मित्रांनो, माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा पाहणार आहे. या कथेद्वारे तुम्हाला समजेल की, स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत. जी स्त्री या वस्तू इतरांना देते, माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते. म्हणत आजच्या लेखातून आपण माता लक्ष्मीने सांगितलेले या पाच वस्तूं बद्दलची माहिती एका कथा द्वारे जाणून घेणार आहे.
जुन्या काळातील गोष्ट आहे. मध्यदेशात एक अतिशय सुंदर नगर होते. त्या नगरात कलावती नावाची स्त्री पती, सासू, सासरे यांच्यासोबत राहत होती. कलावती ही एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती. त्याचारोबर कलावती घरकामात कुशल आणि हुशार होती. कलावती स्वभावाने खूप दयाळू होती. ती नेहमी इतरांना मदत करत असे. कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता. नगरमध्ये त्यांचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते. लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे. कलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते. कलावती नवऱ्याला देवासमान पुजयाची, नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची. कलावती रोज सकाळी लवकर उठायची. घराचे अंगण साफ करायची. मग रांगोळी काढून अंगण सजवायची. त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची. त्यानंतर आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी- देवतांची पूजा करायची.
अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे. कलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही. ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरात बोलायची. कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे, की कलावती ही लक्ष्मी सारखी गुण असलेली स्त्री आहे. ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते. कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती. दानधर्म करताना कलावती कधीच हात मागे ठेवत नसे. जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे, तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही. तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे. जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे, कलावती कधीच त्याला उपाशी पोटी परत पाठवत नसे. तिच्या द्वारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे. एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची. ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे.
त्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची , कलावती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे. त्यामुळे कलावतीचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे. ते म्हणायचे, अरे ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे, देवी लक्ष्मीने स्वतः कलावतीच्या रुपाने जन्म घेतला आहे. लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे, सगळेच तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे, परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीही गर्व बाळगला नाही. ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची. एके दिवशी कलावतीचा एक शेजारी तिच्या घरी येतो. कलावती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते, ” बहिणी, माझ्या घरी तुझे स्वागत आहे. आज तू माझ्या घरी का आली आहेस? तुला काही हवे असेल तर मला सांग. मी तुला नक्कीच मदत करेन.” कलावतीची शेजारीण म्हणते, “अगं कलावती बहिणी, आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत. मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. परंतु माझ्याकडे पोलीपात लाटणे आणि तवा नाही, त्यामुळेच मी तुझ्याकडे पोळीपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे. जर तू मला ह्या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल. काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेन.
कलावती म्हणाली, बहिणी, यात काय मोठे आहे? मला आत्ता पोळीपाट लाटणे तव्याची गरज नाही, म्हणून तू घेऊ शकतेस. थांब मी आत्ताच घेऊन येते. कलावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पोळीपाट लाटणे आणि तवा आणते आणि शेजरणीला देते. तेव्हा शेजारीण म्हणते, ताई, तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळीपाट लाटणे आणि तवा परत करेन. कलावती म्हणाली, ताई, काळजी करू नका, तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा. शेजारीण कलावतीचा पोळीपाट लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते. काही वेळाने दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते . कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, ये ताई, आज तुला माझ्याकडून काय हवे आहे? तू अजिबात संकोच करू नकोस, तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग. मी तुला नक्कीच मदत करेन.
तेव्हा ती बाई म्हणते, कलावती, माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही. म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे. जर तुला काही अडचण नसेल, तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे. मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन.कलावती काही विचार न करता म्हणते, “ताई , तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना. मग त्यात काय अडचण असू शकते? तुम्ही थांबा, मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणते.” असे म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते. ती बाई कलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते. त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते. कलावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते. कलावती म्हणते, “ये ताई, आज माझ्या घरी कसे येणे केलास? तुला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांग. मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.” तेव्हा ती स्त्री म्हणते, “कलावती, तू खूप दयाळू आहेस. मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस. म्हणूनच मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आले आहे.”
कलावती म्हणते, “ताई, अजिबात संकोच करू नको. तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा. जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन.” तेव्हा ती स्त्री म्हणते, “कलावती, आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहेत. त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे. कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही, त्याचबरोबर चांगली साडी सुद्धा नाही. मला काहीच कळत नाही की मी माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू? अगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेचच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील. कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या, मी एका दिवसाने ते सर्व परत करेन. जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करीन. शेजारीच हे म्हणणं ऐकल्यानंतर कलावती म्हणाली, ताई, काळजी करू नकोस. तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तिला नक्कीच मदत करेन. मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते, जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल.
मग कलावती आत जाते, दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते. ती स्त्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते. संध्याकाळी आणखी एक शेजारीण कलावतीच्या घरी येते. कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, ये बहिणी, मला सांग तू आज माझ्या घरी का आली आहेस, मी तुला कशी मदत करू शकते? तुम्हाला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. शेजारीण म्हणते, अगं कलावती बहिणी, तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस, म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे. माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही. म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे. जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील. कलावती म्हणाली, अगं ताई, यात काय मोठी गोष्ट आहे? मी आत्ता तुल दूध आणून देते. कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजार्णीला देते.
शेजारीन आनंदाने दूध घेऊन निघून जाते. अशाप्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागते. त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो. कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते. रात्री पती- पत्नी दोघेही सुखाने झोपतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते, तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते. एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो, “अरे भाऊ, काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे. सर्व सामान गायब आहे.” कलावतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो. तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे. त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते. तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि कलावतीला सर्व काही सांगतो. हे ऐकून कलावती खूप दुःखी होते.
कलावती म्हणते, ” काळजी करू नका, आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत. त्या पैश्यांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरु करता येईल.” त्यानंतर कलावती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते, परंतु तीही पूर्णपणे रिकामी दिसते. त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेले होते. हे पाहून कलावती खूप दुःखी होते. हे कसे घडले हे तिला काहीच समजत नाही. कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि कलावतीला विचारतो, खरे सांग, घरात ठेवलेले सगळे पैसे कुठे गेले? कलावती म्हणते, अहो दिवसभर मी घरीच होते, सगळे पैसे तिजोरीतच होते. परंतु आता सर्व पैसे गायब आहेत. हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही. कृपया तुम्ही शांत व्हा. आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू.
कलावतीचा नवरा म्हणतो, तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणं, अनोळखी लोकांना घरात बोलावणं याचं हे फळ आहे. त्यापैकीच एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत. कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो. कलावतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते, तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस, विचार न करता कोणाचीही मदत करतेस, त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहेत. सर्वजण कलावतीच्या वाईट साईट बोलत असतात. तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला सांत्वन देते आणि म्हणते, “अहो अजून माझे दागिने आहेत , मी माझे काही दागिने आपल्या शेजरनीला दिले होते. मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते. त्या दागिन्यांमुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते.
अस बोलून कलावती त्या शेजरणीच्या घरी जाते जिला तिने दागिने दिले होते. परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो. तो पाहते की तिच्या घरी कोणी नाही. ती महिलाही घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन पळून गेली आहे. कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते. कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि कलावतीला शिवीगाळ करू लागतो. कलावतीचा नवरा म्हणतो, “अगं कलावती, तू मूर्ख आहेस. तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे. तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ते काही नाही, आता तु या घरात राहू शकत नाही. तू आत्ताच या घरातून चालती हो. कलावती म्हणते, “अहो तुम्ही हे काय म्हणत आहात? तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही. तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ?”
कलावतीचा नवरा म्हणतो, “तुला वाटेल तिथे जा, पण या घरात तू राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. तू हे घर उध्वस्त केले आहेस.” कलावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते, “हे स्वामी, असे बोलू नका. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. प्लीज मला घराबाहेर काढू नका. पण कलावतीचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो, “आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नको. तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल. परंतु आता इथे राहू नको.” अखेर नाईलाजाने दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते. जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते, “हे आई, मी असे कोणते पाप केले होते, की माझी अशी अवस्था झाली आहे. हे लक्ष्मी माते, मी रोज तुझी पूजा करायचे, मग तू माझ्यासोबत असे का वागळीस? का तू आमच्या घरावर रुष्ट झालीस? हे आई, मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस.
कलावती मंदिरात खूप रडते, मग ती विचार करते की, “माझा नवरा मला स्वीकारणार नाही, मग मी जगून तरी काय करू? माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. असा विचार करून कलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली. नदीजवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते. हे देवी लक्ष्मी, आता मी माझे प्राण त्यागणार आहे. तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल, तर मला क्षमा कर. मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही. आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे. असे म्हणत कलावती नदीत उडी मारणारच होती, तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे माता प्रकट होते. देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते, कलावती मुली थांब, तू काय करतेस? कलावती डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे.
देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूप आनंदित होते आणि ती सारखं देवीला नमस्कार करते आणि म्हणते, हे देवी लक्ष्मी, मला क्षमा कर. मी फार मोठे पाप करणार होते. देवी लक्ष्मी म्हणते, हे कलावती, माणसाने कधीच स्वतःचा जीव घेऊ नये, हे खूप मोठे पाप आहे. भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये.कलावती म्हणते, आई, मी असहाय्य आहे. माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरा माझा कोणीच नाही. मी माझ्या नवऱ्यावीणा जगू शकत नाही, म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे. देवी लक्ष्मी म्हणते, हे कलावती, मला सर्व काही माहित आहे आणि मला हे देखील माहित आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे. हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे. तू अजाणतेपणी अशा काही गोष्टी दान केल्या होत्या, ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले.
जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते, मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही. मी त्या गोष्टींसोबतच मी त्यांचे घर सोडते. तेव्हा कलावती म्हणते, हे आई, त्या कोणत्या गोष्टी आहेत, कृपया मला सांगा. मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तुम्ही माझे घर सोडले आहे. देवी लक्ष्मी म्हणते, हे पोरी, आता तू लक्षपूर्वक ऐक, मी तुला त्या गोष्टी सांगेन, ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत. जो कोणी या गोष्टी दान करते मी ते घर सोडते. हे कलावती, पहिली गोष्ट म्हणजे पोळीपाट लाटणे आणि तवा. कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोळीपाट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये.
स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे. या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे. या वस्तूंपासून भगवान श्री हरी विष्णूसाठी प्रसाद बनवला जातो. त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गायीला खायला दिली जाते. म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात. या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात. कलावती, तुझ्या स्वयंपाकघरातील पोळीपाट लाटणे आणि तवा तू तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू खूप मोठी चूक केली आहेस.
पुढे माता लक्ष्मी म्हणते, हे कलावती, आता दुसरी गोष्ट ऐक. तू तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिला आहेस. ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते, जी गोष्ट मला प्रिय आहे तीच वस्तू तू शेजारनीला दिलीस, मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते? हे कलावती, जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते, मी तिचे घर सोडते. झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो. कलावती लक्षात ठेव, झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. बाहेरच्या माणसाची नजर झाडुवर पडणार नाही अश्या ठिकाणी झाडू ठेवावा. झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे, त्याला पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये.
माता लक्ष्मी म्हणते, हे कलावती, आता तिसरी गोष्ट ऐक. स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत. माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे. स्त्रीच्या 16 अलंकारांमध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत. जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो. हे कलावती, आता मी तुला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते. संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका. आणि कलावती तु संध्याकाळी दूध दान केले होते. संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकट येतात. संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो. माता लक्ष्मी म्हणते, हे कलावती, आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नयेत. या गोष्टी इतरांना उधारीवर किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत.
कलावती म्हणते, हे माता लक्ष्मी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला या गोष्टींची माहिती नव्हती. कृपया मला क्षमा करा आणि आता त्याचे प्रायश्चित करण्याचा मार्ग सांगा. देवी लक्ष्मी म्हणते, हे कलावती, तू आधीच प्रायश्चित्त केले आहेस, म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा. मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे. असे म्हणत माँ लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान विलीन होते. मग कलावतीही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात कलावतीचा नवरा तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो.
तो कलावतीकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो, कलावती, मला क्षमा कर. मी तुला खूप वाईट बोललो होतो. तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती परत मिळाली आहे. आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे. ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती, त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे. ते सर्व चोर म्हणाले, स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला कलावतीचे सर्व धन परत करण्यास सांगितले आहे. जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रौद्ररूपाचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे.
त्यामुळे आम्हाला तुमचे धन नकोय, आणि आजपासून पुन्हा कधीच आम्ही चोरी करणार नाही. असे त्या चोरांनी सांगितले. हे ऐकून कलावती खूप आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली. देवी लक्ष्मीच्या कृपेने कलावतीच्या घरात सुख-समृद्धी परत येते आणि त्यानंतर कलावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत.
अशा प्रकारे लक्ष्मी सांगितलेली ही कथा आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेले आहे.