मित्रांनो प्रत्येकालाच आपण कायम तरून दिसावे असे वाटतच असते. म्हणजेच आपला चेहरा हा चार चौघांमध्ये उठून दिसावा यासाठी सर्वजणच हे प्रयत्न करीत असतात. त्यासाठी ब्युटी पार्लर सल्ला देखील घेत असतात. ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर आपणाला अनेक प्रकारच्या क्रीम तसेच लोशन देखील दिले जाते. ज्यामुळे आपला चेहरा चमकदार दिसेल. परंतु अनेक जणांना आपल्या चेहऱ्यावरती खूपच सुरकुत्या येत राहतात. म्हणजेच जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या यायला लागतात. म्हणजेच अनेक जणांना गालावरती खड्डे देखील पडलेले दिसतात. यामुळे मग आपला चेहरा चार चौघांमध्ये उठून दिसत नाही. मग यावेळेस आपण खूपच निराश होतो आणि क्रीम वापरून देखील त्याचा साईड इफेक्ट देखील आपणाला होतो आणि मग सुंदर दिसण्याऐवजी आपला चेहरा विद्रूप दिसतो.
तर आज मी तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा चेहरा हा चमकदार दिसेल आणि चार चौघांमध्ये देखील तुम्ही उठून दिसाल. तर जाणून घेऊयात हे घरगुती उपाय नेमके कोणती आहे ते. तर घरगुती उपाय करण्यासाठी आपणाला हळकुंड लागणार आहे. हे हळकुंड घेऊन आपल्याला एका दगडावरती थोडेसे पाणी घेऊन त्यावरती हे हळकुंड घासायचे आहे आणि त्याची जी पेस्ट निघेल म्हणजे त्यातून जी हळद निघेल ही पेस्ट आपणाला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल घालायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्या गालावरती लावायचे आहे.
यामध्ये जे आपण हळकुंड रगडून जी हळद घेतो ती थोडीशी घ्यायची आहे आणि त्यामध्ये खोबरेल तेल एक चमचा मिक्स करून पेस्ट बनवल्यानंतर हे आपणाला तेल आपल्या दोन्ही गालावर लावून घ्यायचे आहे. किमान अर्धा तास तरी हे आपल्या गालावर तसेच ठेवायचे आहे. अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही एका सुती कपड्याने किंवा टिशू पेपरने ते पुसून घ्यायचे आहे. म्हणजेच तुम्ही चेहरा धुवायचा नाही. तर टिशू पेपरने पुसून घ्यायची आहे.
यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्या असतील किंवा खड्डे असतील ते नक्कीच दूर होतील. यानंतरचा जो उपाय म्हणजे आपणाला एक भिजवलेले बदाम घ्यायचे आहे आणि यावरील टरफल काढून घ्यायचे आहे आणि हे बदाम एका दगडावरती थोडेसे कच्चे दूध घेऊन घासायचे आहे आणि याची जी पेस्ट असेल ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला गालाला लावायचे आहे.
या पेस्टमुळे देखील आपल्या जे काही चेहऱ्यावरील सुरकुत्या असतील किंवा खड्डे असतील हे देखील निघून जातील. ही पेस्ट देखील तुम्हाला अर्धा तास किंवा एक तास अशीच ठेवायची आहे आणि ही पेस्ट लावून झाल्यानंतर तुम्ही आपला चेहरा पाण्याने धुवायचा नाही तर टिशू पेपरने किंवा एखाद्या सुती कपड्याने पुसून काढायची आहे. यामुळे देखील तुमचा चेहरा चमकदार नक्कीच बनेल.
तसेच यानंतरचा उपाय म्हणजे या उपायासाठी आपणाला एक जायफळ घ्यायचे आहे. आपल्याला एका दगडावरती एक चमचा कच्चे दूध टाकून त्यावरती जायफळाने रगडायचे आहे आणि जी पेस्ट निघेल ही पेस्ट आपल्याला आपल्या दोन्ही गालावरती लावायची आहे. अगदी हलक्या हाताने आपणाला ही पेस्ट मसाज करत लावायची आहे.
अर्धा तास आपणाला ही पेस्ट अशीच ठेवायची आहे. अर्धा तास झाल्यानंतर आपणाला स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे काही सुरकुत्या असतील किंवा डाग किंवा खड्डे पडलेले असतील यामुळे नक्कीच दूर होतील. तर वरील सांगितल्याप्रमाणे हे उपाय आपल्या चेहऱ्याला चमकदार बनवण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी फायदेशीर ठरतील. यापैकी कोणत्याही उपाय तुम्ही करा यामुळे नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर असे हे घरगुती विना खर्चिक असे उपाय अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.