मित्रांनो, स्वयंपाकघरातील साफसफाई म्हणजे केवल फरशी आणि टाइल्स चमकवणं किंवा भांडी चकाचक ठेवणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. स्वयंपाकघरात मिक्सर, फ्रिज, ओव्हन, गॅस अशी विविध साधनसामुग्री आपण वापरत असतो, त्यांची स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. गॅस स्वच्छ ठेवणं म्हणजे केवळ गॅस पुसणं नव्हे. गॅसची बर्नरही स्वच्छ ठेवायला हवीत. पण गॅस बर्नरच्या स्वच्छतेकडे हमखास् दुर्लक्ष होतं.
ती काळी पडतात. बर्नरच्या छिद्रात कचरा अडकून बर्नरची आच कमी होते. यामुळे गॅस लिक झाल्यासारखा वास येतो, गॅस बर्नर अस्वच्छतेमुळे पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत. त्यामुळे गॅसही वाया जातो. गॅस बर्नरच्या स्वच्छतेची वेळच्या वेळी काळजी घेतल्यास पैसे मोजून बर्नर साफ करुन घेण्याची गरज पडणार नाही. घरातील इनो, लिंबू, व्हिनेगर यांच्या मदतीनं काही मिनिटात गॅसचे बर्नर चकाचक करता येतात.
गृहिणींना स्वयंपाकघराशी संबंधित अनेक समस्या असतात, ज्यामुळे त्या खूप अस्वस्थ असतात. त्यातील एक म्हणजे काळे झालेले गॅस बर्नर कसे स्वच्छ करावे. जेणेकरून ते पूर्वीसारखे चमकदार होईल. पाहा तुमच्या गॅस बर्नर साफ करण्याच्या टिप्स जुन्यापासून नवीन कशा होतात. याचीच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
स्वयंपाक झाल्यावर आणि विकेंडला आपण गॅस शेगडी, ओटा, टाईल्स स्वच्छ करतो. याचवेळी आपण गॅसमधील बर्नरही स्वच्छ करतो. पण ते म्हणावे तसे स्वच्छ होतातच असे नाही. नवीन आणल्यावर पितळी म्हणजेच पिवळट असणारे हे बर्नर कालांतराने वापरुन काळेकुट्ट होतात. कधी यावर दूध ओतू जातं तर कधी तेल सांडतं. कधी थेट बर्नरवर फुलके, वांगी, पापड भाजल्याने त्याचे कणही बर्नरमध्ये अडकतात आणि ते खराब होतात.
हे खराब झालेले बर्नर झटपट अगदी कमी श्रमात साफ करायचे तर त्यासाठी १ सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे काही मिनिटांत काळे झालेले बर्नर चमकण्यास मदत होईल. एका बाऊलमध्ये बर्नर ठेवून त्यावर एकदम गरम पाणी ओतायचे. या गरम पाण्यातील बर्नरवर लिंबाची अर्धी फोड पिळायची. इनो म्हणजेच फ्रूट सॉल्टचे १ पॅकेट यामध्ये घालायचे. त्यानंतर यामध्ये साधारण चमचाभर मीठ आणि बेकींग सोडा घालायचा. या सगळ्या गोष्टींचे रासायनिक मिश्रण तयार होते त्यामध्ये साधारण 2 तास बर्नर तसाच भिजत ठेवायचा.
मग बर्नर काढून आपण जो अर्धा लिंबू पिलेला आहे त्या लिंबाच्या सालीने स्वच्छ चोरून घ्यावा. हे बर्नर आपण ज्या वेळेला त्या मिश्रणामध्ये भिजत ठेवले होते त्या वेळेला त्याची जो काळवटपणा होता तो काही प्रमाणामध्ये निघून जातो. या लिंबूच्या सालीने घासल्यामुळे थोडा जास्त प्रमाणात तो काळवट
पना निघून जातो. जर अजून देखील कावटपणा असेल तर तारेच्या घासणीवर लिक्विड सोप घेऊन त्याने बर्नर हलक्या हाताने घासायचा. काही मिनीटांतच हा बर्नर नव्यासारखा चमकताना दिसेल.
अशा या साध्या सोप्या उपायाने आपण घरच्या घरी गॅस बर्नर अगदी नव्या सारखे करू शकतो.