मित्रांनो, प्रत्येक नवरा बायको मधील नाते हे चांगले असावे. त्या दोघांमध्ये प्रेम टिकून राहावे असे प्रत्येकांना वाटत असतील. त्यांचे नाते कोणत्याही परिस्थितीमध्ये घट्ट असावी. त्याचबरोबर नात्यांमध्ये कसलाही प्रकारचा दुरावा होऊ नये. अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते आणि त्यामुळे ती आपला नवरा कशाप्रकारे आनंदी राहील याच्याकडे सतत लक्ष देत असते. म्हणूनच आज आपण नवऱ्याला आनंदी कसे ठेवावे? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं, कारण नवरा हा बायको पेक्षा खूप कमी गोष्टीन मध्यें समाधानी राहतो, त्याला बायको कडून खूप अपेक्षा नसतात. थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्हीं केल्यात तरी नवरा आनंदी राहील, मग कोणत्या गोष्टी कराव्यात याची माहिती जाणून घेऊया.
१) नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी म्हणजेच सासरचे सर्वं जण यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका.
२) आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्या कडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा.. तुम्हाला नवरा कामात नक्की मदत करेल.
३) घरातल्या परिस्थितीच रडगाणं त्याच्या समोर दुसऱ्या कडे कधी ही गाऊ नये, हें नवरयला अजिबात आवडत नाही.
४) दोघांन मध्ये एखद्या गोष्टी वरून वाद होत असेल, आणि नवरा भयंकर चिडला असेल अशा वेळी तुम्हीं माघार घ्या, चढाओढ करू नका. त्याचा राग निघून जाऊ द्या, मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा, बघा तो नक्की समजून घेईल.
५) तो कुठे जात आहे, काय करत आहे, कोणत्या मित्रा सोबत आहे, असें प्रश्न सतत विचारत जाऊ नका. सतत फोन करून तर नाहीच नाही. तूम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता, असे त्याला वाटले तर तो स्वतः च तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल. त्या साठी तुम्ही तें स्थान नवऱ्याच्या मनात आधी
निर्माण करा.
६) त्याच्या आवडी निवडी जाणून घ्या, अधून मधून त्याला आवडणारें खाद्य पदार्थ घरीं स्वतः बनून त्याला खाऊ घाला, जमत नसेल तर शिकून घ्या. ते पदार्थ शिकण्यासाठी घरातील व्यक्तींची मदत घ्या.
७) आपल्या मुळे त्याला समजात मान खाली घालावी लागेल असें कृत्य करू नका… चार लोकांत त्याचा अपमान होईल असे वागू नका.
८) वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका. त्याला कमी लेखू नका.
९) प्रत्येक परिस्थितीत त्याच्या सोबत उभे राहा, त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या…!
१०) थोडं त्याच्या चुका कडे दुर्लक्ष करा, कारण चुक आपल्या कडून ही होऊ शकतेच.
११) कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्हीं केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेषभूषा, केशभूषा करावी.
अशाप्रकारे एकदा जरूर करा हैं उपाय, तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजुन घट्ट होईल…!