दाढी मिश्या ठेवण्याचा व त्या कोरण्याचा ट्रेंड गेल्या तीन ते चार वर्षात आलेला आपण पहिला आहे. हल्ली अनेक मोठ मोठे सेलेब्रिटी देखील अशा प्रकारे दाढी मिशा वाढवताना दिसतात. आणि तसे पाहायला गेले तर पिळदार अशा मिशा आणि रुबाबदार दाढी ही तर महाराष्ट्रियन मराठी पुरुषांची जुनी ओळख परंतु ती हळू हळू संपली व अगदी मागील तीन ते चार वर्षा पूर्वीपर्यंत दाढी काढून शेव करणे लोक पसंद करत. पण आता तो ट्रेंड संपला व पुन्हा रुबाबदार दाढी आणि पिळदार मिशा ठेवण्याचा ट्रेंड आहे.
दाढी वाढवणं बहुतांश पुरुषांसाठी खूपच अवघड काम असतं. कारण अनेक पुरुषांना काही ठराविक काळानतर दाढी वाढवल्यानंतर खाजेची समस्या उद्भवते.
आणि हा त्रास वाढू लागल्यानंतर अनेक पुरुष दाढी काढून टाकणं किंवा ट्रिम करणं पसंत करतात. मित्रांनो अनेकवेळा योग्य डाएट नसणं किंवा स्किन केअरचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळेही दाढीच्या वाढीवर फरक पडतो. या लेखात आम्ही तुम्हाला वेगाने दाट दाढी येण्यासाठीच्या उपायांची माहिती देणार आहोत. हे उपाय केल्यास तुम्हालाही सहज आणि लवकर दाट दाढी येऊ शकेल आणि त्याचबरोबर दाढीमुळे पुरुषांचा चेहरा भरीव दिसतो. परंतु, दाढी वाढवणे आणि दाढीची काळजी घेणे हे खूप मेहनतीचे काम आहे. पण दाढी वाढवण्याचे अवघड वाटणारे काम थोडेसे कष्ट आणि माहितीच्या आधारे सोपं केलं जाऊ शकतं.
तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर या रुपयामुळे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या गाडीमध्ये वाढ होत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी दाढी येत नाही त्या ठिकाणी आता दाढी येत आहे असेही दिसून येईल आणि मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची केमिकल्स किंवा औषधे आपल्या चेहऱ्यावर वापरायचे नाहीत मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि घरामध्येच असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आजचा आपण हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आज आपण उपाय करणार आहोत त्याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम म्हणजेच साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही.
तर मित्रांनो कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त लागणार आहेत एक म्हणजे खोबरेल तेल म्हणजेच नारळाचे तेल मित्रांनो तुमच्या घरामध्ये असणारा कोणत्याही पद्धतीचे खोबरेल तेल तुम्ही या उपायासाठी वापरू शकता आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कढीपत्ता मित्रांनो कढीपत्ता सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्येच सहज उपलब्ध असतो आणि यामध्ये असणारे पौष्टिक घटक हे आपले दाढी वाढवण्यासाठी किंवा केस वाढवण्यासाठी खूपच मदत करतात आणि म्हणूनच याचाही वापर आपल्याला आजच्या या उपाय करायचा आहे तर मित्रांनो यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे एरंडेलाचे तेल.
मित्रांनो आपल्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही दुकानांमध्ये किंवा मेडिकल मध्ये हे एरंडेलाचे तेल आपल्याला सहज उपलब्ध होतं, तर मित्रांनो अशा या तीन पदार्थांचा वापर करून आजचा हा उपाय करायचा आहे आपल्याला एका छोट्याशा भांड्यामध्ये खोबरेल तेल घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही प्रमाणात हे खोबरेल तेल घेऊ शकता कारण मित्रांनो आज आपण एक आयुर्वेदिक तेल तयार करणार आहोत आणि हे तेल आपण तयार केल्यानंतर एका भरणी मध्ये किंवा बाटलीमध्ये सहजपणे स्टोअर करून ठेवू शकतो आणि त्याचा वापर आपण अनेक दिवसांपर्यंत सहज करू शकतो.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्वात आधी खोबरेल तेल एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत मित्रांनो एक मूठ भरून कढीपत्त्याची पाने आपल्याला त्या गरम होत असलेल्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर या तेलाला व्यवस्थितपणे उकळी येऊन द्यायची आहे हे तेल व्यवस्थितपणे उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तेल व्यवस्थितपणे गाळून घ्यायचे आहे हे तेल गाळून घेतल्यानंतर आपल्याला ते एका बरणीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे एरंडलाचे तेल सुद्धा घालायचे आहे आणि त्यानंतर हे दोन्ही तेल आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तेल तयार केल्यानंतर आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने आपल्या चेहऱ्यावर म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला दाढी येते त्या ठिकाणी व्यवस्थितपणे दहा ते पंधरा मिनिटे मालिश करायचा आहे आणि त्यानंतर चेहरा न धुता आपल्याला तसेच झोपी जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ चेहरा धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर एक थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल आणि मित्रांनो हा उपाय करत असताना आपण आपल्या आहारामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक चाही वापर जास्त प्रमाणात करायचा आहे कारण यामुळेही आपल्याला दाढी वाढवण्यासाठी किंवा केस वाढवण्यासाठी खूप मदत होते.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.