हातही न लावता मोजून फक्त पाच मिनिटांत चांदीच्या वस्तू किंव्हा चांदीचे दागिने घरच्या घरी सहज चमकावा ..!!

Uncategorized

मित्रांनो, बहुतेक वेळा लग्नाच्यावेळी अथवा एखाद्या सणाला सोने-चांदीची दागदागिने करण्यात येतात. बऱ्याच वर्षांच्या वापरानंतर त्याची चमक कमी होते. ते काळपट दिसते. सोनाराकडे जाऊन त्याला उजळणे कमी खर्चिक नसते. त्यात सोनार पण ओळखीचा असावा लागतो. त्यापेक्षा घरी सुद्धा या उपायांनी दागिन्यांना चमक येते. यासाठीच काही टिप्स आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

चांदी हा असा धातू आहे, ज्याची चमक कालांतरानं कमी होऊ लागते. विविध प्रकारचे दागिने, भांडी, मूर्ती इत्यादी वस्तू चांदीपासून बनवल्या जातात. पण चांदीची वस्तू जोपर्यंत वापरात राहते, तोपर्यंतच ती चांगली राहते. परंतु जर तुम्ही काही काळ ती तशीच ठेवली तर हळूहळू त्याची चमक कमी होऊन ती काळी होऊ लागते. मात्र, ती काळी झाल्यामुळं खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य गमावत नाही. तर, हा धुळीचा आणि हवेचा धातूवर होणारा परिणाम आहे. पण चांदीच्या काळ्या पडलेल्या वस्तू तशाच वापरणं चांगलं वाटत नाही.

 

त्या पुन्हा स्वच्छ कराव्या लागतात. तुमच्या घरातील कोणताही चांदीचा दागिना किंवा वस्तू काळी पडली असेल तर, तुम्हाला ती साफ करण्यासाठी सोनाराकडे जाण्याची गरज नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही या वस्तू सहज चमकवू शकता. एक उपाय जो आपण घरच्या घरी करून अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपली चांदीचे दागिने चमकू शकतो.

 

त्यासाठी आपल्याला डिटर्जंट पावडर आणि चहा पावडर यांची गरज लागणार आहे. प्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये जे भांडे स्टीलचे असावे. इतर कोणत्या धातूचे हे भांडे नसावे. कारण त्यामुळे तुमचे भांडे खराब होण्याची शक्यता असते. या स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचा आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा डिटर्जंट पावडर आणि एक चमचा चाय पावडर घालायची आहे.

 

त्यानंतर त्यांना थोडी उकळी आल्यावर आपले चांदीचे दागिने त्यामध्ये घालायचे आहेत. हे करत असताना आपल्या गॅस हा मंद आचेवर असावा. ते पाच मिनिटे तसेच उकळू द्यावे आणि त्यानंतर गॅस बंद करावा. हे गार झाल्यानंतर आपले चांदीचे दागिने बाहेर काढून थोडे ब्रशने घासावी आणि पहा तुमचे जागेने स्वच्छ अगदी नवीन झाल्यासारखे होतील.

 

अशा प्रकारे आपण घरच्या घरी हा उपाय करून आपले चांदीचे दागिने स्वच्छ करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *