नवरात्रीचे नऊ रंग २०२४ ….. पहा कोणत्या दिवशी कोणता रंग ?

Uncategorized

मित्रांनो, नवरात्रौत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. यंदा घटस्थापना ३ ऑक्टोबरला असणार आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रुपांची पूजा केली जाते. तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरु आहेत. तिच्या नऊ रुपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते.जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगाविषयी आणि देवीच्या महतीविषयी

 

गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाचा काळ येतो. त्यानंतर सगळ्यांना वेड लागते नवरात्रीचे. या काळात बाजारासह अनेक ठिकाणी वातावरण प्रफुल्लित दिसते. देवीच्या आगमनासाठी सारेचजण सज्ज असतात.नवरात्रौत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. यंदा घटस्थापना ३ ऑक्टोबरला असणार आहे.

 

नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रुपांची पूजा केली जाते. तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरु आहेत. तिच्या नऊ रुपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते. भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे हा रंगाचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो. जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगाविषयी आणि देवीच्या महतीविषयी

 

३ ऑक्टोबर गुरुवार – पिवळा. या दिवशी घटस्थापना असून दुर्गा देवीच्या पहिल्या रुपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाईल. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री

४ ऑक्टोबर शुक्रवार – हिरवा. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिक मानला जातो. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी.

५ ऑक्टोबर शनिवार – राखाडी. राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतिक मानला जातो. या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रुपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.

६ ऑक्टोबर रविवार – नारंगी. केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतिक. या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते.

७ ऑक्टोबर सोमवार – पांढरा. पांढरा रंग हा निर्मळ, शुभ्र, शांतता आणि पवित्रेचे प्रतिक मानला गेला आहे. या दिवशी महापंचमी असून स्कंदमातेचे पूजन केले जाते.

८ ऑक्टोबर मंगळवार – लाल. लाल रंग हा प्रेमाचे, रागाचे आणि संघर्षाचे प्रतिक मानला जातो. या दिवशी देवी कात्यायिनीची पूजा केली जाते.

९ ऑक्टोबर बुधवार – निळा. निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो. या दिवशी सप्तमी असून देवी कालरात्रीची पूजा केली जाते.

१० ऑक्टोबर गुरुवार – गुलाबी.गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो. या दिवशी महाष्टमी असते. देवी महागौरीचे पूजन करुन कन्या पूजन देखील केले जाते.

११ ऑक्टोबर शुक्रवार – जांभळा. जांभळा रंग महत्त्वकांक्षा, ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतिक मानले जाते. या दिवशी नवमी असून देवी सिद्धीदात्रीचे पूजन केले जाते.

१२ ऑक्टोबर शनिवार – विजया दशमी. या दिवशी विजया दशमी साजरी केली जाते. वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

 

अशा प्रकारे हे नवरात्रीचे नऊ रंग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *