हे ५ नियम नेहमी लक्षात ठेवा, सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी……!!

Uncategorized

मित्रांनो, या जगात प्रत्येक व्यक्तीची हीच इच्छा असते की, माझे आयुष्य सुखाने आणि आनंदाने भरून गेले पाहिजे. त्यामुळे माणूस पैशाच्या मागे लागतो. त्याला वाटते पैशाने मी सुखी होईल. आता पैशाने माणूस सुखी होतो का नाही हा वेगळा विषय आहे. पण आपले आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगायचे असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते. म्हणूनच आज आपण ५ महत्वाचे नियम या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

 

पहिला नियम आहे ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की तेव्हा आपल्याला योग्य आणि अचूक निर्णय घेता येत नाही. अशा वेळेस आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. आपल्याकडे २ पर्याय असतात. एक तर आपण आपल्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून किंवा शुभचिंतकांकडून सल्ला घेऊ शकतो. किंवा दुसर म्हणजे आपल्याला जे योग्य वाटते त्याचप्रमाणे पाऊले उचलू शकतो.

 

पहिला पर्याय काही प्रमाणात योग्य असू शकतो. कारण आपले मित्र, नातेवाईक, शुभचिंतक आपल्या बद्दल चांगलेच विचार करतात.पण इथे हा नियम नेहमी लक्षात ठेवा. ऐकावे जनाचे करावे मनाचे. ह्याचा सरळ अर्थ आहे तुम्ही निर्णय घेताना तुमच्या मित्रांचे, नातेवाईकांचे सल्ले जरूर घ्या. पण नंतर त्या सल्ल्यांवर थोडे विचारमंथन करा. खरच हा सल्ला योग्य आहे का ह्यावर चिंतन करा. कारण शेवटी तुमच्या अंतरातम्यातून काय आवाज येतोय याला सुद्धा महत्व आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा शेवटचा निर्णय तुमच्या हातात ठेवा.

 

दुसरा नियम ‘कृती करायला म्हणजे अँक्शन घ्यायला उशीर करू नका’ प्रत्येक काम सर्व बाजूंनी विचार करून केले पाहिजे हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकले असेल. आणि ह्या वाक्यात चुकीचे काहीच नाही. कारण विचार न करता घाईघाई मध्ये केलेले काम अपेक्षित परिणाम देत नाही.त्यामुळे प्रश्न हा पडतो की सर्व बाजूने विचार करून काम केले पाहिजे ठीक आहे पण विचार करायला किती वेळ घ्यायचा त्याला सुद्धा काही मर्यादा असली पाहिजे. नाही तर आपण विचार करत बसायचो आणि बाजी कोणी दुसराच मारून जायचा.आपल्यातील बरीच लोकं हेच करतात. मी १ तारखे पासून व्यायाम चालू करेन, मला अजून चांगली नोकरी मिळाल्यानंतर मी पैशांची बचत आणि गुंतवणूक करायला सुरुवात करेल.

 

मला चांगले भांडवल मिळाले की मगच मी व्यवसाय चालू करेल वगैरे वगैरे. खरंतर ही सगळी करणे आपण अपयशाच्या भीतीमुळे देत असतो. आपल्याला आयुष्यात पुढे चालण्यासाठी आपल्या मनासारखा रस्ता कधीच मिळणार नाही. आपल्याला फक्त चालायला सुरुवात करायची आहे. जास्तीत जास्त काय होईल अपयश मिळेल पण त्या सोबत अनुभव सुद्धा मिळेल. त्यामुळे आयुष्यात कृती करायला ऍक्शन घ्यायला उशीर करू नका. जिथे आहात तिथून सुरुवात करा.

 

तिसरा नियम ‘वेळेची किंमत ओळखा’ जगातल्या श्रीमंत व्यक्ती पैकी एक व्यारेन बफेट एका इंटरव्हिव्ह (मुलाखती) मध्ये सांगतात माझ्याकडे एवढे पैसे आहेत की जगातल्या सर्व सुख सुविधा मी विकत घेऊ शकतो फक्त एकच गोष्ट मी विकत घेऊ शकत नाही ती म्हणजे वेळ. यावरून आपल्याला वेळेचे महत्व समजते. आपण तासनतास मोबाईल मध्ये वेळ वाया घालवतो आणि नंतर म्हणतो माझ्याकडे वेळच नाही. त्यामुळे वेळ जायच्या आधीच वेळेची किंमत ओळखा.

 

चौथा नियम म्हणजे ‘जे आपल्याकडे आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा’ आपल्या सर्वांना माहीत आहे की माणूस हा असंतुष्ट प्राणी आहे. आपल्या सर्वांना सुखी आणि समाधानी आयुष्य जगायचे आहे पण आपण हे विसरलो आहोत की नक्कीच समाधानी आयुष्य जगायचे कसे? समाधानी आयुष्य जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे कृतज्ञता.

म्हणजे आपल्याकडे जे आहे त्या गोष्टींसाठी आभार मानणे. तुम्ही तुमच्या कामाप्रती कृतज्ञ नसाल तर त्या व्यक्तीला भेटा जो शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहे. तुम्ही स्वतःच्या शरीराप्रती कृतज्ञ नसाल तर त्या व्यक्तीला भेटा जो शरीराने अपंग आहे. तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या पैशांबद्दल कृतज्ञ नसाल तर त्या व्यक्तीला भेटा ज्याचे २ टाईम जेवायचे हाल आहेत. कृतज्ञता हा असा गुण आहे जो तुम्हाला कोणत्याही परिस्थिती मध्ये सुखी आणि समाधानी ठेवू शकतो.

 

पाचवा नियम ‘कितीही संकटे आली तरी आयुष्यात हार मानू नका’ काल परवाच आपण एक बातमी वाचली एका इंस्टाग्राम स्टार ने प्रेमभंगामुळे आत्महत्या केली. आपले आयुष्य खरच एवढे स्वस्थ झाले का हो? छोट्या छोट्या फालतू कारणांमुळे आपण डिप्रेशन मध्ये जातो आणि एवढ्या टोकाचे पाऊल उचलतो. जे आई बाप आपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून मोठे करतात आणि हीच मुले अशी टोकाची पाऊले उचलताना त्यांचा थोडा सुद्धा विचार करत नाही. आयुष्य म्हंटल्यावर संकट येणार, आव्हाने येणार, समस्या येणार म्हणून काय लगेच हार मानायची का? त्यामुळे हा नियम नेहमी लक्षात ठेवा.

 

काहीही झाले तरी मी आयुष्यात हार मानणार नाही. शून्यातून सुरुवात करेल. दिवस रात्र एक करेल. प्रचंड मेहनत करेल पण हार मानणार नाही. इतिहासामध्ये असा एक माणूस दाखवा जो एकही समस्येला, संकटाला तोंड न देता मोठा झाला आहे. मग आपण का ही अपेक्षा धरावी. त्यामुळे आज शपथच घेऊन टाका आयुष्यात कितीही संकटे आली, समस्या आल्या, आव्हाने आली तरी मी हार मानणार नाही.

 

वरील ५ नियम तुम्हाला १ रात्रीत यश देणार नाही मात्र ते विचार अमलात आणून आपण आयुष्यात यश नक्की मिळवू शकू. यश हे कधीच एक रात्रीत मिळत नसते त्यामुळे परिश्रमांची तयारी ठेवा, अपार कष्ट करा यश तुमच्या हातात नक्की येईल.

 

अशाप्रकारे हे काही पाच नियम आहेत त्यामुळे आपल्याला आपले जीवन सुखी व समाधानी जगू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *