मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतेच कारण देवघरा शिवाय घर अपूर्णच मानले जाते देवघरांमध्ये आपण आपले कुलदेवी व अनेक वेगवेगळे देव स्थापन करत असतो त्याचबरोबर त्या संबंधित लागणारे साहित्य देखील आपण देवघरामध्ये ठेवत असतो आपण रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करत असतो आणि अशाच काही वस्तू देखील आपण आपल्या देवघरांमध्ये ठेवतो त्या देवघरांमध्ये ठेवल्या नंतर आपल्याला त्रास होतो आणि घरामध्ये विनाकारण वाद विवाद तंटा चालू होतात व ते देवघरांमध्ये ठेवणे अशुभच मानले जाते तर ते कोणत्या वस्तू आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो ज्या आता मी वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही देवघर सोडून इतर कोणत्याही ठिकाणी ठेवला तरी देखील चालू शकतो. लोक यासाठी त्या वस्तू देवघरामध्ये ठेवतात त्यांना वाटत असते की त्या सर्व धार्मिक आहे आणि यांची पूजा केली पाहिजे हरिकृष्णांनी असं सांगितलं आहे की कलियुगात मनुष्य काही अशुद्ध वस्तू धार्मिक म्हणून पूजा करेल ज्याला आपल्या शास्त्रांमध्ये वर्जित मानले गेलेले आहे. कलियुगात मनुष्य अधार्मिक आणि अशुभ वस्तूची पूजा करेल. चला तर मग मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी नाही ठेवल्या पाहिजेत.
मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे दिवा आणि धुपरक आपली भारतीय परंपरा मातीशी जोडली गेलेली आहे त्यामुळे मंदिरामध्ये पारंपारिक दृष्ट्या मातीचा दिवा ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही मातीचा दिवा ठेवू शकत नाही तर धातूचा ज
चा उपयोग केला तरी चालेल जर तुमची देवावर जास्त श्रद्धा असली तर तुम्ही गाईच्या गोबराच्या शेणाचा वापर करून त्यावर तूप व गूळ घालून धूप देऊ शकता असं केल्याने घरामध्ये सुख शांती येणार आहे व समृद्धीचे वातावरण देखील तयार होणार आहे.
मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे स्वास्तिक देवघरामध्ये स्वास्तिक हे आवश्यक असले पाहिजे. जर तुमच्याकडे स्वास्तिक नसेल तर तुम्ही हळदीकुंकू आणि देखील बनवला तरी देखील चालू शकते तुमच्या घराची शक्ती समृद्धी आणि शुभ लाभाचे प्रतीक मानले जाते हेच मुख्य कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आवश्यक काढले जाते.
मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कलश आपल्या हिंदू धर्मामध्ये कलश हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मांनले आहे . आपल्या देवघरामध्ये हळदीकुंकू ने स्वास्तिक बनवून त्यावरती हा मंगल कलश ठेवायचा आहे कारण याच्यामुळे घरामध्ये कायम समृद्धी बनवून राहते . आणि सूख ऐश्वर्या ची तात्काळ प्राप्ती होते.
मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की मंदिरामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत.
मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे गणपती बाप्पांची विषम संख्या मध्ये मूर्ती देवघरांमध्ये गणपतीची मूर्ती एक तीन पाच अशा विषम संख्येमध्ये ठेवायच्या नाहीत देवघरांमध्ये गणपतीची केवळ दोनच मूर्ती ठेवायची आहे या ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या मांगल्याची मनोकामना करत असाल तर श्री गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजावर आतल्या बाजूस फ्रेम करून लावला तरी देखील चालू शकते. इथेच मोठी चूक होते की घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती बाहेरच्या बाजूने मुख करून लावतात. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे देखील जावे लागते.
मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुकडा तांदूळ आपल्या मंदिरामध्ये कधीही तुटलेले तुकडा तांदूळ ठेवायचे नाही त्यासोबत जुने अर्पण केलेले तांदूळ जास्त वेळ तिथेच ठेवायचे नाहीत हे नकारात्मक ऊर्जा पसरवत असते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की तुम्ही देवघरामध्ये ठेवत असलेल्या तांदळाचा वापर तुम्ही दुसऱ्या तांदळामध्ये मिसळून केला तरी देखील चालू शकतो यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव मिळतात.
मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पूर्वजाचे फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा बाजूला आपल्या पूर्वजांचा फोटो ठेवला असेल तर तिथून काढायचा आहे. कारण वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की देवघरामध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवणे अशुभ मानले जाते यांनी अशुभ परिणाम देखील प्राप्त होत असतात.
बरेच लोक साधुसंतांचे मुर्त्या किंवा फोटो देवघरांमध्येच ठेवत असतात. याला देखील अशुभ मानले जाते जर तुम्ही कोणत्या साधूसंतांना मानत असाल तर त्यांचा फोटो भिंतीवर लावायचा आहे परंतु पूजा घरामध्ये चुकून देखील तुम्हाला लावायचा नाही काळभैरव आणि शनींची मूर्ती देवघराच्या मंदिरामध्ये काळभैरव शनिदेव किंवा काली मातेची मूर्ती अजिबात ठेवायची नाही.