आळस म्हणजे नक्की काय? आळस कसा निर्माण होतो आळस पूर्णपणे संपवायचा असेल तर, काय करावे लागेल?…

Uncategorized

मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच आळस हा येत असतो. हा आळस आपल्याला पूर्णपणे घालवायचा असतो. परंतु तो कशाप्रकारे घालवावा हे आपल्याला माहित नसतं. आळसामुळे आपली सर्व कामं कामे रेंगाळतात. कोणत्याही कामांमध्ये आपल्याला मनापासून काम करण्याची इच्छा होत नाही. म्हणूनच आज आपण आळस म्हणजे नक्की काय असतो? आळस कशा प्रकारे निर्माण होतो आणि आळसामुळे काय काय होते? त्याचबरोबर आळस आपल्याला आपल्या शरीरातून पूर्णपणे घालवायचा असेल तर काय करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

गौतम बुद्धांनी या आळसावर खूप छान असे विचार मांडलेले आहेत. तेच विचार आपण जाणून घेऊया. प्रथम आपण जाणून घेऊया आळस हा म्हणजे नेमका काय असतो? त्याचबरोबर आळस कशा प्रकारे निर्माण होतो? आपल्याला सर्वांना माहित आहे की आपल्या शरीरात आळस आला की आपण कोणतेही काम करण्यास सक्षम होत नाही. खूपच आळशी बनत जातो. म्हणजेच आपला हातून कोणतीही काम होत नाही.

 

त्याचबरोबर आपल्याला आपल्या शरीरात असलेला आळसामुळे सकाळी लवकर उठणे देखील होत नाही. आणि यामुळेच आपण खूपच आळशी बनत जातो. आळस म्हणजे काय? हे तर आपण जाणून घेणारच आहोत परंतु हा आळस हा आहे तो आपला शरीरासाठी खूप घातक असतो. गौतम बुद्ध म्हणतात आळस म्हणजे आपल्या शरीरातील एक मानसिक अवस्था आहे. ही एक भावना आहे व एक विचार आहे. ज्याला कळत ना कळत आपण स्वतःच आपल्यामध्ये निर्माण करत असतो.

 

आपला मध्ये आळस हा फक्त दोन कारणामुळेच निर्माण होत असतो. पहिले कारण म्हणजे शारीरिक आणि दुसरे कारण म्हणजे मानसिक. शारीरिक कारणांमधील पहिले कारण आहे आपले जेवण. जेव्हा आपण असे अन्न खातो की जे आपल्या शरीरासाठी कोणतेही जीवनसत्व न देणारे आहे आणि ते जर आपण खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे ओझे बनते व आपल्या शरीरामध्ये आळस निर्माण करत असते. कारण आपण अन्न ऊर्जेसाठी खात असतो की त्यातून आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते.

 

ज्या प्रकारचे अन्न खात असतो त्या प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरातून आपल्याला मिळत असते आणि जर आपण ऊर्जा न मिळणारे अन्न खाल्ले तर त्यातून आपल्याला आळस निर्माण होत असतो. यामुळे जर आपल्याला आपल्या शरीरातून आळस पूर्णपणे घालवायचा असेल तर प्रथम आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आपण जे अन्न खात आहोत ते सहज पचणारे व नैसर्गिक फळभाज्या असणारे अन्न खावे.

 

शारीरिक स्तरावरील दुसरे कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने चालणे, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि चुकीच्या पद्धतीने झोपणे. जेव्हा आपण चालतो त्यामध्ये एक विशिष्ट शिस्ती असणे खूप गरजेचे असते. जेव्हा आपण बसतो त्यावेळेस आपला पाटिचा कनात ताट असणे खूप गरजेचे असते आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा एक विशिष्ट शिथिलपणा असणे खूप गरजेचे असते. कोणत्याही शरीराच्या भागावर तणाव नसावा. आपला शरीराला पुरेसे झोप ही देखील खूप लाभदायक ठरते.

 

आपण नेहमी ना कमी ना जास्त झोप घेणे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरते. जर आपण एखाद्या दिवशी झोप घेतली नाही तर दुसरा दिवस हा आपला झोपेमध्ये व आळसामध्ये निघून जातो. शारीरिक स्तरावरील तिसरे कारण म्हणजे सकाळी लवकर उठणे. आपण नेहमी लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. यामुळे आपली पुरेशी झोप पूर्ण होते व आपला शरीरामध्ये आळस निर्माण होत नाही. जर आपल्या शरीरातून आळस पूर्णपणे दूर करायचा असेल तर आपल्या शरीराला एक विशिष्ट शिस्त लावून घेणे खूप गरजेचे आहे. एक दररोजची दिनचर्या ठरवणे त्याहूनही खूप गरजेचे आहे.

 

कारण यामुळे आपण आपल्या शरीरातील आलस लवकरात लवकर घालू शकतो. मानसिक स्तरावर आळस निर्माण होण्याचे पहिले कारण म्हणजे जुन्या धारणा. जर आपण एखादे काम करत असताना पूर्वी त्या कामांमध्ये आपल्याला अपयश आले असेल आणि जर आपण हे पुन्हा काम करण्यासाठी आपल्याला सांगितले व आपण असे म्हणत बसलो की यामध्ये मला पहिले अपयश आलेले आहे पुन्हा ही अपयशच येईल. असे जर आपण मनामध्ये धारणा केली तर यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये आळस निर्माण होण्याची शक्यता असते.

 

त्यामुळे आपल्या शरीरातून जर आपल्याला आळस पूर्णपणे घालवायचा असेल तर स्वतःवर आपला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे. मानसिक स्तरावरील दुसरे कारण म्हणजे आळशी व्यक्तींच्या संगतीत राहणे. अशा व्यक्तींच्या संगतीत राहिल्यामुळे देखील आपण आळशी नसून देखील त्या व्यक्तींच्या संगतीमुळे आपण आळशी बनत जातो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेल्या आळशी व्यक्तींना आपल्यापासून लांब करणे खूप गरजेचे असते.

 

मानसिक स्तरावरील तिसरे कारण म्हणजे कामाला पुढे ढकलणे व कामाची टंगळमंगळ करणे. कामाला पुढे ढकलल्यामुळे व काम टंगळमंगळ केल्यामुळे ताण तणाव निर्माण होतो. त्यामुळे जे काही आपले रोजचे काम आहे ते त्या त्या वेळेत पूर्ण हे नक्की केले पाहिजे. मानसिक स्तरावरील पुढचे कारण म्हणजे आपले ध्येय स्पष्ट नसणे. बुद्ध म्हणतात माणसांमध्ये आळस तेव्हाच निर्माण होतो जेव्हा त्याच्या मनामध्ये एक ध्येय निश्चित नसते किंवा त्या ध्येयामाचे उद्दिष्ट स्पष्ट नसते.

 

त्यामुळे आपण जे काही आपल्या जीवनामध्ये करणार आहोत ते ध्येय निश्चित असणे खूप गरजेचे असते. मानसिक स्तरावरील पुढचे कारण म्हणजे कोणतेही काम करत असताना त्यामध्ये करण्यासाठी कोणते तरी कारण असणे खूप गरजेचे असते. कारण कारण असल्याशिवाय आपण ते काम मनःपूर्वक करत नाही. आणि त्यामुळेच आपल्यामध्ये आळस निर्माण होतो. म्हणून कधीही कोणतेही मोठे काम करत असताना त्यामागे कोणते तरी मोठे कारण असणे खूप गरजेचे असते.

 

अशाप्रकारे ही काही कारणे आहेत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आळस निर्माण होत असतो. जर आपल्या शरीरातून आपल्याला आलस पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर नक्कीच या कारणांचा विचार करणे खूप गरजेचे आहे आणि जर आपण ही कारणे आपल्या शरीरातून काढून टाकले तरच आपल्या शरीरातून आळस पूर्णपणे निघून जाईल व आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगले पुरुष बनू शकतो.

 

तुम्ही देखील तुमच्या शरीरातून आळस काढायचा असेल तर नक्कीच या गोष्टींचा विचार करा. यामुळे नक्कीच तुमच्या शरीरातील आळस पूर्णपणे निघून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *