मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे अनेक वनस्पती आहेत त्या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आणि म्हणूनच अनेकदा आपण या वनस्पतीच्या फायद्यापासून वंचित राहतो. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका दुर्लक्षित असलेल्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत. ही वनस्पती कशी तर प्रत्येकाच्या ओळखीची आहे परंतु अनेकांना या वनस्पती बद्दल फारशी माहिती नाही तसेच या वनस्पतीच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत की ज्या वनस्पतीचा उपयोग नाही आपण आपल्या शरीरातील वात समस्या पित्त समस्या तसेच हाडांची कमजोरी यासारख्या अनेक समस्या मुळापासून दूर करणार आहोत.
आणि ही वनस्पती राना मध्ये शेतामध्ये पाहायला मिळते. आणि या वनस्पतीचे फळ काटेरी असते. हे फळ सुरुवातीला हिरव्या रंगाचे असते पण नंतर जसे जसे पिकत जाते तसे या फळाचा रंग भुरट्या स्वरूपाचा होतो. या फळाचा वापर करून आपण अनेकदा एकमेकांना चिडवण्यासाठी व खेळण्यासाठी वापरलेले असेल तसेच हे फळ काटेरी असल्याने अनेकदा आपल्या शर्टाला सुद्धा सहज रित्या चिपकुन जाते. एकंदरीत या फळाचे वर्णन वाचताना आपल्याला हे फळ नेमके कोणते आहे व या वनस्पतीचा एकंदरीत अंदाज आलाच असेल चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल..
तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत या वनस्पतीचे नाव आहे गोखरू ही वनस्पती आपल्याला अनेकदा आजूबाजूला पाहायला मिळते. या वनस्पतीचे फळ काटेरी असते तर पान अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असते. या वनस्पतीचे पान-फूल मूळ खोड अनेक अंगांचा उपयोग करून आपण आपले जीवन समृद्ध बनवू शकतो आणि जर तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार, खाज, खरूज ,नायटा गजकर्ण असेल तर अशा वेळी या पानांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
आणि या वनस्पतीच्या अंगी अँटी बॅक्टरियल व अँटी फंगल गुणधर्म असल्याने आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो त्याचबरोबर या वनस्पतीच्या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म असतात पण त्याचबरोबर जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार झाला असेल खाज, खरूज, नायटा, गजकर्ण अशावेळी या पानांची पावडर बनवून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट प्रभावी जागेवर लावायची आहे.असे काही दिवस केल्याने तुमच्या शरीरावरील कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार लवकरच दूर होईल. आपल्यापैकी अनेक जण केस गळती ज्या समस्येला त्रस्त झालेले असतात.
आणि जर अनेक उपाय करून सुद्धा केस गळण्याची काही थांबत नाही अशा वेळी आपण कोणतेही तेल घेऊन किंवा तुमच्याकडे जर खोबरेल तेल असेल तर अशा वेळी या तेलामध्ये आपल्याला या वनस्पतीची पाने चांगल्या पद्धतीने उकळायचे आहे.तसेच या वनस्पतीचे फळ सुद्धा आपण तेलामध्ये टाकून उकळू शकतो त्यानंतर हे तेल आपण आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यास आपल्या केसांची गळती थांबते तसेच केसांना पोषक तत्व प्राप्त होतात आणि नैसर्गिक त्यांची वाढ सुद्धा चांगली होते. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास वारंवार होत असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप आपल्या कपाळाला लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.