गरीबी इतकी होती की, ८ वर्ष गहाण टाकलेल्याच घरात राहत होतो, आणि पुढे १०८ स्वामींची पारायण झाली आणि स्वामींनी नशिबाचे पूर्ण फासेच बदलले …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा आलेला अनुभव याची माहिती घेणार आहोत हा अनुभव इस्लामपूर येथील विद्या बापट ताईंचा हा सुंदर अनुभव त्यांच्या शब्दात आपण माहिती घेणार आहोत. विद्या ताईंचा अनुभव ऐकत असताना अंगावर शहारे येत होते या अनुभवावरूनच असे समजते. की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची किती परीक्षा घेतात व शेवटच्या क्षणी त्यातून कसे त्यांना अलगद बाहेर काढतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताची किती परीक्षा घेतात. हे समजून येते मात्र महाराज परीक्षा घेत असताना आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. ते प्रत्येक वेळी आपल्या सोबतच असतात.

 

हा अनुभव सौ विद्याताई बापट यांचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया विद्याताई सांगतात. की श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत त्यांना वेगवेगळे अनुभव येत असतात. विद्याताई म्हणतात की मी स्वामींच्या सेवेमध्ये नवीनच आलेली आहे. आणि ज्या वेळेपासून मी स्वामींच्या सेवेत आलेली आहे. तेव्हापासूनच मला वेगवेगळे चमत्कारी अनुभव येत आहेत विद्याताई म्हणतात, की माझे लग्न होऊन मी इस्लामपूर येथे आले माझे माहेर वर्धा येथे आहे. आणि लग्न झाले एका वर्षामध्येच माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आणि एका एक्सीडेंट मध्ये सासरे वारले आणि सासुबाई सतत आजारी असायच्या आणि नवऱ्याच्या नोकरीवरच आमचा प्रपंचा चालत होता. घरामध्ये सततचे आजारपण होतेच आणि नवरा एकटाच कमावता होता.

 

आणि त्याचवेळी मी गरोदर होते बाळंतपणासाठी देखील आमच्याजवळ काहीही पैसा नव्हता. असा काटकसरीचा संसार आम्ही करत होतो. घरामध्ये पैशाची कमतरता आणि त्यातच बाळंतपण, घरच्यांचे आजारपण इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आली होती की अशी परिस्थिती कोणत्या शत्रूवरही ही यायला नको. वेळी ताईंची प्रवृत्ती खूपच काळजी करण्यासारखी होती. त्यामुळे ताईंना सरकारी दवाखान्यांमध्ये घेऊन गेले सरकारी दवाखान्यांमध्ये देखील काहीच उपाय करता येत नाही. म्हणून पुढच्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले त्यामुळे ताईंना एका प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये घेऊन जाण्यात आले.

 

प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली पण खर्चा खूप आला. हा खर्च भागवण्यासाठी नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून पैसा घेतला आणि दवाखान्याचा खर्च भागवला हे मला खूप दिवसांनी कळेल. अशा परिस्थितीतून जात असतानाच ताईंच्या नवऱ्याला एका ठिकाणी नोकरी मिळाली. पण त्या नोकरीतून मिळणारा पगार हा अपुरा होता. त्या पगारांमध्ये त्यांच्या कोणत्याच गरजा भागल्या जात नव्हत्या. सासुबाईंचे आजारपण आणि देणे देत असे काही दिवस लोटत होतं. पण परिस्थिती खूपच बिकट झाल्यावर राहत्या घरावर कर्ज काढून काहीतरी व्यवसाय करायचा असं ठरवलं मात्र त्या व्यवसायात देखील आम्हाला यश नव्हते. असेच सात आठ वर्ष आम्ही हालाखीचे दिवस काढले.

 

काही दिवसांनी मलाही नोकरी करावी लागली. आणि नोकरी करत असतानाच मला माझ्या मैत्रिणीने स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्यास सांगितले. त्यावेळी मी कोणी कोणतीही उपाय करायला सांगितले. तरी ती उपाय मी करत असते स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली व स्वामी समर्थ महाराजांची प्रतिष्ठापना घरामध्ये केली. महाराजांची प्रतिष्ठापना घरामध्ये केल्यानंतर घरातील आजारपण निघून गेले आणि घरची परिस्थिती थोडीफार सुधारली मात्र घरातील गरिबी निघून गेलीच नाही. माझ्या मैत्रिणीने सांगितल्यानंतरच मी महाराजांच्या सेवेत आली आणि महाराजांची मला अनुभूती आली माझ्या त्याच मैत्रिणीने मला सांगितले की स्वामी समर्थ महाराजांचे 108 पारायण कर म्हणजे तुझी परिस्थिती सुधारेल.

 

त्यावेळी मला स्वामी समर्थ महाराजांचे पारायण म्हणजे काय ते कसे करायचे याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी आणि माझी मैत्रीण आमच्या घरापासून जवळ असलेल्या स्वामी केंद्रात गेलो व तेथूनच स्वामी चरित्र पारायण याचे पुस्तक घेऊन आले आणि तेव्हापासूनच स्वामी समर्थ महाराजांचे पारायण सुरू केले. हे पारायण करण्यासाठी मला पहाटे चार वाजता उठावे लागायचे. चार वाजता उठून स्वामींचे पारायण करून झाल्यावर मी कामावर जायचे त्यामुळे मला सकाळी लवकर उठावे लागत होते ज्या दिवशी मी 108 स्वामी सारामृत चरित्राचे पारायण करणार असा संकल्प सोडून पारायण करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच आमच्या घरामध्ये प्रसन्नता वाटत होती.

 

पारायणाच्या पहिल्या दिवसापासूनच मला स्वामींची प्रचिती येऊ लागली. देव्हार्‍यामध्ये लावलेल्या दिव्यामध्ये मला वेगवेगळ्या प्रतिमा दिसू लागल्या फुल झाल्यासारखे दिसायचे. असे वेगवेगळे अनुभव तेव्हापासून मला यायला सुरुवात झाली. स्वामी सारामृत चरित्राच्या पाराण्याला यावेळी सुरुवात केली तेव्हापासूनच माझा दिवस खूप चांगला जात होता. स्वामी सारामृत चरित्राचे 108 पारायण ज्या दिवशी पूर्ण झाले त्या दिवशी गुरुवार होता. आणि त्यादिवशी एक मोठा चमत्कार झाला त्यादिवशी माझ्या मिस्टरांना मोठे काम मिळाले. ते मोठे का मिळाल्यामुळे त्यांचे मोठमोठ्या लोकांसोबत ओळख झाली. ते मोठे काम दहा लाखांचे होते. त्यामुळे आमच्या घराची परिस्थिती देखील सुधारली.

 

ताई म्हणतात की ज्यावेळी माझे स्वामी साराभृताचे 108 पारायण पूर्ण झाले. तेव्हापासून स्वामींनी माझी पूर्णपणे जबाबदारी घेतली माझ्यावर कोणत्याही अडचणी येऊ दिल्या नाहीत. प्रत्येक संकटातून माझी सुटका केली आणि आठ वर्ष जे आमचे राहते घर गहाणवट ठेवले होते ते घर आम्ही सोडवले. आमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहिली नाही. आणि घरातील आजारपण देखील निघून गेले सासुबाई ची तब्येत सुधारली. आमचा संसार सुखाचा झाला आम्हाला स्वामिनी सुखात समाधानामध्ये ठेवले. आधीचे दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते. मात्र स्वामींच्या कृपेने आम्ही खूप समाधानाने आहोत. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या सोबत असतात. त्यांना कधीही एकटे सोडत नाही. म्हणूनच महाराज सतत म्हणत असतात. की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

 

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *