मित्रांनो, आपल्या जीवनात प्रत्येकांना वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन असतात आणि त्यांच परिणाम आपल्या तब्येतीवर देखील होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील या टेन्शनमुळे उद्भवू शकतात. मनुष्यला टेन्शनमुळे मानसिक ताण तणाव निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये जीवनातील सगळं टेंशन सगळ्या चिंता सगळं दुखः संपून जाईल. यासाठीच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
1. आपलं दुखः प्रत्येकाला सांगत बसू नका.कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्की असतं.आणि ते तयारचं असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला.
2. आयुष्यात असं जगा, की तुम्हाला कमी लेखणारे लोकं एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे.
3. आयुष्य हे गरजेनुसार चालतं असतं. थंडीमधे सूर्याची आपण वाट पाहतो, आणि उन्हाळ्यात त्याचं सूर्याचा आपण तिरस्कार करतो.
4. ज्यावेळी माणसाच्या खिशामधे पैसा असतो ना, तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे. आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोकं विसारतात की, “तो कोण आहे.”
5. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसामोर करू नका. कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलंय.
6. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही. आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपवं लागतं.
7. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोकं मंदिरात दर्शनासाठी जातात. आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोकं मंदिरात फिरण्यासाठी जातात.
8. लोकांना तेवढीचं इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे. नाहीतर त्याचं लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागतं नाही.
9. पोटात गेलेलं विष एकाचं माणसाला मारतं.पण कानात गेलेलं विष सगळीच नातीचं संपवून टाकतं.
10. कुणाची गरीबी पाहून नातं तोडू नका. कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरी मिळतं नाही.
11. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा. आणि तुमचा आदर करणारा असावा.कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होतं.
12. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं. पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्वचं संपवून टाकेल. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे.
13. जर कोणी तुमचा वापर करून घेतं असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
अ) सगळ्यांना आपण एकाचं वेळी खुश ठेवू शकतं नाही.त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे. कारण तुम्ह सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात.
ब) स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्यांची.
क) प्रत्येक वेळी “हो” म्हणणं बंद करा. नाही सुद्धा म्हणायला शिका. नाही म्हणता आलं पाहिजे.
14. लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना.
15. पूर्ण 9 महीने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. म्हणून कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल.
16. फोटो काढायला एक सेकंद लागतो, पण इमेज बनायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या, आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या.
17. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करतं नाही. कारण त्यांना हे माहिती आहे की आकाशात कायम थांबता येतं नाही. शेवटी जमिनीवर यावचं लागणार आहे.
18. कदर करा त्यांची जर मनापासून तुमची काळजी घेतात. नाहीतर आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेचं जास्त असतात.
19. कधीही कुणासमोरं तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका. कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजचं नाही. आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासचं नाही त्यांना कधी तुमचं पटणारचं नाही.
20. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका. कारण लोकं त्या झाडाचं फळंही खातात आणि त्याचं झाडाला दगडं ही मारतात.
21. काही लोकं तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं त्यांच वागणं कुणालाचं कळतं नाही आहे. अश्या लोकांपासून सावध रहा. दूर रहा.
22. जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेचं नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या. विचार करा. नाहीतर नंतर पश्चाताप होईल.
23. आई शिवाय घर अपूर्ण असतं, आणि वाडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते सर्व लोकं ज्यांच्या डोक्यावर आई-वडिलांचा हात असतो.
24. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका. कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलतं असतात.
25. माणूस कितीही गरीब असला तरीही त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका. कारण त्याचा काळं आणि वेळ कधी बदलेलं हे कुणीचं सांगू शकतं नाही.
26. शिळ्या भाकारील आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका. कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तीने आपलं पोटं भरलं होतं. आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरचं कळते. हे लक्षात घ्या.
27. माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये.
अ) जूने कपडे
ब) जुने मित्र
क) साधं राहणीमान
ड) आई-वडील
अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत. या जर आपण आपल्या जीवनामध्ये आचारल्या तर नक्की आपण टेन्शन मुक्त होऊ.