श्री स्वामी समर्थ महाराज अनुभव…. २१ वर्षा पासून स्वामी सेवेत होतो घरी गुरुचरित्र पारायण चालू होते आणि त्याच वेळी घडलं अस काही ………..!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ असे महाराज आहेत की जे आपल्या भक्तांचे पाठीशी सदैव उभे असतात. त्यांना आपल्या भक्तांनी केलेल्या सेवेची वेळोवेळी त्यांना परतफेड करत असतात. ते आपल्या भक्ताच्या पाठीमागे सदैव उभे राहतात व त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर देखील काढत असतात. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण असा एक अनुभव जाणून घेणार आहोत की जो स्वामींची प्रचिती देणारा एका ताईंनी दिलेला हा अनुभव आहे.

 

आजचा आपण ताईंचा अनुभव जाणून घेणार आहोत त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशी आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये ते दोघे नवरा बायको, त्यांचे दोन मुले आणि त्यांची सासू सासरे असा त्यांचा परिवार होता. तब्बल 21 वर्षातील स्वामींचे होत्या. त्या रोज स्वामींची सेवा करायच्या त्यांच्या घरापासूनच जवळ स्वामींचे मठ असल्यामुळे ते रोज मठामध्ये जात होते. एक दिवशी काय झाले की त्यांच्या नवऱ्याचे एक दुकान असल्यामुळे ते दुकानाकडे गेले आणि त्यावेळी या त्यांचे गुरुचरित्राचे पारायण चालू होते आणि अचानकपणे त्यांचे प्रत्येक घरी परत आले.

 

त्यावेळी त्या ताई चे गुरुचरित्राच्या पारायणाचे पठण करत होते. त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना काय झाले असे विचारल्यावर त्यांच्या नवऱ्याने उत्तर दिले की त्यांना काय होते हे समजत नाही आहे आणि खूप भरून आलेलो होतो. त्यामुळे त्या टाईम मी त्यांना गोळी खाऊन आराम करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते गोळी करून आराम करण्यासाठी गेले. अचानकपणे नंतर त्यांना उलटा होऊ लागल्या आणि अंगावरून घाम येऊ लागला. काय करावे हे कळना झाले होते. त्यावेळी त्यांच्या पतीला कोणीही ओळखत नव्हते.

 

त्यांची स्मृती गेल्यासारखे भासत होत. त्यांना अचानकपणे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आल. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करून घेत नव्हत. ताईंनी त्यांना अहमदनगरला घेऊन गेले. त्या वेळेला त्यांनी सांगितले की एक शीर दबले आहे त्यामुळे त्यांची सर्व स्फूर्ती गेलेली आहे आणि हे करण्यासाठी एक ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन मध्ये देखील हे बरे होऊ शकतील की नाही हे सांगता येत नाही. असे डॉक्टर आणि त्यांना सांगितले. यामध्ये दोन तीन दिवस त्यांची निघून गेले. तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी पुण्याच्या एका हॉस्पिटलची चिठ्ठी दिली आणि त्यांनी सांगितले की या हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांचे ऑपरेशन करा.

 

गुरुचरित्राचे पारायण चालू असल्या कारणाने त्या ताई त्यांच्या पतीकडे जाऊ शकत नव्हत्या. गुरुवारचा दिवस होता त्यांच्याकडे एकच पर्याय उरला होता की स्वामींना कळकळून प्रार्थना करणे आणि स्वामींची सेवा करणे.

त्यामुळे त्या त्यांच्याकडेच वळल्या. त्या दिवशी त्यांचे भाचे त्यांच्या पतीला घेऊन पुणाला निघणार होते. त्यावेळी त्यांनी जे गुरुचरित्राचे पारायण चालू असताना जी रक्षा त्यांच्याकडे होती त्यांनी ती त्या भाच्याकडे दिली. व त्याला सांगितले की ही रक्षा त्यांच्या संपूर्ण अंगाला लाव आणि थोडी त्यांना खायला सुद्धा दे. त्या प्रकारे त्या भाच्याने त्यांना ॲम्बुलन्स मधून पुण्याला घेऊन जात असताना त्याच्या वेळेला त्यांच्या संपूर्ण अंगाला ती रक्षा लावली आणि त्यांच्या तोंडात ही देखील थोडी घातली.

 

पुण्यात पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना ऍडमिट करण्यात आले आणि ज्या वेळेला त्यांच्या पतीचे रिपोर्ट त्या डॉक्टरांना दाखवण्यात आले की डॉक्टर आणि त्या वेळेला त्यांना सांगितले की, यांना कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही. यांची स्थिती इतकी ही क्रिटिकल नाही की त्यांना ऑपरेशनची गरज आहे. ते गोळ्या औषध वर देखील बरे होऊ शकतात. हे ऐकताच त्यांच्या घरातील सर्वांना खूप म्हणजे खूपच आनंद झाला. त्यांना आलेला हा स्वामी अनुभव आहे. ज्यावेळी त्यांच्या घरावर हे संकट आले होते त्यावेळी त्या ताईंनी स्वामींची सेवा करणे अजिबात सोडले नाही. त्यांनी तारक मंत्राचा जप केला, स्वामी चरित्र सारामृत असे वाचन केले, त्याचबरोबर त्यांचे गुरुचरित्राचे पारायण देखील चालूच होते. त्याचबरोबर ते तारक मंत्राचा जप करत असताना तारक मंत्र तीर्थ हे देखील त्या पत्नीकडे कोणाच्या नावात कोणाच्या मार्फत पाठवत होते आणि त्या तीर्थ त्यांच्या पतींना देण्यासाठी सांगत होते.

 

याचाच काहीसा अनुभव आला असेल. परंतु डॉक्टरांनी तर यांना कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही असे सांगितले होते. परंतु त्यांची स्मृती गेली होती. म्हणून डॉक्टरांना त्यांनी प्रश्न केला की यांची स्मृती परत केली परंतु तुम्ही सांगता आहात की यांना कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही. त्यावेळी डॉक्टरांनी म्हटले की यांची स्मृती देखील काही दिवसात परत येईल. त्यावेळी त्या ताईने आपला स्वामी जप करण्याचा किंवा स्वामी सेवा करण्याचा कोणत्याही सेवांमध्ये खंड पडला नाही. त्यांनी सतत आपल्या सेवा चालू ठेवल्या.

 

त्यांचा गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीचा दिवस आला आणि त्याच दिवशी मठांमध्ये त्यांची आरती देखील होती. व्हिडिओ कॉल करून पाहत होते. त्यांच्याशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी आपला पतीला प्रश्न केला की, आपली मठामध्ये आरती आहे आणि आज आपले गुरुचरित्राच्या पारायणाची समाप्ती देखील आहे. प्रसाद काय करू हे मला कळत नाही आहे. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की, नेहमीप्रमाणे कांदा भजी कर. यावेळी त्या ताईंना विश्वास पडला की त्यांची स्मृती देखील परत आलेली आहे. अशा प्रकारे स्वामी त्यांच्या संकटाच्या काळामध्ये त्यांच्या सोबत आले. त्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढले.

 

अशाप्रकारे हा आलेला स्वामींचा अनुभव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *