मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकाला आपले घर स्वच्छ व सुंदर हवे असते आणि यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही परिश्रम घेत असतो. घर म्हटलं की घरातली प्रत्येक वस्तू आलीच. घराची स्वच्छता म्हटली की घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ हवाच. परंतु बऱ्याच वेळा तुम्ही निरीक्षण केले असेल की आपल्या घरात असलेले पाण्याचे नळ स्वच्छ करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करूनही बाथरूम आणि स्वयंपाकघरातील नळांवर खाऱ्या पाण्याचे डाग तसेच राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही साधे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही नळावरील खारट पाण्याचे डाग सहज काढू शकता. यामुळे तुमचे बाथरूम आणि स्वयंपाकघरातील नळ काचासारखे स्वच्छ दिसायला लागतील.
तर मित्रांनो आपल्या वॉश बेसिन वर असणारा नळ किंवा त्याचबरोबर आपल्या बाथरूम मध्ये जो नळ असतो तो एक तर प्लॅस्टिकचा किंवा स्टीलचा असतो. तर मित्रांनो प्लॅस्टिकचा जो नळ असतो तो जास्त प्रमाणात खराब किंवा घाण होत नाही. परंतु मित्रांनो जो स्टीलचा नळ असतो तो वारंवार वापरामुळे आणि पाण्यामुळे खूप खराब होतो.
त्याचबरोबर त्या नळावर एक घर तयार होतो आणि यामुळे तो नळ लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर त्यावर पडलेले डाग बघितल्यानंतर आपल्यालाही ते लवकरात लवकर स्वच्छ करून घ्यावे असे वाटते. परंतु मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या वॉश बेसिनमधील तसेच बाथरूम मध्ये असणारे स्टीलचे नळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या संबंधित जे उपाय करतो त्यावेळी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते.
त्याचबरोबर मित्रांनो स्वच्छ करण्यासाठी मार्केटमध्ये मिळणारे केमिकल किंवा इतर घटक हे खूप महाग असतात. त्याचबरोबर यांचा वापर केल्यामुळे आपल्याला हवे इतक्या प्रमाणात यावर असणारे काळे डाग निघत नाहीत आणि त्याचबरोबर इतकी महागडी केमिकल आणि पदार्थ वापरून सुद्धा आपल्या घरामध्ये जे स्टीलचे नळ आहे ते स्वच्छ होत नाहीत. त्यावर थोड्या प्रमाणात डाग हे शिल्लक राहतातच.
परंतु मित्रांनो अशावेळी जर आपण ही महागडे केमिकल्स घरामध्ये आणून त्यांचा वापर करणे ऐवजी आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करून घरामध्येच एखादे केमिकल जर आपण तयार केले तर यामुळे आपले घरामध्ये जे काही स्टीलचे नळ आहेत ते स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होईल.
तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय करत असताना मित्रांनो आपल्याला आपल्या घरामध्येच एक केमिकल तयार करायचा आहे. या केमिकलचा वापर आपण आपल्या घरामध्ये जे नळ आहेत स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे कोणत्याही नळ स्वच्छ करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यावर असणारे काळे काढून टाकण्यासाठी आपण या केमिकलचा वापर करू शकतो.
त्याचबरोबर मित्रांनो आपण हे जे केमिकल तयार करणार आहोत हे एक केमिकल तयार करण्यासाठी आपल्याला खर्च सुद्धा अगदी कमी येणार आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या काही वस्तूंचा वापर करून आपण एक केमिकल तयार करायचे आहे.
तर मित्रांनो आता पण जाणून घेऊयात की हे केमिकल कशा पद्धतीने तयार करायचे आहे आणि याचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये असणारे स्टीलचे नळ कशा पद्धतीने चमकू शकतो याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे म्हणजेच अर्ध्या लिंबूचा रस आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचा आहे.
मित्रांनो मीठ हे स्टीलच्या नळावर असणारे काळे डाग दूर करण्यासाठी खूप उपयुक्त असतं आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बेकिंग सोडा म्हणजेच आपण आपल्या घरामध्ये जो खाण्यासाठी सोडा वापरतो तो सोडा. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला अर्धा लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि मित्रांनो हे जे मिश्रण तयार होईल. हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचे आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो ही जी पेस्ट म्हणजेच याचे मिश्रण जे तयार झालेले आहे हे मिश्रण आता आपल्याला आपल्या घरामध्ये जो स्टीलचा नळ आहे किंवा डाग पडलेला किंवा इतर कोणताही नळ जो खराब झालेला असेल किंवा त्याच्यावर डाग पडलेले असतील त्या नळावर ही पेस्ट आपल्याला त्या अर्ध्या लिंबू च्या साह्याने लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दहा मिनिट आपल्याला ती पेस्ट त्या नळावर तसेच राहू द्यायचे आहे.
दहा मिनिटानंतर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जी भांडी घासायची घासणे असेल त्या घासण्याच्या साह्याने तो नळ आपल्याला व्यवस्थितपणे घासून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा नळ घासून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आणखीन एक पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे विनेगर. मित्रांनो विनेगर हे तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा किराणामालाच्या दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होईल. तिथून तुम्ही एक छोटीशी विनेगरची बाटली घेऊन यायचे आहे.
मित्रांनो त्यानंतर आपल्याला ही विनेगर त्या नळावर लावायचा आहे आणि पुन्हा एकदा घासणीच्या साह्याने किंवा चोथ्याच्या साहाय्याने आपल्याला हा नळ व्यवस्थितपणे घासून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने त्यावर विनेगर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जो खराब झालेला दात घासायचा ब्रश असेल त्या ब्रशने व्यवस्थितपणे अगदी कानाकोपऱ्यातून घासून घ्यायचा आहे.
यानंतर मित्रांनो यावर असणारे काळे डाग निघून गेलेले आहेत असे तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने यावर असणारे काळे डाग घालवल्यानंतर आता या नळावर चमक आणण्यासाठी आपण आणखीन एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे त्यावर आपल्या घरामध्ये असणारे कोलगेट लावायचे आहे.
त्यानंतर पुन्हा एकदा दात घासायच्या ब्रशने हा नळ व्यवस्थितपणे घासून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने या दोन तीन स्टेप तुम्हाला या उपायांमध्ये करायचे आहे. यामुळे तुमचा जो खराब झालेला किंवा डाग पडलेला नळ असेल तो अगदी नव्यासारखा चमकेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.