मित्रांनो, नवरा बायकोचे नाते अतिशय पवित्र मानले जाते. नवरा बायकोच नातं आहे एकमेकांची साथ कधीही सोडत नाही. परंतु आजच्या लेखांमध्ये आपण नवरा बायकोचे नाते कसे असावे? नवरा बायकोचे भांडण न होण्यासाठी काय करावे? पतीपत्नीने संसारात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? नवरा बायकोचे भांडण का होतात? नेहमी बायकोने माघार का घ्यायची?नवऱ्याने माघार घ्यावी की बायकोने? पती पत्नीचे पवित्र नाते कसे असावे? संसार सुखाने करण्यासाठी कोणते उपाय करावे? नवरा बायकोतील प्रेम वाढवण्यासाठी काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आनंद, जबाबदारी, खबरदारी, संयम,सौख्यचं लेणं, सामाजिक जाण, कौटुंबिक जबाबदारी,भविष्याचा वेध, आनंदी जीवन, जगण्याला नवी दिशा, मोठेपण, जानतेपण या सर्वांना अंगामध्ये भरून घेणे याचा एकत्रित वेळ म्हणजे लग्न होय. लग्न हा असा एक क्षण आहे त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला पूर्णत्व होते. आपल्या जीवनामध्ये अनेक क्षण येतात. परंतु लग्न हा क्षण फक्त एकदाच येतो. पत्नीला पतीची अर्धांगिनी म्हणतात. पतीमुळे पत्नी पूर्ण होते. आणि पत्नीमुळे च पती हा पूर्ण होत असतो.
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दोघांनी वेळोवेळी जबाबदारी ओळखून वागले पाहीजे. चारचौघात वागताना आपले हेवेदावे ,गैरसमज, फुटकळ भानगडी बाजूला ठेवून एकमेकांना मानसन्मान दिला पाहीजे. लग्न बंधन पवित्र बंधन आहे ही जाणीव शेवटपर्यंत ठेवल्यास दोघांत जो अलिखित करार करण्यात आला आहे तो अबाधित राहील. अशा प्रकारे नवरा बायकोत नाते असावे. जेव्हा जोडीदार कुरकुर सुरू करतो तेव्हा त्याला समजुन घेउन, त्याची साथ मिळे पर्यंत धिर धरणं खुप महत्वाच असत. निदान त्याच्या विचारांवर आदर व्यक्त करण्यात माणुसकी असते कारण संसार दोघांचा असतो.
स्त्रियांना असा नवरा हवा आहे ज्यावर ते विश्वास ठेवू शकतील आणि अलिकडच्या वर्षांत हे बदललेले नाही. होय, स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडे प्रियकर आणि मित्र म्हणून पाहतात, परंतु त्यांना देखील त्याने समर्थन आणि विश्वासार्ह असावे असे वाटते. त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की तो तेथे असेल आणि एकनिष्ठ असेल.भांडण होण्यास विशिष्ट कारण लागत नाही, त्यावेळची मानसिक अवस्था बरयाच अंशी कारणीभूत असते. मोठ मोठ्या प्रसंगी माणूस शांत असतो पण कधी कधी अगदी क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण होते आणि सगळंच कुटुंब भस्मसात होऊन जाते.
नवरा बायको हे नातेसंबंध फार सुंदर आहे पण तितकेच विचित्र आणि अनाकलनीय आहे. प्रत्येक भांडणामध्ये त्या दोघांमध्ये मतभेद होत असतात. आणि या भांडणात दोघांची देखील चूक असते. पण प्रत्येक वेळेला पत्नीने माघार घ्यावे असे काही नाही. पतीने देखील समजावून माघार घेतली पाहिजे तरच ते नाते टिकते. तुमचे वैवाहिक जीवन निरोगी आणि यशस्वी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी बोलणे हा एक उत्तम मार्ग आहे . तुम्हाला काय वाटते याबद्दल प्रामाणिक रहा, परंतु जेव्हा तुम्ही संवाद साधता तेव्हा दयाळू आणि आदरयुक्त व्हा.
चांगल्या संवादाचा भाग म्हणजे एक चांगला श्रोता असणे आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून काय हवे आहे आणि काय हवे आहे हे समजून घेण्यासाठी वेळ काढणे. या सर्वांमुळे पती-पत्नीचे नाते सुंदर बनत असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख हे येतच असतं.परंतु या सुखा दुखात दोघांनी देखील एकमेकांचे साथ ही कधीही सोडू नये. जर त्या दोघांनी कधीच साथ सोडली नाही तर त्यांना कोणत्याही परिस्थितीला ते मात करू शकतात. आणि त्यांचे जीवन पुन्हा सुखी होण्यास सुरुवात होते.
नवरा बायको या दोघांमध्ये जर विश्वास असेल तर त्यांना हातात असलेले प्रेम हे वाढत जाते. विश्वासावर फुले नाते टिकून असते आणि या विश्वासाला कधीही आपण तडा जाऊ देऊ नये. तरच नवरा बायको मधील प्रेम वाढेल व त्यांचे नातेसंबंध अधिकच घट्ट होईल.
अशाप्रकारे नवरा बायकोचे नाते कसे असावे? त्याची माहिती या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेली आहे.