मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत.ते सेवा करीत आहेत आणि अगदी आपण मनापासून स्वामींची सेवा करीत असतात. अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. असाच एका ताईंना आलेला स्वामी अनुभव आपण त्यांच्यात शब्दात पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो मी देखील पहिल्यापासूनच स्वामींची सेवा करीत आहे. मला स्वामींची सेवा करण्यामध्ये खूपच आनंद होतो. प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की माझा संसार हा सुखाचा व्हावा तसेच आयुष्यामध्ये मिळणारा जोडीदार हा खूपच चांगला असावा ही स्वप्ने मी देखील पाहिलेली होती. परंतु माझे हे स्वप्न अधुरीच राहिले.
माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी एक खूप चांगले स्थळ आणले आणि त्या मुलगा बरोबर माझा विवाह देखील केला. तो मुलगा अतिशय माझी काळजी घेत होता. तसेच त्याचे प्रेम देखील माझ्यावर खूपच होते. माझ्या घरी सासू-सासरे माझे मिस्टर आणि मी असा परिवार होता. परंतु नंतर काही दिवसांनी माझ्या संसाराला ग्रहण लागल्यासारखे झाले.
म्हणजेच माझ्या नवऱ्याला आमच्याच कॉलनीमधील एका बाईचा नाद लागला. हे फक्त मला अनेकांकडून कळाले होते. परंतु डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आणि कानांनी ऐकल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नव्हते. मला हे सर्व काही खोटे वाटत होते परंतु ज्या वेळेस मला अनुभव आला की माझा नवरा हा दुसऱ्या बाईच्या नादी लागला आहे त्यावेळेस मला खूपच दुःख झाले.
मला लग्नानंतर दोन वर्षांनी एक मुलगा आणि एक मुलगी झाली. त्यावेळेस मी ाझा नवरा माझ्याशी कसा वागतो आहे हे माझ्या आई-वडिलांना अजिबात सांगितले नव्हते. कारण माझ्या आई-वडिलांना माझी खूपच काळजी वाटत होती. त्यामुळे मी त्यांना काही सांगितलं नाही. मी सासू-सासर्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि ते मलाच गप्प बसवत होते.
नंतर माझ्या आई-वडिलांना ही गोष्ट कळल्यानंतर ते मला नेण्यासाठी आले परंतु मी त्यांना नकार दिला आणि माझा संसार नक्कीच चांगला होईल पहिल्यासारखा सुखी होईल असे मी त्यांना सांगितले. माझे स्वामी वरती खूपच मनापासून श्रद्धा होती आणि त्यावेळेस मला कोणाचाही आधार नव्हता. त्यावेळेस मी खूपच हतबल झाले होते आणि स्वामींशी खूपच भांडत होते की माझ्या जीवनामध्ये तुम्ही असे का केले.
नंतर नंतर तर माझे मिस्टर माझ्याशी बोलत देखील नव्हते. तसेच सासू-सासरे देखील मलाच गप्प बसवायचे. माझी मुले देखील माझ्याशी नीट बोलत नव्हती. काही दिवसांनी मला खूपच जीव नकोसा झालेला होता. मी एकटीच रडत होते अनेक जणांनी मला देवीच्या प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्या तसेच निर्जन उपवास देखील करण्यास सांगितले.
मी सर्व काही उपाय केले परंतु काहीच फरक होत नव्हता. त्यावेळेस मी मात्र स्वामी केंद्रातील ग्रुप ॲडमिन ताईंना फोन केला आणि माझी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी मला कॉल केला आणि त्यांनी मला आधार दिला. सर्व काही ठीक होईल आणि त्यांनी कॉन्फरन्स कॉल वरती प्रदीप दादांशी माझे बोलणे केले.
त्यावेळेस प्रदीप दादांनी मला सांगितले की तुझ्या संसार सुखाचा होईल तू फक्त गुरुचरित्र पारायण सात कर आणि अगदी मनाने, विश्वास ठेवून कर तुझा संसार नक्कीच सुखाचा होईल. त्यावेळेस मला सासू-सासर्यांनी स्वामींची सेवा करण्याची परवानगी दिली नाही. मग त्यावेळेस मी फक्त स्वामींची नामस्मरण चालू ठेवले.
परंतु प्रदीप दादांचे बोल माझ्या सतत कानी पडत होते. मी भाजीपाला आणण्यास गेल्यानंतर जी बाई तिने माझा संसार उध्वस्त केला होता ती मला म्हणायची की तुला आता तुझा नवरा divoce देणार आहे. तू फक्त घरातील काम करण्यासाठी तुला इथे ठेवलेले आहे. असे म्हटल्यानंतर मला खूपच वाईट वाटले. त्यावेळेस मी प्रदीप दादांना फोन केला आणि प्रदीप दादांनी गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात कर असे सांगितले.
मग मी पहाटे तीन वाजता उठून गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस माझी मुलगी देखील मला म्हणाले की आई तू आम्हाला आवडत नाहीस तू देव देव का करते आहेस. त्यावेळेस मला खूपच रडू आले. परंतु माझ्या मुलाने मला धीर दिला. नंतर मी गुरुचरित्र पारायण हे चालू ठेवले नंतर चमत्कार झाला माझे गुरुचरित्र पारायण हे तीन वेळेस झाले होते त्यावेळेस माझे मिस्टर माझ्याशी गोड बोलू लागले होते.
परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही कारण याच्या अगोदर देखील माझे मिस्टर माझ्याशी गोड बोलायचे परंतु त्यांनी त्या बाईचा नाद अजिबात सोडला नव्हता. त्यामुळे मी माझे गुरुचरित्र पारायण हे चालूच ठेवले. परंतु पाचव्या गुरुचरित्र पारायण माझे संपले त्यावेळेस माझ्या मिस्टरांना ती बाई धोका देत आहे आणि तिने अनेक लोकांचे संसार उध्वस्त केले आहेत हे त्यांना कळाले. कोठून कळाले हे माहीत नाही परंतु त्यांनाही गोष्ट समजली आणि ते घरामध्ये येऊन पश्चाताप करू लागले.
त्यावेळेस माझे स्वामीवरची श्रद्धा आणखीनच वाढली स्वामीवर विश्वास अधिकच वाढत गेला आणि मी सात गुरुचरित्र पारायण हे पूर्ण केले. सात गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्यानंतर माझे मिस्टर माझ्यासमोर येऊन रडू लागले आणि माझी माफी देखील मागू लागले. ते मला म्हणाले की आज पर्यंत मी तुला खूपच छळले आहे मला माफ कर. मला एक चान्स दे आणि असे म्हटल्यानंतर माझ्यासमोर फक्त स्वामींची मूर्ती उभी राहिली. कारण हे सर्व काही जे झाले आहे ते स्वामींच्या कृपेमुळेच झाले आहे.
त्यावेळेस सासू-सासर्यांना देखील त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि सर्वजण माझ्याशी प्रेमाने वागू लागले ही गोष्ट अगदी दोन-चार वर्षानंतर घडली. परंतु जो त्रास मला सहन करावा लागला होता त्याचे चांगले फळ मला गुरुचरित्र पारायण केल्यानंतर नक्कीच मिळाले आणि माझा संसार जो मोडलेला होता तो पुन्हा एकदा सुखाने चालू राहिला आणि हे सर्व काही झाले ते सर्व स्वामी मुळे झाले. स्वामी हे आपल्या भक्ताच्या पाठीशी कायम उभे राहतात. फक्त भक्तांनी स्वामींवर विश्वास ठेवायला हवा.