मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की, झाडूचा थेट संबंध हा माता लक्ष्मीची आहे. वास्तुशास्त्र मध्ये तर, झाडू विषयी अनेक असे नियम सांगितले आहेत की, ज्यामुळे आपल्याला त्याचे शुभ अशुभ फळ मिळत असतात. या लखामध्ये आपण झाडू विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. झाडू कोणत्या दिशेला ठेवणे योग्य असते? झाडू कधी बदलावा? झाडू बद्दल अशा कोणत्या चुका तुम्हाला करायचा नाही? की, ज्या वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेला आहे.
जर तुम्ही या चुका केला तर, तुम्हाला जीवनामध्ये दरिद्री, समस्या आणि अडचणी यांचा सामना करावा लागतो. जर, तुम्ही झाडूशी संबंधित असलेले योग्य उपाय शिकून घेतले आणि ते जर तुम्ही केले तर, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. की जेणेकरून तुमच्यावर गरिबीची समस्या येणार नाही. तुमच्यावर लक्ष्मीची कृपादृष्टीने घरामध्ये पैसा टिकून राहील हे उपाय कोणतेही त्याचीच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आपला भारतीय जीवनात घराला मंदिर मानले जाते. आणि असंही म्हटले जाते की, जर आपण घर स्वच्छ नीट नीट ठवलं तर घरामध्ये लक्ष्मी वास करते. या उलट जर आपण घर अस्वच्छ ठेवले तर, त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या वेळेस झाडू मारला तर, नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील.
वास्तुशास्त्र मध्ये असे स्पष्टपणे सांगितलेले आहे जर तुम्ही सूर्योदयानंतर सकाळच्या वेळी झाडू मारला तर, घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्हाला सकाळच्या वेळेस झाडू मारण्यास जमत नसेल तर, दुपार व्हायच्या आधी झाडू मारावा. झाडूला कशा ठिकाणी ठेवावे ज्या ठिकाणी तो आपल्या वारंवार नजरेस येणार नाही.
जर दिवसातून एक दोन तीन वेळा पाहन्यात आला असाल तर चालू शकते परंतु वारंवार तो तुमच्या नजरेस येणार नाही अशा ठिकाणी त्याला लपवून ठेवा. तुमच्या घरातील झाडू अन्य व्यक्ती पाहत असेल तर, ते आशुभ मानले जाते. झाडू कोणाच्याही नजरेत येणार नाही अशा ठिकाणी ठेवा. दुसरा नियम असा की, जुन्या किंवा तुटक्या झाडू चा वापर करणे अशुभ मानले जाते. म्हणून कधीही अशा तुटक्या किंवा जुना झाडू चा वापर करू नये. यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते.
तिसरा नियम म्हणजे झाडू कधीही उभा ठेवू नये. हा खूपच जास्त अपशकुन मानला जातो. झाडूला नेहमी आडवे करून ठेवले पाहिजे. पुढील नियम म्हणजे सायंकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नका. असे केल्याने लक्ष्मी त्यांच्या घरातून निघून जाते. पुढचा नियम म्हणजे झाडूला कधीही ओलांडू नये. हे खूपच आशुभ मानले जाते. झाडूला कधीही पायाचा स्पर्श करू नये. कारण झाडूला लक्ष्मी मानले जाते आणि लक्ष्मीला स्पर्श करणे हा खूपच आशुभ संकेत मानला जातो.
त्याचबरोबर झाडू अशा ठिकाणी ठेवू नका तिची जागा स्वच्छ नसेल. हे झाले झाडूच्या बाबतीत न करणारी नियम आता आपण पाहूया की असे कोणते उपाय करावेत. की ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो. शुक्रवारच्या दिवशी झाडू मारताना थोडेसे सैंधव मीठ टाकून झाडू मारावा. असे केल्याने लक्ष्मी टिकून राहते. झाडू खरेदी करत असताना नेहमी शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करावी.
घरामध्ये झाडू तुम्ही नेहमी पश्चिम दिशेला ठेवावे. असे केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो. घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास होतो. तुम्ही झाडू उत्तर दिशेस ठेवला तर धनाच्या संबंधी कोणतेही निर्णय घेतले तर त त्यामध्ये यश हे निश्चित येईल. झाडू धुवत असताना नेहमी स्वच्छ पाण्याने धुवावा. असे हे उपाय केल्याने नक्कीच घरामध्ये लक्ष्मीचा वास राहून घरातील असलेले पैशाची समस्या निघून जाते.
अशाप्रकारे हे काही झाडूशी संबंधित नियम आहेत. ज्याचा जर तुम्ही अवलंब केला तर, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होणार नाही. घरातील प्रत्येक कार्यात यश येईल. घरात लक्ष्मी टिकून राहील.