मित्रांनो पांढरे, चमकदार, आणि निरोगी दात प्रत्येकाला हवे असतात. जशी शरीराच्या बाकी अवयवांची स्वछता जरूरी असते, त्याचप्रमाणे, दातांची काळजी घेणे खूपच जरूरी असते. आपण जेव्हा हसतो, तेव्हा आपले दात दिसतात. उत्तम प्रकारे सरळ रांगेत असलेले दात हे नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणात भर घालतात. आणि तेच दात जर स्वछ असतील, तर ते आपल्या सौंदर्यात अजूनच भर घालतात. अनियमित जीवनशैली आणि चुकीचे खाणे-पिणे यामुळे दातामध्ये कीड निर्माण होते आणि दात वेदना द्यायला सुरू करतात. दातदुखी हे अतिशय त्रासदायक दुखणे आहे. त्यामुळे आपल्याला रोजची कामे करणे पण कठीण होते.
त्याच्या वेदांनांनी आपली मानसिक अस्वस्थता वाढते. यातून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकिलर घेतात. पण हा झाला तात्पुरता उपाय. यामुळे दातातील कीड मरत नाही. जर यावर वेळीच उपाय केला नाही, तर ही समस्या तुमच्या दातांना आतून कमजोर करून खिळखिळे करून सोडते. दातांची मुळे जर सैल झाली, तर दातदुखी होऊ शकते. बरे, यावरचे डॉक्टरचे उपाय महागडे असतात. तर मग आपण थोडे घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे आणि तुम्ही सुद्धा ह्या समस्येमुळे बैचैन असाल, तर घाबरू नका, आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येवर मात करू शकाल.
तर मित्रांनो दिवसातून रोज दोनदा दातांची स्वछता करा आणि तुम्ही हे जाणता का लवंग ही दातांच्या समस्येवर कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. लवंग एक अशी औषधी आहे, जे गुणांचे भांडार आहे. आणि दातातील वेदना किंवा दातांमध्ये अडकलेले कीटाणूचा सामना करण्यासाठी लवंग आपली मदत करते. लवंगेत अॅंटी-बैक्टेरियल गुणधर्म आहेत. लवंगेमुळे तुमच्या दातातील जंतुसंसर्ग नाहीसा होतो, कीड मरते. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे, की लवंगेच्या तेलात कापसाचा बोळा बुडवून तो जिथे दातात कीड लागली आहे, त्यावर ठेवायचा आहे.
तुम्ही अजूनही एक उपाय करू शकता, त्यासाठी तुम्हाला 3-4 लवंगा कुठून त्याचे चूर्ण बनवायचे आहे. कीड लागलेल्या दातावर ते ठेवून थोडी लाळ बनू द्या, त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. नियमित जर तुम्ही असे केलेत, तर तुम्हाला नक्कीच आराम पडेल. तसे अनेक उपाय आहेत, पण हा उपाय सगळ्यात उत्तम आहे. आणि त्यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुरटी, याचा दूसरा उपाय पण आहे. तुम्हाला अर्धा चमचा तुरटी पाऊडर करून, मोहरीच्या तेल थोडे कोमट करून त्यात तुरटी पाऊडर मिसळा व एक पेस्ट तयार करा. ती कीड लागलेल्या दाताला लावा.
मित्रांनो यामुळे सुद्धहा तुमच्या दाताच्या दुखण्याला आराम मिळू शकेल. तुमचे दाताचे दुखणे कमी होईल व सतत हा प्रयोग केला, तर दातातील कीड कायमची नाहीशी होईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने घरामध्येच असणाऱ्या या तीन पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे यामुळे मित्रांनो आपल्या दाता संबंधित सर्व अडचणी दूर होतीलच आणि त्याचबरोबर दातामध्ये जी काही कीड असेल तेही लवकरात लवकर निघून जाईल आणि दात पांढरे चमकदार आणि मजबूत बनते तर मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने तुरटी लवंग आणि मोहरीचे तेल या तीन पदार्थांचा वापर करून सांगितलेला उपाय किंवा तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा यामुळे तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला नक्की दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.