्या जरा जास्त प्रमाणात वापर केला तरी चालू शकेल.
तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे ओलसरपणा आलेला असेल तर तुम्ही पेपर टाकून घेऊ शकता .कारण पेपरमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. व आद्रता सुद्धा असते. तर मित्रांनो मी जे तुम्हाला वरती उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की करून पहा याच्यामुळे तुमचे धान्य खराब होणार नाही किंवा त्याच्यामध्ये किडे सुद्धा होणार नाहीत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.