समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे की आकर्षण? कसं ओळखायचं… एकदा नक्की बघा १००% पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही …!!

Uncategorized

मित्रांनो, प्रेमात पडणं ही खूपच सुखद भावना आहे. अनेकदा मुलाने मुलीला पाहताच क्षणी प्रेमात पडलेले असे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. पण वास्तवात पाहताच क्षणी प्रेमात पडणे अशी गोष्ट कधीच होत नसते. अनेकदा आकर्षणाला आपण प्रेम समजतो. त्यामुळेच प्रेम आणि आकर्षण या दोन गोष्टीमध्ये फरक समजणे गरजेचे आहे. आकर्षण हे क्षणीक असते त्यामुळे काही काळाने आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला वाटत असणारे प्रेम कमी होते. असे नाते जास्त काळ टिकत नाही.

 

त्यामुळे आकर्षण संपल्यावर हे नाते तुटू शकते. त्यामुळेच योग्य वेळी तुमच्या मनातील भावना काय आहेत हे समजून घेणं गरजेचं असतं. आजच्या या लेखाच्या मदतीने तुमच्या मनातील भावना खरंच प्रेम आहे की आकर्षण हे आपल्याला समजू शकते. म्हणुनच आज आपण खरं प्रेम आहे की फक्त आकर्षण आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रेम म्हणजे आपला जोडीदार जसा आहे तसं त्याला स्विकारणे. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी कमतरता असतेच . पण आकर्षण या भावनेत मात्र असे होत नाही. जो पर्यत आकर्षण असते तो पर्यंत माणूस समोरच्या व्यक्तीमध्ये रस दाखवतो. त्यानंतर मात्र गोष्टी पूर्णपणे बदलतात. त्यामुळे वेळीच तुमचा जोडीदार तुमच्यासाठीवर प्रेम करतो की हे फक्त आकर्षण आहे ही गोष्ट समजून घ्या.

 

प्रेम ही भावना हळूहळू समजू लागते. माणूस आपल्याला एका नजरेत कधीच कळत नाही. माणूस कळण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पहिल्या नजरेत प्रेम होतं असं लोक मानतात या गोष्टीत तथ्य मानता येत नाही. पहिल्या नजरेत आपण फक्त आपल्या जोडीदाराच्या सौंदर्यात आणि संबंधीत गोष्टी पाहत असतो. पण आपण कधीच एका भेटीत किंवा नजरेत माणसाला ओळखू शकता नाही ही गोष्ट ही खरी आहे.आकर्षण असताना आपला जोडीदार आपल्या समोर असावा असं वाटते. पण प्रेमामध्ये अंतर या गोष्टीला स्थान नसते.

 

कितीही लांब असल्यावर देखील तुमच्या दोघांमधील अंतर कधीच कमी होत नाही. प्रेम ही गोष्ट कधीच संपत नसते पण आकर्षण हे क्षणीक असते. त्यामुळे आपला जोडीदार आपल्या समोर नसला तर आपल्यावर कोणतीही फरक पडत नाही.आपण जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टी विसरत नाही. त्याव्यक्तीच्या प्रत्येक बारीक गोष्टीवर आपले लक्ष असते. त्याव्यक्तीला कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट आवडत नाही या सर्व गोष्टी आपण कष्ट न घेता लक्षात ठेवतो.

 

पण आकर्षणामध्ये असे होत नाही. आपण समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार न करत नाही. फक्त त्या व्यक्तीने आपल्याशी बोलावे चांगला वेळ घालवावा अशीच आपली अपेक्षा असते.जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा मात्र बंधनांना जागा नसते. नात्यामध्ये तुमचा जोडीदार कुठे आहे तो कोणासोबत आहे या गोष्टींचा आपल्यावर कोणताही फरक पडत नाही. पण आकर्षणामध्ये मात्र नसे होत नाही. तुम्ही सतत त्या व्यक्तीचा विचार करता. जर तो व्यक्ती तुमच्या मताप्रमाणे वागला नाही तर तुम्हाला राग येतो.

 

अशा प्रकारे या काही गोष्टींवरून खरं प्रेम आहे की फक्त आकर्षण आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *