मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी वेळ हा कोणाला मिळत नाही त्याच्यामुळे शरीराचे थोडेफार हे नुकसान होत चाललेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौंदर्य आहे आपण कसे दिसतो हे देखील खूप महत्त्वाच आहे तर मित्रांनो आज काल धावपळीमुळे आपल्या चेहऱ्यावरती अनावश्यक असे केस देखील येत असतात ते रिमूव करण्यासाठी आपण वेगळे प्रकारचे व्याक्स करत असतो पण ते व्याक्स प्रत्येक जणांना परवडणारे नसते कारण त्याचे प्राईजेस खूप जास्त असतात आणि त्याचबरोबर त्याचा पेन देखील जे त्याचा त्रास देखील खूप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो तर आज आपण घरगुती पद्धतीने अनावश्यक केस कसे काढायचे याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते आणि आपण त्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. परंतु मित्रांनो अनेकांना आपल्या अंडरआर्म्स वरती काळेपणा असलेले आवडत नाही आणि त्यापासून तुम्हाला देखील जर सुटका हवी असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय अवश्य करा.
या समस्येमुळे कित्येक महिलांसाठी स्टायलिश कपडे परिधान करणे गैरसोयीचे जाते. काळवंडलेल्या अंडर आर्मपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या घरगुती उपाय जर केले तर यामुळे तुमची सुटका नक्कीच होणार आहे. तरी यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च पैसे करावे लागणार नाहीत. अंडरआर्म्सची त्वचा उजळण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये भरपूर प्रमाणात उपयुक्त सामग्री मिळतील. सोप्या घरगुती टीप्समुळे काखेतील काळेपणा दूर होईल.
मित्रांनो आपल्या शरीराचा कोणताही भाग काळा पडलेला असेल तर त्या ठिकाणी हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यामुळे आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही व याच्यासाठी आपल्याला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत हे सर्व गोष्टी आपल्या घरामध्येच उपलब्ध आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जी पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे कोलगेट आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लिंबू आपल्याला एक एकदम रसाळ असा लिंबू या ठिकाणी घ्यायचा आहे व त्याचे दोन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पांढरी टूथपेस्ट लागणार आहे तर ते कसे आपल्या स्किन वर लावायचं किंवा ज्या ठिकाणी आपले काळे डाग आहेत किंवा काळा भाग आहे त्या ठिकाणी कसं वापरायचं हे आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो ज्या ठिकाणी आपण हे लावणार आहोत ती जागा अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे आपली स्किनवर जिथे काळे डाग आहेत किंवा जिथे काळसरपणा आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोलगेट लावायचा आहे.
कोलगेट लावून पाच ते दहा मिनिटे आपल्याला नाजूक हाताने त्या ठिकाणी मालिश करून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनिटे मालिश करून झाल्यानंतर आपण जो अर्धा चिरलेला लिंबू आहे त्या लिंबूचा आपल्याला त्याच्यावर रस टाकायचा आहे व त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला स्क्रब करत राहायचं आहे.
पाच ते दहा मिनिटे ते आपल्याला स्क्रब करत राहिल्यानंतर तसेच सोडून द्यायचा आहे व थोड्या वेळाने आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघा याच्यामुळे तुमचा कोणताही पैसा खर्च होणार नाही व तुम्हाला जास्त त्रास देखील सहन करावा लागणार नाही.