मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीसोबत कधी ना कधी विश्वासघात हा होतोच. कोणी विश्वासघात करतो. तर कोन विश्वासघाताला बळी पडतो. कसं वाटेल जेव्हा आपण आपल्या सोबत होणाऱ्या विश्वासघाताला अगोदरच ओळखू, विश्वासघातकी लोकांना ओळखू, आपल्या सोबत काय वाईट होणार आहे ते ओळखू. आणि अगोदरच सावध होऊ. म्हणूनच आज आपण आठ अशा लोकांबद्दल सांगणार आहे जे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला आजच त्यांच्यापासून दूर राहायला. हवं नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठया विश्वासघाताला बळी पडू शकतात.
1) या आठ लोकांच्या यादीत सगळ्यात पहिल्य नंबर वर आहेत ते लोक जे येतात तुमच्या जवळ इतर लोकांची चुगली करतात. इतरांना तुमच्या नजरेत कमी दाखवतात इतरांबद्दल वाईट बोलतात. अशा लोकांना दुसऱ्याचा अपमान करायला त्यांना खाली दाखवायला मजा येत असते. असं होईल की जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तिच्याबद्दल हे लोक तुमच्यासमोर वाईट बोलतील.
पण या गोष्टीची काय खात्री असेल की हेच लोक तुमच्याबद्दल तिसऱ्या व्यक्ती समोर वाईट बोलणार नाहीत. तुमच्या बद्दलही असे लोक कधी ना कधी इतरांसमोर वाईट बोलतात. चुगली करणाऱ्या आणि इतरांमध्ये कायम वाईट गोष्टी शोधणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये. असे लोक तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.
2) आठ लोकांच्या या लिस्टमध्ये दुसरा नंबर आहे अशा लोकांचा जे तुमची मदत मागतात आनि नंतर तुम्हाला पूर्णपणे विसरून जातात. तुम्हाला इग्नोर करता टाळायला सुरुवात करतात किंवा मग त्यांच्या मागे पळायला लावतात. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्याने तुमच्याकडून दोन हजार रुपये उसने घेतले आणि तेही असं कारण सांगून ज्यासाठी तुम्ही नाही म्हणू शकणार नाही. पैसे उधार घेणे उसने घेणे यात काहीही गैर नाही चुकीचं नाही.
पण पैसे घेताना गरजू म्हणून पैसे घ्यायचे आणि आठवड्यानंतर देतो महिन्याने देतो म्हणून पैसे पुन्हा कधीच परत करायचे नाहीत. अश्या लोकांवरून तुमचा विश्वास उडायला हवा तुम्ही अशा लोकांवर पुन्हा विश्वास ठेवता कामा नये. कारण असे लोक साध्या सरळ स्वभाव असणाऱ्या व्यक्तीच्या शोधत असतात आणि त्याला कसं फसवता येईल याचाच विचार करत असतात..
3) तिसऱ्या नंबर वरती लोक आहेत जे तुमच्याजवळ कोणाबद्दलही बाईट बोलत नाहीत. चुकल्या करत नाही किंवा तुमची मदत मागून तुम्हाला विसरून जात नाहीत. तिसऱ्या नंबरचे हे ते लोक आहेत जे तुम्हाला म्हणतात तुला एक गोष्ट सांगतो पण तू कोणाला सांगू नकोस. तुला अमुक एकाच गोष्टीत सांगतो तू कोणाला सांगू नकोस. किती लोक असतात ज्यांच्या पोटात कधीच कुठली गोष्ट राहत नाही.
मी गोष्ट सांगतो कुणाला सांगू नको असं म्हणत म्हणत हे लोक कितीतरी लोकांच्या खाजगी गोष्टी इतरांमध्ये करतात. असे लोक अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायक नसतात. गोड बोलून तुमचं गुपित माहिती करून ते इतर कोणाजवळ तरी ते बोलून मोकळे होतात. असे लोक म्हणजे काळ्या दगडांमध्ये लपलेल्या काळ्या सापासारखे असतात.
4) चौथ्या नंबर वरती ते लोक आहे जे तुमच्या अच्युमेंटवर खुश नसतात. तुम्ही काही मिळवलं त्यांना आनंद होत नाही. तुम्ही काहीही मिळवलं कितीही यश मिळवलं तरीही ते तुमच्यात काही ना काही कमी शोधत असतात कारण ते आतून तुमच्यावर जळत असतात. तुमच्या यशाचा त्यांना मुळीच आनंद झालेला नसतो. ते वरवर तुम्हाला दाखवतील की तुमच्या यशात ते आनंदी आहेत तुमच्या सुखात सहभागी आहेत. पण आतून मात्र जळत राहतात.
5) पाचव्या नंबर वर येतात ते लोक जे कधीही तुम्हाला सगळी गोष्ट एकाच वेळेस सांगतात. प्रत्येक वेळेस काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर पूर्ण न सांगता त्यातला अर्धा भाग किंवा थोडसं सांगून बाजूला होतात. आणि राहिलेले गोष्ट ऐकण्यासाठी आपण त्यांच्या मागे फिरायचं त्यांना महत्त्व द्यायचं. एकंदरीतच काय तर आपल्याला भाव द्यावा महत्त्व द्यावा यासाठी असे लोक अर्धवट गोष्टी सांगतात..
6) सहाव्या नंबर वर आहेत ते लोक जे छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतःला वाचवायला बघतात. स्पष्टीकरण देत बसतात. तुम्ही अशा लोकांना काहीतरा गोष्ट बोललात तर त्यांचे इगो हर्ट होतो. तू मला असं कसं म्हणू शकतोस मी तसा नाही मी अमुक आहे मी तमुक आहे माझा स्वभाव असा आहे तसा आहे तु मला ओळखलं नाहीस वगैरे वगैरे.
स्वतःच्या बाबतीत नको तितकं स्पष्टीकरण देत सुटतात.असे लोक तोपर्यंत आपल्या सोबत चांगले वागतात जोपर्यंत तुम्ही त्यांचं कौतुक करता त्यांच्याबद्दल फक्त चांगलं बोलतात. आणि एखाद्या वेळेस तुम्ही यांची वाईट गोष्ट पकडली चुकीची गोष्ट पकडली तर ते नको तितकं स्पष्टीकरण देत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न. करतात आणि असे लोक हे स्वार्थी असतात म्हणून यांच्यापासून नेहमी दूर राहायचं.
7) सातव्या नंबर वर आहेत ते लोक ज्यांच्या वागण्यात बोलण्यातं अचषक फरक पडतो. कारण ते तुमच्यासमोर काहीवरी वेगळे होते आणि आज तुमच्यासमोर वेगळेच काहीतरी होऊन येतात. काल तुमच्याकडे जे बघत देखील नव्हते तुम्हाला बोलत देखील नव्हते तुमच्या विरोधात होते तेच लोक आज तुमच्या बाजूने आहेत तुमच्याशी गोड गोड बोलतात. अशा वेळेस समजून जा कुठल्याही स्वार्थाशिवायअसे लोक जवळ येत नाहीत.
त्यांच तुमच्याकडे आज काही ना काही काम असेल किंवा भविष्यात तुम्ही त्यांच्या उपयोगात येणार आहात म्हणून ते तुमच्याजवळ आज आहेत. नाही तर मग असं कसं घड्डू शकत की कालपर्यंत तुमच्या विरोधात असणारे तुमचा तिरस्कार करणारे लोक अचानक तुम्हाला जवळ करतात तुमच्याशी प्रेमाने वागतात. हे शक्य नाही म्हणूनच अचानक स्वभावात बदल करणाऱ्या रंग बदलणाऱ्या लोकांपासून कायम दूर रहा.
लोक ज्यांना कधीही माफी मागता येत नाही.
8) शेवटच्या आणि आठव्या नंबर वर येतात ते लोक ज्यांना कधीही माफी मागता येत नाही सॉरी म्हणता येत नाही. माफी माग नाही खरंतर खूप साधी सरळ गोष्ट आहे आपल्याकडून चूक झाली आहे. तर आपण तितक्या सहजतेने माफी मागायला हवी. पण असे लोक माफी न मागता स्वतःच स्पष्टीकरण देतात किंवा मग सॉरी मी चुकलो पण माझा हेतू असा नव्हता मी हे या या कारणासाठी केलं असे स्पष्टीकरण देत असतात.
मला माफ कर पण मला नाही वाटत मी कुठे चुकलो आहे म्हणून. अशी यांची वाक्य असतात. म्हणजे झालेल्या चुकीचा त्यांना अजिबातच पश्चाताप नसतो. वरवरच दाखवायला सॉरी म्हणायचं माफी मागायची. पण मनातून आणि बोलण्यातून मी कुठे चुकलोच नाही हे दाखवायचं. अशा लोकांपासून दूर राहा.
अशाप्रकारे या आठ लोकांपासून आपल्याला दूरच राहिले पाहिजे.