मित्र मैत्रिणींनो तुमच्या झालेल्या अपमानाचा बदला असा घ्या? सुंदर सुविचार…..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या या जीवनामध्ये प्रत्येक जण हा आपल्या वाईटावर असतो आणि त्यामुळे तो आपल्याला कसा त्रास होईल याचाच विचार करत असतो. जरा आपण काही प्रगती करायला गेलो तर तो आपला अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. त्याच्यापासून आपण जास्त प्रगती करत आहोत हे त्याला बघवत नसते. म्हणूनच अशा लोकांना कशाप्रकारे उत्तर द्यावे हे आपण चांगला सुविचारातून जाणून घेणार आहोत.

 

अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला पाहिजे.

आपल्या मनाचा विचार आपणच करायचा! खंबीर इतकं व्हायचं की कोणत्याही प्रहारानं मन तुटलं नाही पाहिजे !

जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नये! बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं !

बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो! सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो! वाघाचा नाही !

माणुसकी बघितली तर दिसते दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते ओळखली तर शेवटपर्यंत राहते.

माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो समाधानी आणि आनंदी असला पाहिजे.

माणसं समजून घेणं कठीण असतं तेव्हा परिस्थिती समजून घ्यायची असते.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं.

दिसणं कसंही असू द्या पण स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे.

माणसाला त्याच्या जवळचं आहे, ते पुरेसं वाटत नाही ! स्वतः जवळ जे आहे त्याची ताकद त्याला जाणता येत नाही म्हणून तो दुसऱ्या गोष्टीच्या मागं पळत सुटतो.

खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणे कधीही चांगलं !

सतत आपल्याला असं वाटत असतं की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण खूप महत्त्वाचे आहोत, पण हा फक्त आपला गैरसमज असतो.

डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं, तर बघू शकत नाहीत त्याचप्रकारे माणूस दुसऱ्यांचे दोष तर बघू शकतो परंतु स्वतः मध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही.

आपल्या माणसाच्या वागण्यात जेव्हा आपल्याला बदल जाणवू लागतात तेव्हा समजून जायचं त्याच्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती आलेय, जी त्याला आपल्यापेक्षा जास्त प्रिय आहे.

वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा समोरच्याला माहिती असतं आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो तरी ती व्यक्ती जाणून-बुजून तीच गोष्ट करते.

चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायचं असतात.

एखाद्याच्या आयुष्यात आपली एक खास जागा असावी हक्काची किवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती जागा कधी बदलणारी नसावी.

आयुष्यात काही क्षण असं असतात जे कधी कोणाला सांगता येत नाहीत पण ते क्षण आठवले ना, तर डोळ्यात पाणी येतंच पण मन ही खूप रडतं !

झोप आली तर सगळं विसरायला लावते आणि नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडते.

अनुरूप नसणं हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही, एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवता, फुलवतात !

 

आशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *