घरातील स्त्रीला पण महत्त्व द्या तिलाही तिचं आयुष्य जगू द्या… स्त्रियांनी पण स्वतःसाठी जगावं स्वतःलाही महत्व द्यावं ..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या घरातील स्त्रिया या आपल्या घरासाठी अतिशय महत्त्वाचा एक भाग असतात. कारण त्याच्याशिवाय घराला घरपण नसते. त्या प्रत्येकांची काळजी घेत असतात परंतु या जीवनामध्ये ते स्वतःकडे लक्ष देणार फार दुर्लक्ष करतात म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण घरातून स्त्रियाला पण महत्त्व दिले पाहिजे व तिलाही आयुष्य जगू दिले पाहिजे याविषयीचे काही सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत.

 

 

1. तुम्ही घरातील सगळी कामं एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही. कारण घरातील कामांना शेवट नसतो. ज्या महिला असा प्रयत्न करतात त्या आजारी पडतात.

2.कामातून थोडा वेळ काढून तुमच्या आरामाकडे सुद्धा लक्ष द्या. थोडा वेळ काढून सोफ्यावर, फरशीवर बसणं, मध्ये मध्ये थोडे शेंगदाणे, फळं खाणे किंवा थोडा वेळ आपले आवडते गाणे ऐकणे असे केल्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेश वाटेल.

3.घरातील काम करता करता डोकं दुखायला लागलं किंवा अशक्तपणा वाटायला लागला तर थोडी झोप घ्या. त्यामुळे तुमची डोकेदुखी आणि अशक्तपणा लगेच दूर होईल. ज्या स्त्रिया “आराम हराम आहे” असं समजतात त्या आजारपण वाढवून घेतात.

4.चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊ नका. या गोळ्यांमुळे शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होतो. कोणतीही गोष्ट विसरण्याची समस्या येते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी डोकं शांत ठेवा आणि चिंता करू नका.

5.कोणतीही कामं तुम्ही चिंता केल्यामुळे पूर्ण होणार नाहीत. उलट काळजी केल्यामुळे तुम्ही डायबिटीस हायपरटेन्शन यांसारखे आजार मागे लावून घ्याल.

6.कामातून थोडा वेळ काढून गार्डनमध्ये फिरायला जा. थोडा वेळ तिथे बसा, फिरा तेथील वातावरणामुळे मनावरची मरगळ लगेच निघून जाईल.

7.कधी कधी आरशासमोर उभे राहून स्वतःचे निरीक्षण करा. स्वतःला चांगलं आवरा, यासाठी नाही की तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं आहे, तर स्वतःसाठी जगायला शिका. तुम्हाला वाटलं तर आरशासमोर हसा, गाणं म्हणा, डान्स करा. आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा.

8.जर तुमच्या डोळ्यांखाली काळे डाग पडले असतील तर किंवा सुरकुत्या असतील तर लगेच काळजी करत बसू नका. थोडीशी दुधावरची साय लावून मालिश करा. आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. त्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर व फ्रेश वाटेल.

9.एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. तुमच्या लग्नाचा अल्बम उघडा. त्यावेळी घडलेल्या चांगल्या आठवणी आठवा. त्यामुळे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमचं मन फ्रेश होईल. वाईट आठवणींना घरातील कचरा बाहेर काढल्यासारखे मनातून बाहेर टाकून टाका.

10. जर तुम्हाला काही खायची इच्छा असेल तर बाहेरून सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, स्नॅक्स मागवा. त्यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल. तुम्ही नेहमीच तुमचं कुटुंब, मुलं, नातू यांचा विचार करता. कधी कधी स्वतःचाही विचार करा.

11.घरामध्ये खूप कामं असतील तर घरामध्ये अशा वस्तू आणा की ज्याने घरातील कामे सोपी होतील. तुम्हाला वाटत असेल तर कामवाल्या बाईची मदत घेऊ शकता.

12. घरातील स्वयंपाक बनवणे आणि मुलांना खाऊ देणे हे काम स्वतःच करा. कारण घरातल्या लोकांसाठी एवढ्या प्रेमाने दुसरे कोणीही स्वयंपाक बनवू शकणार नाही, जेवढ्या प्रेमाने तुम्ही बनवाल.जास्त कामामुळे जास्त टेन्शन येतं आणि त्यामुळेच स्त्रियांचे आरोग्य खराब होते आणि त्या चिडचिड्या होतात.

13. जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला बरं वाटत नसेल तर या गोष्टी घरच्यांपासून लपवू नका. त्यासाठी चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या. कोणत्याही गोष्टीचा वेळेत इलाज केला तर आजार वाढत नाहीत. हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये बेजबाबदारापणा करू नका.

14.वेळच्यावेळी आपलं बीपी शुगर चेक केली पाहिजे.त्यामुळे कोणताही आजार होण्याच्या आधीच कळतो आणि तो आजार असेल तर वाढत नाही.

15.एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या परिवारासाठी तुम्ही खूप महत्त्वाच्या व्यक्ती आहात भलेही तुम्हाला कोणी या गोष्टी बोलून दाखवत नसेल पण तुम्ही घरात नसाल तर तुमच्या घराला घरपण राहत नाही. त्यामुळे स्वतःवर लक्ष देणे आणि स्वतःला नीट ठेवणे ही तुमचीपण जबाबदारी आहे.

16. स्वतःच्या कामावर प्रेम करा, म्हणजेच तुम्हाला जे काम आवडते ते मनापासून करा.आणि त्या कामांमध्ये व्यस्त रहा, म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही.

17. समाज कुटुंब किंवा कधीकधी आपण स्वतःच आपल्यावर काही बंधनं घालून घेतो त्यामुळे मन हताश होते आणि निराशा येते. त्यामुळे जगताना हेही महत्त्वाचे आहे की या बंधनांना तोडून स्वतःसाठी वेळ द्या. त्यामुळे तुम्हाला आयुष्य खूप सुंदर वाटेल या गोष्टी तुम्हाला खुश ठेवतील आणि मोटिवेटदेखील करतील.

18.स्वतःला महत्त्व द्यायला शिका. तुम्हीच तुमची इज्जत केली नाही तर दुसरं कोणीही करणार नाही. कोणत्याही चुकीसाठी स्वतःला दोष देणे बंद करा. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देत राहिला तर तुम्ही निराश आणि हताश होऊन जाल.

19. कोणतेही संकट आले तर भीती वाटणं स्वाभाविक आहे पण त्या संकटांचा सामना करून संकटं सोडवणं हेपण गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमची भीती घालून परिस्थिती कशी हँडल करायची हे शिकाल, तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणतीही कठीण परिस्थिती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकाल.

20.जेव्हा तुम्ही कोणतेही काम तुमच्या मनाने कराल, तेव्हा तुमच्यातील कॉन्फिडन्स आणखी वाढेल. निर्णय बरोबर असतील तर तुम्हाला आनंद होईल आणि तुमचे निर्णय चुकीचे असतील तर त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल.

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *