सुखी जीवन जगायचे असेल तर, काहीही झाले तरी या ४ गोष्टी कोणालाच सांगू नका….!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपले जीवन हे सुखी असाव. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे वेदना नसाव्यात. सुखी आणि समाधानाची जीवन जगायला हे सर्वांना आवडते. परंतु काही कारणास्तव आपल्या जीवनामध्ये काही समस्या येऊ लागतात आणि त्या समस्यांचा प्रभाव आपल्यावर कमी होण्याऐवजी तो वाढत जात असतो. यासाठीच आपले जीवन सुखी जगायचे असेल तर आपण कोणत्या 4 गोष्टी कोणालाही सांगू नयेत. याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचा कोणता व्यवसाय असेल किंवा कोणता धंदा असेल तर त्या व्यवसायामध्ये किंवा धंदा झालेला लॉस कोणालाही सांगू नये. याचे कारण असे की जर आपल्याला कोणत्या स्ट्रॅटजी वेळ नफा झाला तर तीच ट्रॅक्टरची प्रत्यक्षात तशीच्या तशी वापरून कोणालाही आपल्या प्रमाणे नफा मिळवता येणार नाही. परंतु जर आपल्याला कोणत्या कारणामुळे लॉस झाला तर ते कारण जर आपण इतरांना सांगितले तर आपले जे काही स्पर्धक असतात ते त्या कारणापासून सावधच राहतील व त्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करणार नाही. ज्यामुळे त्यांना लॉस होण्याचे कारण समजेल आणि ते त्यांच्या व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगतील.

 

दुसरी गोष्ट म्हणजे नवरा बायको मधील वाद विवाद हे त्या दोघांनाच माहीत असावेत. दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला कधीही घेऊ नये. नवरा बायकोचे वादविवाद हे तात्पुरते असतात. काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये सतत कटके उडत असतात. परंतु जर तुमचे कोणी दुश्मन असतील तर त्या दुश्मनांना तुमच्या मध्ये झालेल्या भांडणाचे कारण कळले किंवा भांडण झाल्याचे कळले तर ते तुमच्यात अजून भांडणे लावण्याचा प्रयत्न करतील. म्हणून नवरा बायकोने गरज नसताना आपल्या दोघांमधील भांडणाचे कारण इतरांना सांगू नये. ते आपापसात सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणाला सांगण्याची गरज आहे तर अशाच लोकांना सांगावे की जी लोक आपले हितचिंतक असतील व आपले भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो.

 

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात असलेल्या वैयक्तिक समस्या कोणालाही सांगू नये. कारण जे काही आपले शत्रू आहेत त्यांना आपला कोणकोणत्या समस्या आहेत तेच जाणून घ्यायचे असते आणि जर आपण आपल्या समस्यांबद्दल इतरांना बोलू लागलो तर, नक्कीच त्याचा फायदा आपले शत्रू घेऊन ते आपल्याला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करते. व आपल्या समस्या संपन्या ऐवजी जास्तच वाढू लागते. म्हणून आपल्या वैयक्तिक समस्यांबद्दल देखील कधीही कोणाशीही बोलू नये.

 

चौथी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये झालेला आपला अपमान. जर आपला कोणत्यातरी बाबतीमध्ये अपमान झालेला असेल तर तो त्या ठिकाणीच विसरून जावा. तो अपमान कोणालाही सांगू नये. कारण अपमान झाल्यामुळे आपल्याला जो त्रास होत असतो तो जर त्रास आपण इतरांशी बोलला आणि तो बोलल्यामुळे इतर लोकं त्या अपमानाचा जर प्रसार करतील. तर त्या मुळे आपल्याला समाधान होण्याऐवजी अपमानाचा प्रसार झालेला पाहून आपल्याला जास्त त्रास होऊ लागतो. म्हणून जर अपमान झालेला असेल तर तो कोणालाही सांगू नये.

 

अशाप्रकारे या चार गोष्टी आहेत, ज्या जीवनामध्ये कधीही कोणाशीही शेअर करू नये. तरच आपण आपले सुखी जीवन जगु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *