शिळ्या भातापासुन बनवा १० मिनिटांत झटपट कुरकुरीत असा डोसा…. हा नाश्ता खाल्ल्यावर सारखा करून खाल……!!!

Uncategorized

मित्रांनो, रोजच्या जेवणात भात असतोच अशी अनेक घरं आहेत. दुपारचा किंवा रात्रीचा उरलेला भात टाकून देण्यापेक्षा १ कांदा चिरून फोडणीचा भात करून लोक नाश्त्याला किंवा जेवणाला खातात. शिळा, उरलेला भात डाळीबरोबर खायचा म्हटलं तर तो खूपच कडक झालेला असतो. म्हणून ताज्या भाताप्रमाणे डाळ किंवा भाजीबरोबर खाता येत नाही. त्याची चवही बदलते. जास्तीचा भात बनवला असेल जेवणानंतर भात उरला तर त्याचा फोडणीचा भात करण्यापेक्षा चविष्ट डोसा बनवू शकता.

 

लहान मुलांपासून मोठ्यांनाही फोडणीच्या भातापेक्षा इडली-डोसा खायला नक्की आवडेल. हे डोसे तुम्ही नारळाची चटणी किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता. भाताचा डोसा तव्याला चिकटेल का, बिघडणार तर नाही ना, असं तुम्हालाही वाटत असेल तर उरलेल्या भाताचा डोसा करण्याची परफेक्ट रेसिपी आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात उरलेला भात घाला या भाताचे प्रमाण दीड वाटी इतके असावे. त्यात वाटीभर रवा घाला. जास्त बारीक रवा घालू नका. उपमा, शीरा करण्यासाठी वापरला जातो त्या रव्याचा वापर करा. नंतर त्यात अर्धी वाटी दही घाला. दह्यामुळे डोशाला आंबटपणा येईल आणि चांगली चवही येईल. याशिवाय दह्यामुळे पीठ व्यवस्थित तयार होण्यास मदत होते. या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिश्रण मिक्सरला फिरवून घ्या.

 

मीठ याचे प्रमाण कमी ठेवावे कारण या शेळ्याभातांमध्ये आधीच मी येत असतो आणि त्यामुळे डोसे खारट होण्याची शक्यता असते. इडलीच्या पिठाप्रमाणे या मिश्रणाची कंसिटन्सी झाल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्या. आणि ते दहा मिनिटांसाठी भिजत ठेवा कारण त्यामुळे आपण या बॅटरमध्ये जो काही रवा घातलेला आहे तो चांगला फुलेल व चांगला प्रकारे भिजेल व आपले बॅटर चांगले तयार होईल.

 

दहा मिनिटानंतर यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून पुन्हा एकजीव करून घ्या. नॉन स्टिक तव्यावर तेल गरम करून डोश्याचे पीठ घाला आणि डोसा गोलाकार पसरवून घ्या. डोशा अर्धवट शिजल्यानंतर कडेच्या बाजूने तेल सोडत राहा. डोसा शिजल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने काढून दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्या. नंतर डोसा एका ताटात काढून घ्या. यात तुम्ही शेजवान चटणी घालून किंवा बटाट्याची भाजी घालून आपल्या आवडीनुसार डोसा तयार करू शकता. गरमागरम डोसा ओल्या खोबऱ्याची चटणी किवा सांभार बरोबर सर्व्ह करा.

 

अशाप्रकारे झटपट आपण शेळ्या भातापासून डोसा बनवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *