मित्रांनो आपल्या घरी लक्ष्मीचे नेहमी वास्तव्य असावे असे वाटत असेल तर आम्ही जे नियम सांगणार आहोत ते तुम्ही पाळा याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल. साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान माता लक्ष्मीचा प्रत्येक वास्तुत आगमन करते. ज्या घरातील वातावरण अल्लाददायक असते प्रसन्न असते अशा घरात लक्ष्मी स्थाई वास करते. लक्ष्मीची कृपा बरसल्यावर त्या घराची भरभराट नक्की होते. घराची चौफेर प्रगती होते. घरात बरकत येते. म्हणून जाणून घेऊया की सकाळी तसेच सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करणे कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. जेणेकरून माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरात होईल.
मित्रांनो सकाळी तसेच सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान माता लक्ष्मी प्रत्येक वास्तुत येते अशावेळी आपल्या वास्तूची दारं उघडी असायला हवीत. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपती असेल किंवा आपल्या दारात तुळस असेल त्याची आणि घराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उदबत्ती लावावी. धूप लावावा. मित्रांनो जर तुमचं दुकान किंवा बिजनेस असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या देवांची पूजा-आरती करून आपण त्या ठिकाणी नैवेद्य ठेवावा साखर फुटाने खडीसाखर पेढे गुळ खोबरे जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य ठेवावा आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना तो जरूर द्यावा. या छोट्या छोट्या गोष्टी माता लक्ष्मी प्रसन्न करतात.
मित्रांनो साडेसहा ते साडेसात या एका तासांमध्ये आपण चुकून सुद्धा कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये. काहीही खाऊ नये कारण देवपूजा होण्यापूर्वी आपण कोणत्याही गोष्टी ग्रहण करायचे नसतात. या एका तासांमध्ये सकाळी आणि सायंकाळी पैशांची देवाण-घेवाण चुकूनही करू नये.
या एक तासात कोणालाही मीठ आणि तेल या वस्तू देऊ नयेत. शक्यतो कमीत कमी बोलावे मौन पाळावे आणि वाद-विवाद टाळावेत. विशेष करून कोणत्याही स्त्रीसोबत वाद विवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी कारण महिला या प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप असतात. माता लक्ष्मीच्या आगमनाचा या काळात जर घरात भांडण तंटा किंवा वादविवाद किंवा अपशब्द बाहेर पडत असतील तर माता लक्ष्मी आपल्याकडे कधीच येणार नाही.
तसेच या काळामध्ये नखे काढू नयेत. केस कापू नयेत. कपडे धुणे किंवा किंवा भांडी घासू नयेत. या काळात कोणत्याही व्यक्तीस जामीन राहू नये. या काळामध्ये जर आपण जामीन राहिलात तर फार मोठ्या आर्थिक संकटामध्ये आपण सापडू शकता. एखाद्या फोनवरती एखादी महत्त्वाची गोष्ट बोलणे या एका तासाच्या काळात आपण टाळाव. तस जर पैसे द्यावेच लागत असतील तर हे पैसे देताना बोटांची कात्री करू नये. यामुळे आर्थिक तोटा म्हणजेच पैशांमध्ये मोठा घाटा तुम्हाला येऊ शकतो आणि मित्रांनो या काळामध्ये आपण नामस्मरण अवश्य करावे. तुमचे जे इष्ट देवत, तुमचे कुलदेवत किंवा तुम्ही ज्या देवतेस मानता त्या देवाच्या मंत्राचा जप किंवा त्या देवतेच्या नामाचा जप अवश्य करावा.
आणि मित्रांनो देवपूजा झाल्यानंतर आपल्या आपल्या कपाळी आपण गंध अवश्य लावावा आणि सकाळी घराबाहेर पडताना देवाजवळ आपण जे फुल वाहिलेलं असतं त्यातील एक फुल आपल्या स्वतःच्या खिशात ठेवावं आणि नंतरच बाहेर जावं. मित्रांनो हे सर्व नियम आपण जर नित्य नियमाने पाळत राहिलो तर माता लक्ष्मीचा अखंडवास स्थायी वास आपल्या वास्तूमध्ये नक्की निर्माण होतो. आपल्या घराची भरभराट होते. या संधी काळात रोज सकाळी साडेसहा ते साडेसात आणि सायंकाळी साडेसहा ते साडेसात या कालावधीत जी व्यक्ती झोपते जी व्यक्ती निद्रिस्त होते ती व्यक्ती सात जन्म पर्यंत रोगी बनते सोबतच ती दरिद्री जीवन सुद्धा जगते म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनात पैसा नावालाही उरत नाही.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.