वृद्धाश्रमात सासऱ्यांना सोडायला गेलेल्या सुनेला जेव्हा सासरे सरप्राईज देतात तेव्हा…. वाचून सुनेच्या पायाखालची जमीन सरकली…!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या आई वडील प्रत्यक्ष देवासमान असतात. ते आपले लहानपणापासून संगोपन करतात. आपल्याला हवे नको ते पाहत असतात. आपण खूप मोठे, खूप प्रगती करावी अशी त्यांची मनापासून खूप इच्छा असते आणि म्हातारपणामध्ये त्यांची आपल्याकडून एकच अपेक्षा असते ती म्हणजे आपण त्यांची सेवा करावी आणि त्यांना चांगली वागणूक द्यावी. परंतु आजकालचा जमाना तुम्हाला तर माहितीच असेल की आजकाल प्रत्येक बुद्ध लोक हे वृद्धाश्रमात जास्त करून पाहायला मिळतात. असेच एक बोधकथा आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

दीनदयाल जी नावाचे एक वृद्ध असतात. त्यांना एक मुलगा असतो. ते खूप श्रीमंत असतात. त्यांची बायको ही स्वर्गवासी झालेले असतात सून आणि त्यांची मुलगा त्यांना घरांमध्ये नोकरा सारखी वागवून देत असतात आणि इतके ते काम करून देखील त्यांना दोन टाइमचे खाण्यास देखील व्यवस्थित ते दोघे देत नसतात. एके दिवशी सून आणि मुलगा किचनमध्ये चहा आणि नमकीन खात असतात. त्या दीनदयालजींना असं वाटते की त्यांना ते दोघे खाण्यासाठी बोलतील.

 

परंतु सून त्यांच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखे करते. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटते आणि ते आपल्या खोलीमध्ये जाऊन आपल्या पत्नीचा फोटो घेऊन रडू लागतात व म्हणून लागतात, की तू होतीस त्या टायमाला प्रत्येक पदार्थ तू केला की मला आधी खायला देत होतीस आणि आता इतके करून देखील ही दोघे मला साधा चहावाला सुद्धा विचारत नाही. म्हणून खूप रडू लागतात आणि ते फोन उचलून आपल्या मित्राला फोन लावतात त्यावेळी तो त्यांचा मित्र वृद्धाश्रमात राहत होता. त्यावेळी ते त्यांना म्हणतात की, मलाही तुझ्यासोबत वृद्धाश्रमात राहायला यायचं आहे. असे म्हणून ते फोन ठेवतात.

 

त्यावर त्यांच्या मित्राला खूप प्रश्न पडतो. की इतका श्रीमंत असणारा व्यक्ती याला कोणती कमतरता पडत आहे की तो वृद्धाश्रमात राहण्यासाठी येत आहे. इकडे ते दिलदयाजी आपली सर्व कपडे घेऊन व आपल्या बायकोचा फोटो घेऊन घरातून बाहेर पडतात आणि बाहेर जाऊ लागतात. बाहेर जात असलेले सूण आणि मुलाने दोघांनीही पाहिलेले असते. परंतु ते दोघेही त्यांना थांबवत नाहीत. ते वृद्धाश्रमात पोचतात. त्या ठिकाणी त्यांची सर्व माहिती ते देते देतात व तेथेच ते राहू लागतात. तेवढा त्यांना त्यांचा मित्र दिसतो आणि त्यानंतर ते आपली सर्व कहानी त्यांना सांगतात. थोड्याच दिवसात त्यांना अनेक तेथील लोक मित्र होऊ लागतात आणि ते खूपच सुखी आणि समाधानी हे जीवन जगू लागतात.

 

एके दिवशी एक मोठी कार वृद्धाश्रमाच्या दारात येऊन थांबते आणि त्यातून एक म्हातारी बाई बाहेर उतरते आणि तिचे मुलगा आणि सून कारमधून बाहेर येते. त्या वृद्ध बाईच्या चेहऱ्यावर पदर असतो. त्यामुळे तिचा चेहरा कोणालाही दिसत नाही आणि त्या ठिकाणी त्या वृद्ध बाईला सोडून त्या बाईचे मुलगा आणि सून तिथून निघून जातात. ती बाई खूप नाराज होते व आपल्या रूम मधून बाहेरच पडत नाही. काय खात नसते ना कोणाशी बोलत असते. इतके दिवशी दिनदयायची तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या रूमच्या बाजूने जातात. त्यावेळी दुसऱ्या महिलांकडून कळते की तिचे नाव जानकी आहे. आणि तिला तिच्या घरच्यांची खुप आठवण येत आहे त्यामुळे ती कोणाशीही बोलत नाही व आपल्या रूममध्येच बसते.

 

त्यावर ते त्यांची विचारपूस करण्यासाठी जातात. त्यावेळेला त्या काहीच बोलत नाहीत आणि अचानकपणे वाऱ्याचे झुळूक येते व त्यांचा पदर डोक्यावरून खाली पडतो. त्यावर दीनदयां त्यांचा चेहरा पाहतात आणि त्यांना ते ओळखतात. त्या पुन्हा गडबडीने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी दीनदयालजींना कळते की ही आपला सुनेची आई आहे. त्यावर ते त्याला म्हणतात की, मी तुम्हाला ओळखले आहे. त्यात एवढे लाजण्याचे काही कारण नाही. मला देखील माझ्या सुनेने आणि मुलाने घर सोडण्यास भाग पाडले आणि तुम्हाला तुमच्या मुलाने आणि सुनेने येथे आणून सोडले. आपण आपल्या दोघांचीही दशा एकच आहे. त्यामुळे लाजण्याचे एकही कारण नाही.

 

त्यावर जानकी आणि इतर सर्वही खूप चांगले मित्र होतात आणि तेच सुखाने आपले वृद्धाश्रमात राहू लागतात. एके दिवशी दिलदयाळजी आपल्या रूममध्ये बसून कविता लिहीत होते. त्यावेळी त्यांना वृद्धाश्रमातील एका व्यक्तीने येऊन सांगितले की तुम्हाला कोणीतरी भेटावयास आलेल्या आहेत. त्यावर ते बाहेर येऊन पाहतात. त्यावर त्यांना असे दिसते की त्यांचा मुलगा आणि त्यांची सून व त्यांचा नातू त्यांना भेटावया आलेले आहेत. ते पाहून तेथून निघून जातात. परंतु त्यांना ते हाक मारून थांबवतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला इथून घेऊन जाण्यास आलेलो आहोत. कारण घरामध्ये उद्याच्याला एक पार्टी आहे. तुमच्या नातवाचा बर्थडे आहे.

 

त्यावर दीनदयाची म्हणतात की मला त्या घरामध्ये यायचे नाही. तुम्ही तुमचा स्वार्थासाठी मला इथून घेऊन चालला आहात. मी त्या घरामध्ये एकही पाऊल ठेवणार नाही. यावर त्यांचा नातू त्यांच्या पायाला अगदी बिलकतो आणि म्हणतो, बाबा चला ना त्यावर ते जाण्यास तयार होतात. परंतु ते एक अट घालतात की मला तुम्ही पार्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मला येथे आणून सोडा. त्यावर ते दोघेही ती अट मान्य करतात आणि त्यांना तेथून घेऊन जातात. घरामध्ये गेल्यानंतर पार्टी सुरू होते. नातेवाईक आलेल्या असतात ते त्यांची विचारपूस करतात आणि म्हणून लागतात की तुम्ही खूप दिवस झाले दिसत नाही आहात. त्यावेळी ते सांगतात की मी बाहेर गेलो होतो आणि ते आपली खरी घटना कोणालाही सांगत नाही.

 

पार्टी संपते व सर्व नातेवाईक आपला आपली घरी निघून जातात. त्यादिवशी दीनदयाळ जी आपल्या घरातील आपल्या बायकोचा फोटो पाशी जाऊन रडू लागतात की, तू असतीस तर तुझ्यासोबत आज मी राहिलो असतो. आपले मुलगा आणि सून दोघे एकमेकात गुंतलेले असतात. त्यांना आजूबाजूच्या लोकांची काहीही परवा नसते तू असतीस तर माझी चौकशी केली असतीस. असे म्हणून रडत रडत त्यांना तेथे झोप येते व ते झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची सून घराच्या बाहेर गाडी घेऊन उभारलेली असते आणि ती म्हणते की बाबा अटीप्रमाणे आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडण्यास तयार आहोत. त्याप्रमाणे ते आपल्या घरातून बाहेर पडतात व वृद्धाश्रमात जाऊन पोहोचतात. त्यावर ते मुलगा आणि वृद्धाश्रमात त्यांना सोडून परत जात असताना.

 

त्यावेळी दीनदयाजी म्हणतात की मी तुम्हाला एक खूप मोठे सप्राईज देणार आहे. थोडा वेळ तुम्ही येथे थांबा. त्यावर ते जानकीबाईंना बोलावून आणतात. हे पाहून सुनेच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणू लागते, की आई तू येथे दादा आणि वहिनी खूप नालायक आहेत. की त्यांनी तुला येथे सोडलं. मी रोज तुझी चौकशी करण्यासाठी फोन लावत होते. परंतु त्यांनी मला सांगितले की तू तीर्थ यात्रेला गेले आहेस. इतके नालायक झाले आहे. ते असे म्हणते. त्यावर जानकी तिला म्हणते, की तू काय केले आहेस. की तू तुझ्या भावाला आणि वहिनीला नालायक म्हणत आहेस. तू ही ते तितकीच नालायक आहे जेवढे ते दोघेही नालायक आहेत. तू देखील तुझ्या वडिला समान असणाऱ्या बाबांना येथे सोडल. अरे आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करत असतो फक्त दोन वेळच्या जेवणाची. तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये अडवण लागत नाही. तरी देखील तुम्ही असे वागतात.

 

आम्ही तरी काय करणार आहोत. आम्हाला दोघांनाही तुमच्यासोबत कधीही परत यायचं नाही. आम्ही जेथे राहत आहोत. तिथे खूप सुखी आहोत. त्यावर तिची मुलगी म्हणते की आई माझी चुकले. तुम्ही दोघेही आमच्या सोबत पुन्हा घरी चला. त्यावर दिनदयाजी म्हणतात, मला त्या घरांमध्ये एकही पाऊल ठेवायचे नाही आहे. मी येथे सुखी आणि समाधानी आहे. मला या लोकांमध्ये खूप आनंद मिळत आहे. त्या घरात येऊन पुन्हा मला दुःखी व्हायचे नाही. जानकी जी तुम्ही जाणार असाल तर तुम्ही जाऊ शकता. असे म्हटल्यावर जानकी म्हणते की मलाही या लोकांमध्ये खूप आनंद मिळत आहे. मी येथून कुठेही जाणार नाही.

 

अशाप्रकारे ही एक सुंदर अशी बोधकथा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *