मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक वावरत असतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्वभावांच्या लोकांच्या वावरातून जावे लागते. आपल्या जीवनामध्ये काही लोक चांगले तर काही लोक वाईट त्याचबरोबर काही लोक मूर्ख देखील येत असतात. या मूर्ख लोकांसोबत कसे वागावे? याबद्दलची दहा पद्धती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
१. मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं.
२. ते म्हणतात ना कुत्रा आहे तो भूकणारच म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्कीट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचे.
३. नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड तिथल्या तिथेच उतरेल.
४. या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा का तुमची कमजोरी week point यांना कळाला की त्याचा फायदा हे लोक नेहमी घेतात.
५. मित्र-मैत्रिणींनो अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल या लोकांचा घमंड अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे || ओम दुर्लक्षाय नमः ||
६. घमंडी लोक तुमच्यावर जळणारी लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून यांच्यासमोर आपला एटीट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील.
७. मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका यांना कधीही शहाणपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाढवा समोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळ उठून रामाची आई सीता.
८. अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे.
९. अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते म्हणून ते तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्खाच्या नादी लागू नका आणि यांच्याशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग आपले यश कशात आहे तेच पाहिलेलं बरं.
१०. अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानाची अजिबात पर्वा नसते यांना चार लोकात किंमतही नसते महत्त्व नसते म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्त्व कमी करायचे नाही आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं.
अशाप्रकारे या दहा पद्धती आहेत ज्यांचा वापर आपण मूर्ख लोकांसोबत वागण्यासाठी करू शकतो.