नवरात्री उपवासाचे स्त्री / पुरुषांनी आवर्जून पाळा महत्वाचे 20 नियम व 9 तोडगे…..!!

Uncategorized

मित्रांनो, 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिभाविकवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात. अनेक ९ दिवस उपवास करतात नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत. याची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

 

1). नवरात्रीचे व्रत पाळण्या मागचा भाविकांचा मुख्य उद्देश अदिशक्तिचा आशीर्वाद मिळावा हा असतो. यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी. तुम्ही मंदिरांना ही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता.

2). देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे. पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर, भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात.

3). नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा घटस्थापना केली जाते. हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे.

4). नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे.जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता.

5). नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे. शक्य असल्यास, 9 दिवस गादीशिवाय झोपा.

6). नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे. यासोबतच वागण्यात क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे.

7). नवरात्रीच्या काळात, अखंड दिवा प्रज्वलित करावा. माँ दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करवी.

8). नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ (पारायण) आवश्यक करावे. आणि मातेची आरती, पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी.

9). नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडण करण्यास मनाई आहे.

10). नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करु नये, कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात.

11). नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते, तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते असते. इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॉसिपिंग टाळले पाहिजे.

12). नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राम्हणांदवारेद्वारे स्थापित केला जाऊ शकतो.

13). जर नवरात्रीच्या नध्यभागी एखाद्या महिलची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत ४ दिवस पूजा करू नका. ५व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात. या दरम्यान, मासिक पाळी येणाच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये.

14). या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये. जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्या पूजा आणि हवन करू नये. या दरम्यान, कन्या पूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते.

15). जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापुजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या. तरच उपवासाचे फळ मिळते.

16). तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका. गहू, तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा. कांदा, लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा. शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्न फ्लोअर आणि वा यांचे सेवन करू नका.

17). नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे. या आहारामध्ये मांसाहार, जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे. सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल.

18). नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे, रताळे, आरबी, भेंडी, सुरण लिंबू, कच्चा किंवा अर्ध-पिकलेला भोपळा, कच्चा भोपळा, टोमॅटो, काकडी, गाजर इ.

19). नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो, संध्याकाळी आरती करुन नंतर घट हलवून, देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो.

20). दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे.

 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा

1) शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा. याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते.

2) कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा. याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते.

3) पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.

4) तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात, त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते.

5) माता दुर्गेला जासवंदाचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जासवंदाचे फुले अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते.

6) कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते.याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो.

7) इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे. यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल, तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे. अने केल्याने मनोकामना पूर्ण होते.

8) विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते.

9). नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते.

 

अशाप्रकारे नवरात्रीच्या दिवसांमध्ये स्त्री आणि पुरुषांनी पाळावे याचे नियम व तोडगे आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *