मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असे कोणते क्षण येतात की त्या क्षणाला आपल्याला परत सुधारता येत नाही. म्हणून लोक नेहमीच असे म्हणत असतात की निघून गेलेले पुन्हा कधीच परत येत नाही. त्यामुळे निघून गेलेला वेळेवर पाश्चातापाची वेळ येते म्हणून अगोदरच चूक करून नका. यासाठीच आजच्या लेखांमध्ये आपण एक सुंदर अशी कथा जाणून घेणार आहोत.
एका खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या बाबांनी म्हणजेच त्या उद्योगपतीने त्याच्या मुलाला त्याच्या परीक्षेबद्दल विचारले असता मुलांनी बाबांना प्रश्न केला की, “बाबा मी जर परीक्षेत पहिला आलो तर तुम्ही मला आवडले महागडी कार गिफ्ट मध्ये देणार का?” वडिलांनी अगदी कुशीमध्ये म्हणाले, “हो का नाही देणार!” ते त्यांना शक्य देखील होते. कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. वडिलांचे हे उत्तर ऐकताच मुलाला खूप आनंद झाला आणि त्या उत्साहाने तो भरपूर अभ्यास करू लागला.
रोज कॉलेजमधून येत जात असताना शोरूम मध्ये असलेल्या त्या कारला पाहत होता आणि स्वप्नामध्ये रंगून जायचं की, तो ती आपली आवडती कार चालवतोय आणि या विचारांनीच तो अभ्यास खूप जास्त करत होता. काही दिवसांनी त्याच्या परीक्षेचा निकाल लागला. तो संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला आला होता. त्याने लगेच आपल्या वडिलांना फोन केला आणि म्हणू लागला, “बाबां मी पहिला आलो! तुम्ही कार रेडी ठेवा. मी घरी येतोय.” आपल्याला कार मिळणार या उत्साहाने तो मुलगा खूप खुश झाला होता आणि या उत्साहातच तो घरी आला आणि इकडे तिकडे पाहू लागला की आपली कार कुठे दिसते आहे का.
बाहेर अंगणामध्ये पाहू लागला. तो उदास मनाने आपल्या वडिलांच्या खोलीमध्ये गेला. वडिलांनी त्यांना एका कागदामध्ये गुंडाळून एक गिफ्ट दिले आणि वडील म्हणाले, “हे तुझे गिफ्ट!’ तो अगदी उदास मनाने ते गिफ्ट स्वीकारले आणि वडिलांचा मनामध्ये राग राग करत त्याच चेहऱ्याने तो आपल्या रूममध्ये गेला. रूममध्ये गेल्यावर त्यांनी वडिलांनी दिलेले ते गिफ्ट उघडले तर त्याला आत मध्ये सोनेरी कागदात गुंडाळलेले रामायणाचे पुस्तक दिसले. ते पुस्तक पाहतात त्याला वडिलांचा खूप राग आला. तू खूप चिडला. परंतु त्यांनी त्यांच्या रागाला वावर घालून त्याच्या वडिलांना चिठ्ठी लिहिली.
त्यांनी चिठ्ठी मध्ये असे लिहले होती की, “बाबा तुम्ही मला माझी कार न देता हे रामायण दिले. त्या मागचे तुमची नक्कीच काहीतरी उद्देश असणार. पण आता मी हे घर सोडून जात आहे. मी घरी परत तेव्हाच येईन जेव्हा मी स्वतः खूप पैसे कमवू लागेल.” अशाप्रकारे त्याची चिठ्ठी मध्ये त्या मुलाने लिहून ती चिठ्ठी व रामायण त्याच ठिकाणी ठेवून तो मुलगा घर सोडून निघून गेला. खूप वर्ष निघून गेली मुलगा खूप हुशार असल्यामुळे तो खूप मोठा झाला. तेव्हा तो खूप पैसे कमवू लागला. लग्न करून ऐश्वर्याचे आरामाचे जीवन तो जगत होता. कधी कधी त्याला आपल्या बाबांची आठवण यायची पण आठवण आली की त्याला बाबांनी दिलेल्या त्या रामायणाच्या गिफ्ट बद्दलची आठवण यायची व त्याला खूप राग येत होता.
“आई नंतर बाबांकडे फक्त मीच होतो. पण माझी त्यांनी एक छोटीशी इच्छा का पूर्ण केली नाही.” असा विचार करून तो बाबांना भेटले देखील टाळत होता. दिवसां मागून दिवस सरत गेले, काळ पुढे चालू लागला. एक दिवस मुलाला आपल्या वडिलांची खूप आठवण झाली. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. आपण खूप मोठी चूक केली आहे. एका छोट्याशा गोष्टीसाठी आपण वडिलांचे इतका राग केला असा विचार त्याच्या मनात येऊ लागले आणि वडिलांना फोन करण्याची इच्छा त्याचा माझ्या मनात झाली.
त्यांनी फोन लावला. त्यावेळी त्याच्या मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. कितीतरी वर्षांनी आपण बाबांचा आवाज येणार याबद्दल त्याच्या मनात खूपच छान निर्माण झाला होता. आपण चूक केली आहे याची देखील त्याला खंत होतीच. त्याचबरोबर आपल्याला बाबांचा आवाज ऐकायला येणार याची खूप खुशी देखील झाली होती. त्याचवेळी अचानकपणे तो फोन बाबांनी न उचलता नोकरांनी उचलला आणि नोकर म्हणू लागला, “अहो साहेब साहेबांचे दहा दिवसांपूर्वीच निधन झाले. शेवटच्या वेळी त्यांना तुमची खूप आठवण येत होती आणि त्या आठवणी मध्येच त्यांनी त्यांचा प्राण सोडला. जाता जाता त्यांनी एक सांगितलेले आहे की, कधीतरी माझ्या मुलाचा फोन येईल त्यावेळी त्याला सांगा की माझा हा व्यवसाय तो पुढे चालू ठेवावा. तुमचं काही पत्ताच नव्हता. म्हणून तुम्हाला कळत आलं नाही. आम्ही खूप प्रयत्न केले पण काही तुमचा पत्ताच मिळाला नाही.”
हे ऐकून तो थक्क झाला. तू खूप रडू लागला. त्याच्या पायाखालची जमीन सरकण्यासाठी झाली. तो आपला घरी निघून गेला. तो उदास मनाने तो आपल्या घरामध्ये गेला व बाबाच्या खोलीत गेला. त्या ठिकाणी बाबांनी दिलेली त्यांना रामायनेच पुस्तक मिळाले. त्यांनी ते उघडून पाहिले, तर पहिल्याच पानावरती लिहिलेले होती की, “बाळा तू खूप खूप मोठा होईल. किर्तीवंत हो. मला माहित आहे की माझं तुझ्यावर खूप चांगली संस्कार आहेत आणि त्यामुळेच तू नक्कीच तुझे नाव खूप मोठे करणार”. आणि अचानकपणे त्या रामायण मधून गाडीची चावी आणि पैसे भरलेला लिफाफा खाली पडला. हे पाहत असतो खूप थकत झाला. खाली बसून तू खूप रडायला लागला…
अशाप्रकारे हे एक सुंदर अशी कथा आहे.