मित्रांनो आजकाल खूपच सर्वांचे धावपळीचे जीवन चालू आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांचे आपल्या आरोग्याकडे विशेष असेल लक्ष देखील राहत नाही. म्हणजे सर्व लोक आपल्या कामांमध्ये इतके गुंतून राहिलेले आहेत की स्वतःकडे वेळ देण्यासाठी देखील त्यांच्याकडे वेळ नसतो. तर या धावपळीच्या जीवनामध्ये आपणाला असंख्य रोगांचा सामना देखील करावा लागतो आणि यामुळे आपल्याला खूपच त्रासदायक जीवन देखील जगावे लागते आणि जो काही कमावलेला पैसा आहे हा देखील आपल्या आजारावरती खूप सारा खर्च करावा लागतो.
अनेक लहान-मोठे रोग हे डोके वर काढताना आपल्याला पाहायला मिळतातच. परंतु काही वेळेस काय होते की आपण या आजारांवरती डॉक्टरांचा सल्ला घेतो तरीदेखील आपणाला त्याचा फरक जाणवत नाही. तर आपण घरगुती उपाय केले तर अनेक आजारांपासून आपली सुटका देखील होऊ शकते. तर आज मी तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहे. ही वनस्पती आपल्या विविध रोगांवरती खूपच फायदेशीर अशी आहे.
तर आपल्या परिसरामध्ये तुम्ही गुलबाज नावाची वनस्पती पाहिलेली असेल. ज्याची फुले ही संध्याकाळी चार ते पाच नंतर उमलतात आणि रात्रभर ती उमलेली असतात आणि ही वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर देखील आहे. अनेक जण या फुलांच्या माळा देखील करीत असतात.
तर मित्रांनो ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला जर एखादी जखम झाली असेल आणि ती काही केल्याने जखम भरून निघत नसेल तर तुम्ही अशा वेळेस या गुलबाज वनस्पतीची पाने बारीक करून ती पेस्ट तुम्ही जर आपल्या जखमांवरती लावली तर तुमची नक्कीच जखम भरून येते.
शुगर वाले लोकांची जखम ही लवकर भरून येत नाही तर अशा लोकांनी नक्कीच हा उपाय करायला हवा. त्यांची जखम नक्कीच भरून येईल. तसेच अनेकांना खाज, खुजलीचा त्रास असतो म्हणजेच कुष्ठरोगांसाठी देखील तुम्ही या वनस्पतीचा वापर करू शकता. तर यासाठी तुम्ही सात गुलबाज वनस्पतीची फुले तोडून आणायची आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहेत. आणि याची फुले एकदम बारीक करून घ्यायची आहेत म्हणजेच एक प्रकारची पेस्ट करायची आहे.
आणि या फुलांमधून जो काही रस निघतो हा रस तुम्हाला शरीरावरती ज्या ठिकाणी खाज खुजली होते त्या ठिकाणी जर लावला तर तुमची नक्कीच खाज खुजली दूर होईल आणि कुष्ठरोग्यांसाठी तुम्हीही फुलांचा रस लावला तर हा कुष्ठरोग तुमचा नक्कीच दूर होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या फुलांचा रस लावू शकता.
तसेच मित्रांनो जर तुमच्या पायाला किंवा शरीराला सूज आली असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही या गुलबाज वनस्पतीची पाने तोडून ती बारीक करून लावली तर ती जी सुजन आहे म्हणजे सूज आहे ती नक्कीच कमी होणार आहे. तर अशा प्रकारे या वनस्पतीचा फायदा आपल्याला होतो आणि याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळवा.