मित्रांनो आपण जेव्हा मनोगत आपल्या देवाची आपल्या भगवंताची पूजा करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येणे किंवा आपल्याला झोप येणे, जांभई येणे, आळस येणे अशा गोष्टी सातत्याने आपल्या बाबतीत घडत असतात. आपण भक्ती तर मनोभावे श्रद्धेने करतो मग हे असे का होते याचा प्रश्न आपणाला नेहमी पडतो. ज्याचे उत्तर आपणाला आपण कितीही भक्ती मार्गात असलो तरी ते आपल्या लक्षात येत नाही.
तर मित्रांनो आज आपण याच गोष्टी आपल्या का घडतात हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता किंवा नाव असून करता तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी का येते हे आता आपण पाहू. जेव्हा आपण मनोभावे किंवा श्रद्धेने आपण पूजा नामस्मरण करत असतो तेव्हा आपले मन एकाग्र झालेले असते. आणि आपण भक्तीत रमलेलो असतो.
त्यामुळे आपण सर्व आपल्या भौतिक जगापासून दूर झालेलो असतो आणि आपली भक्ती परमेश्वरचरणी स्वामींचे चरणी पोचलेली असते. असाच हा अनुभव असल्याने आपल्या डोळ्यात पाणी येत असते.
त्याचबरोबर मित्रांनो आपणाला पूजा करत असताना किंवा नामस्मरण करत असताना झोप किंवा आळस का येतो हे जर पहायचे झाले तर मित्रांनो याचेही प्रमुख कारण आपली भक्ती हेच आपल्याला दिसून येईल. कारण जेव्हा आपण भक्तीत रंगलेला असतो तेव्हा आपण आपल्या मनातील सर्व क्रोध, राग, मोह माया, आपल्या मनातील वाईट गोष्टी या सर्व आपण विसरून गेलेलो असतो आणि आपले मन त्यावेळी एकाग्र होऊन भक्तिमार्गात ठरवलेले असते आणि सात्विक झालेले असते.
पण या आधी आपल्या मनाला याआधी क्रोध राग मोह, माया आणि भौतिक सुखाची तसेच वाईट गोष्टींची तसेच आळस करून निवांत राहण्याची चांगली सवय झालेली असते. आणि जेव्हा आपण भक्ती मार्गात लागतो. तेव्हा या गोष्टी हे सर्व होऊ देत नाहीत. हे असे का होते हे आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहू…
मित्रांनो समजा जर एखाद्या खुर्चीवर कोणी बसला असेल तर तो बसताना सहजरीत्या बसू शकतो. मात्र उठताना तो आपणाला सहज उठून जागा देत नाही. कारण जेव्हा तो खुर्ची सोडेल तेव्हा आपणाला ओरडेल, काहीतरी प्रस्ताव ठेवेल, आपल्याशी त्याचे वाद विवाद होतील आणि काहीही होऊ शकतं. या सर्व गोष्टी झाल्यानंतरच आपणाला त्या खुर्चीवरील ती जागा मिळते.
स्वामींच्या तसेच देवाच्या भक्तिमार्गात देखील असेच आहे आपण आतापर्यंत भौतिक सुखात आणि या कलियुगाच्या जगात वावरत असताना बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी मनात ठेवून जगत असतो वावरत असतो. आणि जेव्हा तुम्ही स्वामींचे चरणी भक्ती भावाने नामस्मरणाने श्रद्धेने सेवा करतो प्रार्थना करतो तेव्हा आपले मन सहजासहजी या गोष्टींना तयार होत नाही. त्यामुळे आपणाला आळस येणे कंटाळा येणे अशा गोष्टी आपल्या व्यक्तीच्या वेळी घडत असतात.
तर मित्रांनो यावरून आपण असाही बोध घेऊ शकतो की स्वामींची चरणी तसेच भक्ती मार्गात जेव्हा आपण जाणार तेव्हा सात्विक विचार, सात्विक आहार या गोष्टी पाहत आपल्या भगवंताची आपल्या स्वामींची पूजा नामस्मरण हे अत्यंत भक्ती भावाने आणि श्रद्धेने केले पाहिजे. क्रोध मोह माया यापासून दूर राहिले पाहिजे. अध्यात्म मनापासून समजून घेतले पाहिजे. तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल. आपले तसेच आपल्या मुला बाळांचे संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. त्याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.